Maharashtra Petrol-Diesel Price 15th July 2022 : शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. त्यानंतर बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्याची घोषणा केली. 

इंधन दर स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातल्या जनतेला अखेर मध्यरात्रीपासून दिलासा मिळाला. मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारनं जनतेला हे गिफ्ट दिलं. या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही अनेक निर्णय घेण्यात आले. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत सरकारनं मोठा दिलासा दिला.

राज्य सरकारनं केलेल्या दरकपातीनंतर राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्याची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोल 106.25 तर, डिझेल 94.22 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. दरम्यान, काल मुंबईत पेट्रोल 111.30 रुपये आणि डिझेल 97.22 रुपये प्रति लिटरनं विकलं जात होतं. जाणून घेऊया राज्य सरकारच्या घोषणेनंतर राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

शहर पेट्रोलच्या किमती  डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे  105 92
नागपूर  106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे  106.05 92.58 
नांदेड  108.24 94.71
रायगड  105.96 92.47
अकोला  106.05 92.55
वर्धा  106.56 93.10
नंदुरबार  106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली  105.96 92.54
जालना 107.76  94.22
 

महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांत पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये तर, डिझेलचा दर 94.24, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रतिलिटर आहे.  

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).