Gunaratna Sadavarte : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना आज  न्यायालयीन  कोठडी सुनावण्यात आली आहे.  न्यायालयीन  कोठडी 14 दिवसांची आहे.  सदावर्तेंना सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती.  17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना न्यायालयाने कारागृहातून गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची परवानगी दिली. सदावर्तेंचा वकिल आज तिसऱ्यांदा बदलण्यात आला आहे. आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशीला  16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सदावर्तेंन न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी त्यांना  13 एप्रिलपर्यंत दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.  सदावर्ते  यांची पोलिस कोठडी संपली.  त्यानंतर आज सदावर्तेंना  न्यायालयात हजर करण्यात आले होते. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही चेक करायला वेळ लागतात असं म्हणतायत मात्र हे सगळं उपलब्ध आहे. गुन्हा एका गोष्टीबद्दल दाखल झालाय आणि बोलणं आर्थिक गोष्टीबद्दल होतंय. यासंदर्भात कुठे गुन्हा देखील दाखल नाही आहे