एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : उद्या या आमदारांना मतदान करु देणं हे लोकशाहीच्या विरोधात; शिवसेनेच्या वतीनं न्यायालयात युक्तीवाद

Shivsena Vs Eknath Shinde : विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश काढल्याचा युक्तीवाद शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. 

नवी दिल्ली: राज्यपालांनी गुरुवारी तातडीने विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर त्यावर आक्षेप घेत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावेळी शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. ते काय म्हणाले ते जाणून घेऊया, 

शिवसेनेच्या वतीने काय युक्तीवाद झाला? 

अपात्रतेचा निर्णय घेतल्यानंतरच बहुमत चाचणी करायला हवी, कारण त्यानंतर सभागृहातील सदस्यांची संख्या बदलणार. जर बंडखोर आमदारांना निलंबित केलं तर सभागृहातील संख्या कमी होईल. 

बहुमत चाचणी आणि अपात्रतेचा काय संबंध असा प्रश्न न्यायालयाने शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना विचारला. 

11 तारखेला जर हे आमदार अपात्र ठरले तर त्यांची अपात्रता ही 21 जूनपासून असेल. याचा अर्थ हा या आमदारांचे मत अवैध ठरेल असं उत्तर अभिषेक मनू सिंघवी यांनी दिलं. त्यामुळे या आमदारांना जर बहुमत चाचणीमध्ये सहभागी करुन घेतलं तर ती बहुमताची खरी परीक्षा होणार नाही असंही सिंघवी यांनी म्हटलं. 

जर विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय आधीच घेतली असता तर ही वेळ आली नसती असं न्यायालयाने म्हटलं. त्यावर उत्तर देताना अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलं की, अध्यक्षांनी कारवाई सुरू केली पण त्यावर कोणीतरी आक्षेप घेतला. 

जर उपाध्यक्षांच्या विरोधातच अविश्वास प्रस्ताव आणला गेला तर त्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला.  

उद्या या आमदारांना मतदान करु देणं हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचा युक्तीवाद सिंघवी यांनी केलं आहे.

34 बंडखोरांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचं वाचन सिंघवी यांनी केलं. राज्यापालांना दिलेल्या पत्रावर 34 बंडखोर आमदारांच्या सह्या आहेत. राजीनामा दिला नसला तरी वागणुकीमुळे पक्ष सोडल्याचं चित्र आहे आणि पक्षांतर बंदी कायद्यानुसार हे ग्राह्य धरता येतं असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला. या सर्व आमदारांची कृती ही पक्षविरोधी आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असं सिंघवी यांनी या माध्यमातून सूचवलं आहे.

या पत्राचं कोणतेही व्हेरिफिकेशन केलं गेलं नसल्याचं सिंघवी यांनी केलं. तसेच राज्यपालांच्या प्रत्येक निर्णयाची कायदेशीर वैधता तपासता येऊ शकते असंही सिंघवी म्हणाले. 

राज्यपालांनी मंत्रिमंडळाला न विचारता अनेक निर्णय घेतले. ते कोरोनातून दोन दिवसांपूर्वीच बरे झाले आणि विरोधी पक्षनेत्याच्या भेटीनंतर त्यांनी लगेच बहुमत चाचणीचा निर्णय घेतला असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला. 

सिंघवी यांनी यांचेकडून राजेंद्र सिंह राणा आणि बोम्मई प्रकरणाचा दाखला देण्यात आला. 

अपात्रतेचा निर्णय घेण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांना अधिकार द्या, त्यांचे हात न्यायालयाने बांधले आहेत. किंवा बहुमत चाचणी ही पुढे ढकला. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ulema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special ReportUddhav Thackeray on Mahayuti | बटेंगे तो कटेंगेचा नारा आणि ठाकरेंचा बदल्याचा इशारा Special ReportMumbai Cash Seized : विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्तDevendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Embed widget