एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, लवकरच भाजप आणि शिवसेनेचे सरकार येईल; दीपक केसरकर

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी. शिवाय राजीनामा न देता त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे. 

Maharashtra Political Crisis : "आम्ही अजूनही शिसेनेसोबतच आहोत. लवकरच महाराष्ट्रात येणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. महाविकास आघाडीतून बाहेर पडलो तर प्लोअर टेस्टची गरज भासणार नाही. राजीनामा न देता उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं असे सांगत लवकरच भाजप आणि शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास शिवसेनेचे बंडखोर नेते आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. दीपक केसरकर यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते.  

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी. शिवाय राजीनामा न देता त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, असे आवाहन दीपक केसरकर यांनी यावेळी केले आहे. 

दीपक केसरकर म्हणाले, 'महाराष्ट्रात दाखवले जात आहे ती वस्तूस्थिती नाही. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याच आर्शीवादाने हे सरकार बनावं. 10 ते 12 आमदार वगळता सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. 

"घरातून एखादा मुलगा बाहेर गेला तर बाहेर पडलेल्यांची समजूत काढली जाते. परंतु, आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. आधी मार्ग काढला असता तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं. परंतु, उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे सल्लागार महत्वाचे वाटतात, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

"आम्हाला महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेना म्हणून एकत्र निवडूण आणले होते. परंतु शिवसेने वेगळी चूल मांडली. जनमताच्या कौलाप्रमाणे युती सरकार हवं होतं. त्यावेळी भाजपचे लोक रस्त्यावर आले नाहीत. त्यामुळे आता देखील हा निर्णय मान्य केला पाहिजे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

'मातोश्रीवर आरोप करू नयेत'

दीपक केसरकर म्हणाले, "मध्यंतरीच्या काळात मातोश्रीवर अनेक आरोप करण्यात आले. परंतु, मातोश्रीवर  कोणीही आरोप करून नयेत. मातोश्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध चांगले होते."  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण! या घटनेने फलटणची बदनामी झाली, CDR काढले तर या प्रकरणाचा छडा लागेल : रामराजे नाईक निंबाळकर

राज ठाकरेंवरील बायोपिकचे नाव बुद्धिबळ, एकदा राजनी बाळासाहेबांना विचारलं का अन्.. राज ठाकरेंना युतीवर बोलतं करणाऱ्या महेश मांजरेकरांचा माझा कट्टा

सिडनीत धडकी भरवणारा इतिहास, व्हाॅईटवाॅशची टांगती तलवार अन् विराट रोहितचा ऑस्ट्रेलियन भूमीत शेवटचा वनडे! चक्रव्यूह भेदणार?

लग्नानंतर प्रत्येक मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही; तुम्हाला कदाचित हा नियम माहित नसेल

व्हिडीओ

Kalyan Crime: 'माझ्या दोन वर्षाच्या भाचीवर 307 चा गुन्हा दाखल केला', महिलेचा पोलिसांवर गंभीर आरोप
VBA vs RSS: सुजात आंबेडकरांचे संघाला थेट आव्हान, मोर्चावरुन वाद पेटला
Shugar Factory Name : जतच्या साखर कारखान्याचं नाव बदललं, पडळकर-पाटलांमध्ये नवा वाद
Kalyan Rada : फटाक्यावरुन वाद, कल्याणमध्ये दोन गटात राडा
Mohol Vs Dhagekar : बिल्डरच्या गाडीवरुन वाद, रविंद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यात वाद पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण! या घटनेने फलटणची बदनामी झाली, CDR काढले तर या प्रकरणाचा छडा लागेल : रामराजे नाईक निंबाळकर
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण! या घटनेने फलटणची बदनामी झाली, CDR काढले तर या प्रकरणाचा छडा लागेल : रामराजे नाईक निंबाळकर
राज ठाकरेंवरील बायोपिकचे नाव बुद्धिबळ, एकदा राजनी बाळासाहेबांना विचारलं का अन्.. राज ठाकरेंना युतीवर बोलतं करणाऱ्या महेश मांजरेकरांचा माझा कट्टा
राज ठाकरेंवरील बायोपिकचे नाव बुद्धिबळ, एकदा राजनी बाळासाहेबांना विचारलं का अन्.. राज ठाकरेंना युतीवर बोलतं करणाऱ्या महेश मांजरेकरांचा माझा कट्टा
सिडनीत धडकी भरवणारा इतिहास, व्हाॅईटवाॅशची टांगती तलवार अन् विराट रोहितचा ऑस्ट्रेलियन भूमीत शेवटचा वनडे! चक्रव्यूह भेदणार?
सिडनीत धडकी भरवणारा इतिहास, व्हाॅईटवाॅशची टांगती तलवार अन् विराट रोहितचा ऑस्ट्रेलियन भूमीत शेवटचा वनडे! चक्रव्यूह भेदणार?
लग्नानंतर प्रत्येक मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही; तुम्हाला कदाचित हा नियम माहित नसेल
लग्नानंतर प्रत्येक मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही; तुम्हाला कदाचित हा नियम माहित नसेल
Nashik Crime: जुन्या वादानंतर पुन्हा डिवचलं, भांडण सोडविण्यासाठी एकजण पुढे आला, जाब विचारताच कटरने छाती अन् पाठीवर वार; घटनेनं नाशिक हादरलं!
जुन्या वादानंतर पुन्हा डिवचलं, भांडण सोडविण्यासाठी एकजण पुढे आला, जाब विचारताच कटरने छाती अन् पाठीवर वार; घटनेनं नाशिक हादरलं!
'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं

त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?

Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Embed widget