Raj Thackeray Meet Devendra Fadnavis : अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
उद्योगपती गौतम अदानी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. गेल्या काही दिवसांत गौतम अदानी यांनी महाराष्ट्रातल्या चौथ्या नेत्याची भेट घेतली आहे. याआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली आहे. गौतम अदानी यांच्यासोबतच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी काही वेळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. आधी राज ठाकरे आणि गौतम अदानी आणि त्यानंतर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यांमधल्या गाठीभेटींमुळं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे.