एक्स्प्लोर

नेत्यांना धमकीचे कॉल मेसेज करतंय कोण?

महाविकास आघाडीच्या  प्रमुख नेत्यांना धमकीचे फोन आणि मेसेज का येत आहेत असे प्रश्न राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत.

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार या ना त्या कारणावरून मागच्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. मग ही चर्चा कोविड काळातल्या भ्रष्टाचाराची असो किंवा मग अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात असो. वा मग ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या नेत्यांची असो. मात्र सध्या चर्चा आहे ती महाविकासआघाडीतील नेत्यांना येणाऱ्या धमकीच्या फोनची आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या मेसेजची. 

18 फेब्रुवारी 2021 रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मोबाईल फोनचा व्यत्यय नको म्हणून नाना पटोले यांनी आपला मोबाईल फोन आपल्या पीएकडे दिला होता. मीटिंग सुरू होती. याच दरम्यान नाना पटोले यांच्या मोबाईल फोनवर एका मेसेजची रिंग वाजली. पीएनं तो मेसेज पाहिला मेसेज मध्ये नाना पटोले यांना अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली होती. घडला प्रकार गंभीर होता. कोणीही सभ्य व्यक्ती या शिव्या ऐकल्यानंतर शरमेने मान खाली घालेल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता घडल्या प्रकाराची तक्रार सायबर विभागाकडे देण्यात आली. सायबर विभागाने आपला तपास सुरू केला. आतापर्यंत करण्यात आलेला तपास आणि हे संपूर्ण प्रकरण सध्या सायबर विभागाने मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन करत आहे. 

या अगोदर देखील अशा स्वरूपाच्या शिवीगाळ करणारे मेसेज आणि  धमकीचे फोन महाविकास आघाडीच्या नेत्यांना आले होते. मागच्या वर्षी पलाश बोस नावाच्या एका व्यक्तींना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंडरवर्ल्डच्या नावे धमकी दिली होती.  याच महाशयांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचे फोन मेसेज केले होते.या प्रकरणाची तक्रार गांभीर्याने घेत जुहू एटीएसने या व्यक्तीला अटक केली. 

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे महाविकास आघाडीच्या  प्रमुख नेत्यांना असे फोन आणि मेसेज काय येत आहेत असे प्रश्न राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. मात्र या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरीतच आहेत आणि याचे उत्तर शोधण्याचा काम सध्या मुंबई पोलीस करत आहेत. प्रकरण शमले असं दिसत असताना पुन्हा एकदा अशा प्रकारचे शिवीगाळ करणारे धमकी देणारे मेसेज आणि फोन महाविकासआघाडी  नेत्यांना येऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जाते.. 

महत्त्वाच्या बातम्या

आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा, सर्व प्रवाशी टपावर, परळीतील दोन जण अडकले
सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा, सर्व प्रवाशी टपावर, परळीतील दोन जण अडकले

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
Embed widget