बेळगाव : बेळगावात भारत आणि जपान यांचा संयुक्त लष्करी सराव होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी जपान लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आज लष्करी सरावाच्या जागेची पाहणी केली. धर्म गार्डीयन 2022 असं जपान आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त सरावाला नाव देण्यात आले आहे. 


27 फेब्रुवारी ते 12 मार्च 2022 दरम्यान हा लष्करी सराव होणार आहे. जपानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी तीन दिवस बेळगावात वास्तव्य करून मराठा लाईट इंनफंट्री रेजिमेंटल सेंटर आणि कमांडो प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या ज्युनियर लीडर्स विंगला भेट देऊन ब्रिगेडियर रोहित चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली.


2018 पासून भारतात धर्म गार्डीयन या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात येत आहे. जगातील दहशतवादामुळे निर्माण झालेला धोका आणि देशाची सुरक्षा याबाबत हा लष्करी सराव दोन्ही देशांना उपायुक्त ठरणार आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी तसेच घनदाट जंगलात हाती घेण्यात येणाऱ्या मोहिमा याविषयी सराव आणि चर्चा दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी करणार आहेत. या संयुक्त लष्करी सरावामुळे भारत आणि जपान देशामधील संबंध अधिक दृढ होण्यासाठी मदत होणार आहे. जपानच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल युझो मसुदा यांनी केले होते. भारत आणि जपानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी चर्चा करून लष्करी सरावाचा आराखडा तयार केला आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :