Aurangabad Farmer suicide : राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने (Rain) दडी मारल्यामुळे यावर्षी बळीराजाची चिंता वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पिकं माना टाकत आहे. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी आता आत्महत्या (Farmer suicide) सारखं टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) सोयगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने पिकांची झालेली केविलवानी अवस्था त्यात कर्जाचा डोंगर या व्यथेने चिंतातून झालेल्या सात शेतकऱ्यांनी गेल्या चाळीस दिवसांत मृत्यूला कवटाळले असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास मराठवाड्यात विदारक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 


सोयगाव तालुक्यात जुलै 2023 ते 7 ऑगस्ट या कालावधीत सात कर्जबाजारी शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची बिकट अवस्था व कर्जाचा वाढता डोंगर पाहून आत्महत्या केल्या आहे. यात गंगाबाई जाधव (वय 55 वर्षे, रा. तिडका), सोनुबा कळवतरे (रा. सोयगाव), अतुल देसाई (रा. सोयगाव) आणि जोरसिंग राठोड या चार शेतकऱ्यांचे शासकीय मदतीसाठी सदोष प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. तर उर्वरित तीन प्रस्तावात त्रुटी असल्याने अद्याप मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले नाही.


सोयगाव तालुक्यात सुरवातीला झालेल्या पावसानंतर अपेक्षित पाऊस झालाच नाही. जुलै महिन्यात आत्तापर्यंत 274.4 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच 144.8 टक्के पाऊस जुलै महिन्यात झाला. तर, ऑगस्ट महिन्यात 32.8 मिमी म्हणजेच 31.7 टक्के पाऊस झाला आहे. तसेच जुन ते 15 ऑगस्टपर्यंत 346.1 मिमी पाऊस झाला असून, म्हणजेच 79.6 टक्के पाऊस झाला आहे. तर, सोयगाव तालुक्यात यंदाही कपाशीच्या पिकांची विक्रमी 39 हजार हेक्टरवर लागवड झालेली आहे. मात्र, रोगांच्या विळख्यात कपाशीची पिके अडकली आहेत. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर अनेक शेतकरी कपाशीचे पीक उपटून फेकत आहे. 


मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट! 


राज्यात अपेक्षित पाऊस झाले नसून, राज्यभरात मागील वर्षी आजच्या तारखेत 79.63% पाणीसाठा होता. यावर्षी मात्र अवघा 61.16 टक्केपाणीसाठा आहे. तर मराठवाड्यामध्ये अवघा 31.70 टक्के सरासरी पाणीसाठा आतापर्यंत उपलब्ध आहे. त्यात आता पावसाचा फक्त दीड महिना उरला आहे. त्यामुळे पुढील काळात दमदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Rainfall Update : राज्यावर दुष्काळाचं सावट? मराठवाड्याला बसणार सर्वाधिक झळा; पाहा राज्यभरातील परिस्थिती?