नवी दिल्ली : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत.  शरद पवार (Sharad Pawar) गटातर्फे निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले असून अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळले आहेत. मंत्र्यांशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यातले चार विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. 


शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. अजित पवार गटाला देखील आजच उत्तर दाखल करायचे आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. 


नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल


शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहे. पहिल्यांदाच अपात्र आमदारांचा आकडा समोर येत आहे. नऊ मंत्र्यांविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केलेली आहे. मात्र या नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या शिवाय अजित पवार गटाने केलेले दावे देखील शरद पवार गटाने फेटाळले आहेत. 2022 मध्ये जी राष्ट्रीय कार्यकारणी झाली त्याचे देखील दाखले देण्यात आले आहे. त्या प्रक्रियांचे पालन करत माहिती निवडणूक आयोगात दिले होते.


शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फरक आहे की पक्षाचे गटनेते जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहे ते शरद पवार गटाच्या बाजूने आहेत. या पार्श्वभूमीवर समोरील गटाचा पक्षावरील दावा मजबूत कसा होऊ शकतो? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. एक प्रकारे निवडणूक आयोगातील लढाई ही गांभीर्याने सुरू झाली आहे.  निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. दोन्ही बाजूची उत्तर ऐकल्यानंतर आयोग किती वेगाने सुनावणी करणार याची उत्सुकता आहे.  


हे ही वाचा :