Omraje Nimbalkar : आज केंद्रात, राज्यात भाजपचा सरकार (Bjp Govt) आहे. 2009 पासून मी पवनराजेंच्या हत्या प्रकरणात न्यायासाठी प्रयत्न करत असल्याचे मत खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी व्यक्त केलं. न्यायालयात वारंवार तारखा पुढे ढकलल्या जातायेत. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) गृहमंत्री आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, पवनराजेंचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टाकडे द्या आणि दोन महिन्यात निकाल लावा. सर्व सत्य समोर आणा असेही ओमराजे म्हणाले. मी पद्मसिंह पाटलांचा पराभव केला, राणा जगजितसिंह पाटलांचा (Ranajagjitsinha Patil ) पराभव केला, आता अर्चना पाटील यांचाही पराभव करणार असल्याचे निंबाळकर म्हणाले.


मला वडिलांचा सूड घ्यायचाय पण तो लोकशाही मार्गानं


मला तर राजकारणात यायचंही नव्हतं, माझ्या वडिलांची हत्या करून तुम्ही मला राजकारणात येण्यास भाग पाडलं. मी शपथ घेऊन राजकारणात आलो असल्याचे निंबाळकर म्हणाले. मला वडिलांचा सूड घ्यायचा आहे, मग तो कसा घेणार? लोकशाही मार्गानेच घेणार ना. पद्मसिंह पाटील आणि कुटुंबाच्या 40 वर्षांच्या सत्तेमुळे त्यांची संपत्ती, सोनं वाढलं. मात्र धाराशिव जिल्हा दारिद्र्यात राहिला. पाटलांनी आपल्या स्वार्थासाठी धाराशिव दारिद्र्यात ठेवल्याचा आरोप ओमराजेंनी केला. 


नवरा भाजपमध्ये तर पत्नी राष्ट्रवादीमध्ये, ओमराजेंचा राणा जगजितसिंह यांना टोला


गेले पाच वर्ष गलिच्छ राजकारण सुरू आहे. ईडीची भीती दाखवून पक्ष फोडले जातात. पक्ष आणि चिन्ह गिळंकृत केले जातात. हेच महाराष्ट्र गेले अडीच वर्ष पाहत आहे. जनतेला असं गृहीत धरून केलं जाणारं राजकारण जनता फार काळ सहन करत नाही असंही ओमराजे म्हणाले. मी पाच वर्ष जनतेसाठी राबलो आहे.  माझे नंबर संपूर्ण मतदारसंघात उपलब्ध आहे. सामान्य मतदारांच्या जोरावर ही निवडणूक लाखोंच्या फरकाने जिंकणार असल्याचे ओमराजे म्हणाले. महाराष्ट्रात महायुती झालेली आपण पाहत आहोत. मात्र, कुटुंबात महायुती झालेली फक्त धाराशिवमध्येच पाहायला मिळते. नवरा भाजपमध्ये आहे आणि पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. कुटुंबात झालेली महायुती फक्त धाराशीमध्येच पाहायला मिळते. लोक असा स्वार्थी राजकारण सहन करत नाही असे ओमराजे म्हणाले. 


धाराशिव जिल्हा गेले 40 वर्ष मागास का? 


पद्मसिंह पाटील कुटुंब गेले 40 वर्ष सातत्याने सत्तेत आहे. तरी धाराशिव जिल्हा गेले 40 वर्ष मागास का? असा सवाल ओमराजेंनी केला. पद्मसिंह पाटील कुटुंबाच्या मंत्रिपदाचा सत्तेचा फायदा कोणाला झाला. फक्त पाटील कुटुंबाची संपत्ती, सोनं वाढलं, जिल्हा मात्र दारिद्र्यात राहिला. हे सर्व लोकांना दिसतंय. अशा व्यक्तीच्या कुटुंबात (पद्मसिंह पाटील) उमेदवारी देऊन महायुतीने आपला घात करून घेतल्याचे ओमराजे म्हणाले. 


पाच वर्षात 18 लाख पेक्षा जास्त मतदारांशी फोनवर संपर्क केला


पाच वर्षात मतदारसंघातील 18 लाख पेक्षा जास्त मतदारांशी फोनवर संपर्क केला आहे. हे 18 लाख लोकच माझे प्रचारक आहेत. त्यांना माझ्यापासून इथले आमदार, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे पंतप्रधान हेही हिरावून घेऊ शकत नाहीत असे ओमराजे म्हणाले. 40 वर्ष जी मंडळी धाराशिवचे प्रतिनिधी म्हणून पदावर होती, त्यांच्यामुळे जिल्हा मागास राहिला. लातूर आमच्यापासून वेगळा होऊन महापालिका झालं, मात्र धाराशिव आजवर नगरपरिषद असल्याचे ओमराजे म्हणाले. पाटील कुटुंबांने लोकांना जाणूनबुजून दारिद्र्यात ठेवलं आहे.  त्यांनी इथे मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालय मुंबईत नेलं. एक एक संस्था गिळंकृत केल्या. धाराशिव दारिद्र्यात राहिलं, तर निवडणुकीत पैसे देऊन मतदान (विकत) घेता येतं, म्हणून लोकांना दारिद्र्यात ठेवलं आहे. अत्यंत खालच्या पद्धतीचा राजकारण येथे पाटील कुटुंबाकडून करण्यात आल्याचे ओमराजे म्हणाले. 


माझ्या वडिलांची हत्या करून मला राजकारणात आणलं


मला राजकारणात यायचे नव्हतेच. पण माझ्या वडिलांची हत्या करून मला राजकारणात आणले गेले. पवनराजेंचं राजकारण संपवण्यासाठी 2006 ची घटना घडवण्यात आली. सुपारी देऊन त्यांची हत्या घडवण्यात आली. म्हणून मी शपथ घेऊन राजकारणात आलो की तुम्ही एक पवनराजे संपवला मी तुमच्यासमोर दुसरा पवनराजे उभा करेन असे ओमराजे म्हणाले. माझ्या वडिलांची हत्या केली ती राजकीय द्वेषापोटी केली. हे सत्य नाही का? मग मुलगा म्हणून मला वडिलांच्या हत्येचा सूड घेणं आहेच ना. मग तो सूड मी कसा घेणार. लोकशाही त्याचा मार्गाने घेणार आहे. ज्यांनी हे नीच कार्य घडवलं त्या लोकांना याची थोडीही लाज असली पाहिजे. तुम्ही माझ्यावर वडिलांच्या हत्येचा भांडवल करतो म्हणून आरोप करता मग पवनराजेंची हत्या केलीच का?  त्यांना जिवंत ठेवायला हवं होतं असा सवाल ओमराजेंनी केला.  


महत्वाच्या बातम्या:


Omraje Nimbalkar: खेकडामंत्री लयंच बोलायला लागलाय, फडणवीसांनी पवनराजेंच्या हत्याप्रकरणाचा निकाल एका महिन्यात लावावा: ओमराजे निंबाळकर