Sambhaji Patil Nilangekar : देशमुख भाजपात येत नाहीत आणि आम्ही त्यांना घेत नाहीत असा टोला भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilangekar) यांनी आमदार अमित देशमुख (MLA Amit Deshmukh) यांना लगावला. मागील अनेक दिवसापासून लातूर येथील आमदार बंधू अमित देशमुख आणि धीरज देशमुख (MLA Dhiraj Deshmukh) हे भाजपात येणार अशी चर्चा होती. यावर भाजपातून (BJP) आणि काँग्रेसमधूनही (Congress) कधीही उघड बोललं गेलं नाही. सगळ्यांनी सावध भूमिका घेतली होती. यावर बोलतना संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. लातूर (Latur) जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात  पाटील बोलत होते.  


लातूरचे प्रिन्स राजकुमार असलेले आमदार अमित देशमुख हे कधीही जनतेचा प्रश्न घेऊन लोकात गेलेले नाहीत. आता भाजपात येतो अशी हवा त्यांनी निर्माण केली होती. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र, त्यांना आम्ही भाजपात घेणार नाही आणि ते काही भाजपात येणार नाहीत. कारण त्यांचं भाजपात येणं माझ्या युवा कार्यकर्त्यांना बिलकुल आवडणार नाही, असे वक्तव्य संभाजी पाटील निलंगेकरांनी केलं. यावेळी युवा मोर्चाचचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर उपस्थितीत होते. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपाच्या तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.


पालिकेच्या 80 टक्के जागांवर 35 वयाच्या आतील तरुण कार्यकर्त्यांना संधी


आज झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या मेळाव्यात भाजप हे इलेक्शन मोडमध्ये असल्याचं जाणवलं. जे कार्यकर्ते 35 वर्षाच्या आतले आहेत, त्यांनी निवडणुकीची तयारी करावी. यावेळी महानगरपालिकेच्या 80 टक्के जागेवर 35 च्या आतल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यात येण्याचे सुतोवाच संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. 


अमित देशमुख भाजपमध्ये येण्याच्या चर्चेवर पडदा 


आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात येण्याच्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. दरम्यान, भाजप महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. कारण मनपाच्या 80 टक्के जागेवर 35 च्या आतल्या तरुणांचीच निवड केली जाईल असं पाटील यांनी सांगितले.  पक्षातील दिग्गजांना धक्का देण्याचं तंत्र भाजपाने वापरलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


संभाजी पाटील निलंगेकरांच्या अडचणीत वाढ, सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली