रायगड : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दहा तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली. यामध्ये दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित 78 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. यावेळेस, अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक आघाडी आणि महाआघाडी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाड, पेण अलिबाग तालुक्यातील स्थानिक आमदारांचे गाव असलेल्या गावांमध्ये सुद्धा निवडणूक असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
Gram Panchayat Election | सुनेने सासूचा तर जावयाने सासऱ्याचा केला पराभव...
यामध्ये महाड येथील बिरवाडी ग्रामपंचायत, पेण येथील वाकरूळ ग्रामपंचायत अलिबाग तालुक्यातील येथील पेझारी ग्रामपंचायत आणि रोहा तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे विशेष लक्ष लागले होते. तर, आज झालेल्या मतमोजणी दरम्यान शेकाप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपले बालेकिल्ले सुरक्षित ठेवले आहेत. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील दहा तालुक्यात मतमोजणी करण्यात आली असून जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस, पेण आणि अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शेकाप आणि कर्जत, श्रीवर्धन, रोहा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय मिळविला आहे.
AAP Wins in Panchayat Elections: मराठवाड्यात आपची एन्ट्री, केजरीवालांकडून मराठमोळ्या अंदाजात अभिनंदन
त्याचबरोबर, कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीवर संपूर्ण तालुक्याचं लक्ष असून शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या गटातील ही लढत होती. यामध्ये, शिवसेनेतील नाराज गटाने महाआघाडीसोबत गेल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये महाआघाडीचे 10 सदस्य निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात आनंदाचे वातावरण आहे. तर, कडाव येथील सत्तेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नवी उमेद निर्माण झाली असून शिवसेनेमार्फत देखील ग्रामपंचायतीवर सत्तेचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये भाजपने पनवेल तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला असला रायगड जिल्ह्यातील इतर भागात विशेष कामगिरी करता आलेली नाही. तर, यंदाच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठी पसंती दिल्याने 16 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.
सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा, नेमकी राज्यात कुणी मारली बाजी? #Election