मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर होणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे येत्या 18 जानेवारीला न्यायालयात हजर राहणार आहेत. यासाठी 12 जानेवारीला परळी न्यायालयात राज ठाकरे हजेरी लावणार होते. परंतु आता ते 18 जानेवारीला हजेरी लावणार आहेत
नेमकं काय प्रकरण आहे?
राज ठाकरेंना 2008 मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
अगोदर 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, आज (12 जानेवारी) राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आहे, त्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली आहे. त्यानुसार, आता त्यांना असून येणाऱ्या 18 जानेवारीला त्यांना हजर परळी कोर्टामध्ये हजर राहावे लागणार आहे.
शिवसेनेच्या होम ग्राऊंडवर राज ठाकरेंची पहिली सभा
नवीन वर्षात राज ठाकरे यांची पहिली सभा शिवसेनेच्या होम ग्राऊंडमध्ये होणार आहे. महापालिकेतील प्रमुख पक्षांना टक्कर देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक समस्यांवर राजकीय पक्ष जोरकसपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. यामध्ये मनसेने देखील 'घे भरारी' अभियान राबवत आता मुंबईकरांच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी सुरुवात केलेली आहे. घे भरारी अभियानांतर्गत प्रत्येक वॉर्डात सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या पक्षाची भूमिका मुंबईत दादरमध्ये (Dadar) आता सभा घेऊन स्पष्ट करणार आहेत.
नवीन वर्षात राज ठाकरे यांची पहिली सभा ही दादर विभागात पार पडणार आहे. 22 जानेवारीला सभा घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र जानेवारीच्या शेवटच्या दहा दिवसात सभा होणार आहे
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Raj Thackeray Meet Devendra Fadnavis : अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला