रत्नागिरी :  महाविकास आघाडी नेत्यांना सळोपळो करुन सोडणारी ईडी आता थेट कोकणात पोहोचली आहे. कारण ईडीनं आपली नजर कोकणातील जमीन खरेदी व्यवहाराकडे वळवली आहे. सध्या कोकणातील रिफायनरी प्रकल्प चर्चेत आहे. आणि याच प्रकल्प परिसरात मागील दोन ते चार वर्षात झालेल्या जमीन खरेदीचा व्यवहार ईडीनं तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


मार्चमध्ये महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याच्या भावाची आणि नातेवाईकांची ईडीनं चौकशी केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी 'माझा'ला दिली आहे. 200 एकर जागा खरेदीबाबत चौकशी झाल्याचं कळतंय.  8 आणि 9 मार्च रोजी राजापूर शहरातील एका हॉटेलमध्ये पहाटे पाच वाजता ही चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा, राजापूर तालुक्यातील पश्चिम भाग, कोंड्ये गावातील जमीन व्यवहारांची चौकशी झाल्याचं कळतं आहे. 


महाविकास आघाडीतील  अनेक नेते आतापर्यंत ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. एकमागोमाग एक नेत्यांच्या या चौकशीवरुन महाविकासआघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा आरोप वारंवार महाविकासआघाडीकडून  केला जात आहे.  ईडी, आयटीच्या एकामागोमाग एक धाडी शिवसेना नेत्यांवर पडत आहेत. राहुल कनाल आणि यशवंत जाधव यांच्यावर आयटीची धाड पडली होती तर प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती आणली आहे.  त्यामुळे भविष्यात शिवसेना ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


संबंधित बातम्या :


ED vs Shiv Sena : राज्यात ईडी विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटणार?


Chhagan Bhujbal : ED ची नोटीस मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला, छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha