ST Protest : आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाने नागपुरातून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, संदीप गोडबोले हा नागपुरातील गणेशपेठ आगर येथे एसटी कर्मचारी आहे. पोलिसांचे पथक त्याला मुंबईत आणत आहे आणि त्याची चौकशी करणार आहे. वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात आज न्यायालयात नागपुरचा व्यक्ती सदवार्ते यांचा संपर्कात असल्याचे म्हटले आहे. हीच ती व्यक्ती आहे का? याच पुलिस आता तापस करणार आहे. गोडबोले आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या संपर्कात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं होते.
नागपूरच्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅप कॉल
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा युक्तीवाद काल सरकारी वकीलांनी केला. या आंदोलनाआधी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नागपूरच्या एका व्यक्तीशी बोलणं झाल्याचं त्यांच्या चॅटमधून स्पष्ट झालं आहे अशी माहितीही सरकारच्या वतीनं न्यायालयात देण्यात आली. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात नागपूरच्या एका व्यक्तीसोबत बोलणं केल्याचं पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झालं आहे. 7 एप्रिल 2022 ला रात्री 11 ते 2.50 पर्यंत सदावर्तेंच्या टेरेसवर एक मिटींग झाली त्यावेळी या मिटींगमध्ये नागपूरची व्यक्ती देखील सहभागी होती. अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी हे आंदोलनाअगोदर त्या नागपूरच्या व्यक्तीला समोरासमोर भेटल्याचे देखील वकिलांनी युक्तीवादात म्हटले आहे.
संबंधित बातम्या :