Mahadev Jankar on Uddhav Thackeray: पक्षाध्यक्षाचा पक्ष संघटना आणि आमदार खासदार यांचा संपर्क तुटला की, त्या पक्षाची अवस्था शिवसेनेसारखी होते असा टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar)यांनी लगावला. आज पंढरपूर (Pandharpur News updtes) येथे आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या मेळाव्यासाठी आले असता जानकर बोलत होते. नेता कितीही मोठा असला तरी त्याचा थेट संपर्क जनतेसोबत पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी असणे आवश्यक असते. तो संपर्क तुटल्यानेच शिवसेनेची (Shiv Sena) ही अवस्था झाल्याचे जानकर यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जानकर म्हणाले की, पक्षाच्या प्रमुखाचा आपल्या संघटना आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क असणं गरजेचं आहे. नाही तर त्या पक्षाची अवस्था शिवसेना पक्षासारखी होते. नेता कितीही मोठा असला तरी त्याचा संपर्क थेट जनतेसोबत असणे आवश्यक असतो, असं जानकर म्हणाले.
महादेव जानकर यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावरही टोलेबाजी
जानकर यांचे जुने शिष्य आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांच्याकडून सातत्याने पवार कुटुंबाला निशाणा बनवला जात असतो. यामुळे नेहमीच पडळकर आणि पवार कुटुंबाची जुगलबंदी राज्यभर चर्चेत असते. पडळकर यांच्याबाबत निशाणा साधताना जानकर म्हणाले की, टीका करण्यापूर्वी आपण आपली औकात बघून बोलले पाहिजे. पडळकर आता मोठ्या पक्षात आहेत, आमदार झाले आहेत आता त्यांना ही जाणीव येणे गरजेचे असल्याचे खडेबोल जानकर यांनी सुनावले.
आपण भाजपवर नाराज नसून मी एनडीएमध्येच
आपण भाजपवर (BJP) नाराज नसून मी एनडीए (NDA)मध्येच आहे . मात्र सध्या माझे केवळ 2 आमदार असल्याने मला किंमत नाही. आता संघटना मजबूत करून 20 आमदार बनवेन तेव्हा फडणवीस पुन्हा मला बोलावतील असा टोलाही त्यांनी लगावला. येत्या तीन वर्षात रासप अशा स्थितीत येईल कि महाराष्ट्राचे राजकारण ठरवताना एनडीए आणि यूपीए या दोघांनाही आमचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असं महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सांगितले . आजच्या मेळाव्यात महादेव जानकर हे नेहमीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये बसून स्टेजवरील पदाधिकाऱ्यांची भाषणे ऐकत होते .
ही बातमी देखील वाचा