मुंबई: महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस शरद पवार गटाशिवाय निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे.उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार आहे. उद्यापासून ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा  आढावा घेतला जाणार आहे. 


अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आपापल्या पक्षाच्या उद्यापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या बैठकांचा पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे.  18 ऑगस्टला आढावा  घेतला जाणार आहे. 


लोकसभानिहाय मतदार संघाच्या बैठकीला त्या त्या मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटिका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख (प्रमुख शहरातील), विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) उपस्थित राहणार आहेत. 


पहिल्या टप्प्यातील लोकसभानिहाय मतदार संघाच्या बैठकांचा वेळापत्रक


16 ऑगस्ट 



  • दुपारी साडे 12 - नंदुरबार

  • दुपारी दीड- धुळे

  • दुपारी साडे चार - जळगाव

  • दुपारी साडे पाच - रावेर


17 ऑगस्ट



  • दुपारी साडे 12 - नगर

  • दुपारी साडे चार - नाशिक

  • दुपारी साडे पाच - दिंडोरी


18 ऑगस्ट



  • दुपारी साडे 12 - मावळ

  • दुपारी दीड- शिरूर

  • दुपारी साडे चार - बारामती

  • दुपारी साडे पाच - पुणे


19 ऑगस्ट



शिवसेना आणि काँग्रेस एकत्रीत लढण्याचा बी प्लॅन तयार


अजित पवार गट भाजप सोबत गेल्यानंतरही शरद पवारांची स्पष्ट भूमिका नाही. त्यामुळे येत्या काळात शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटाशिवाय शिवसेना आणि काँग्रेस एकत्रीत लढण्याचा बी प्लॅन तयार करत आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना, काँग्रेसने सर्वच लोकसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ ही काँग्रेसने स्वबळावर लढवावा असा काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. 


हे ही वाचा :