छत्रपती संभाजीनगर:  राज्यातल्या 22 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान (Prenatal sex determination)
आणि गर्भपात (Abortion)  होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एका पत्रात याबाबतची माहिती नमुद करण्यात आली आहे आहे.  याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले आहे. 

  


राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि मुलींचे गर्भपात होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात याबाबत माहिती नमूद केली आहे. त्यामुळे या 22 जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तरचे प्रमाण म्हणजे एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण चिंतादायकरीत्या घटल्याचे समोर आले आहे.  तर, जालन्यात सर्वाधिक मुलींचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 


आरोग्य विभागाने पाठवलेल्या पत्रातील  मुद्दे


राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान होत आहे. या जिल्ह्यांमध्ये मुलींचे गर्भपात होत असल्याचे निदर्शनात आले आहे. या सर्व प्रकाराची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या सर्व प्रकारानंतर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुलींचे गर्भपात होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ उपायोजना राबवण्यात याव्यात. या प्रकरणात दक्षता घेऊन योग्य ती कारवाई करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा


 राज्यात मुलींचे गर्भपात होत असलेले जिल्हे  आणि लिंग गुणोत्तर



  1. सिंधुदुर्ग : 1 हजार मुलांमागे 950 मुली 

  2. लातूर : 1 हजार मुलांमागे 918 मुली

  3. सोलापूर : 1 हजार मुलांमागे 911 मुली

  4. नाशिक : 1 हजार मुलांमागे 897 मुली

  5. गडचिरोली : 1 हजार मुलांमागे 940 मुली

  6. अहमदनगर : 1 हजार मुलांमागे 879 मुली

  7. नागपूर : 1 हजार मुलांमागे 923 मुली

  8. धुळे : 1 हजार मुलांमागे 883 मुली

  9. परभणी : 1 हजार मुलांमागे 910 मुली

  10. अमरावती : 1 हजार मुलांमागे 930 मुली

  11. संभाजीनगर : 1 हजार मुलांमागे 883 मुली

  12. रायगड : 1 हजार मुलांमागे 924 मुली

  13. यवतमाळ : 1 हजार मुलांमागे 893 मुली

  14. धाराशिव : 1 हजार मुलांमागे 874 मुली

  15. भंडारा : 1 हजार मुलांमागे 905 मुली

  16. रत्नागिरी : 1 हजार मुलांमागे 911 मुली

  17. गोंदिया : 1 हजार मुलांमागे 947 मुली

  18. नंदुरबार : 1 हजार मुलांमागे 916 मुली

  19. सांगली : 1 हजार मुलांमागे 857 मुली

  20. नांदेड : 1 हजार मुलांमागे 907 मुली

  21. अकोला : 1 हजार मुलांमागे 902 मुली

  22. जालना : 1 हजार मुलांमागे 854 मुली


या प्रकरणातील अधिक तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजावर यावरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.    


हे ही वाचा :


Mobile Sex Determation Diagnosis Center : चक्क फिरते गर्भलिंग निदान केंद्र, फोन करताच डॉक्टर नर्ससह घरी पोहोचायचा