Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या (Nashik Graduate Constituency) मतमोजणीसाठी (Vote Counting) अवघे काही तास शिल्लक असून सर्वांच्या नजरा या मतमोजणीकडे राहणार आहे. मात्र ज्या प्रकारे या निवडणुकीची मतदान प्रक्रिया राबविण्यात येते. तसेच मतमोजणी देखील एका विशिष्ट प्रकारे होत असल्याने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांसह मतदारसंघातील मतदार या मतमोजणीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र हि मतमोजणी नेमकी कशी होते हे पाहणे महत्वाचे आहे.
अगदी पहिल्या दिवसांपासून वेगवगेळ्या घडामोडी, नाट्यमय हालचालीमुळे ही निवडणूक लक्षात राहिली आहे. या नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जवळपास 49.28 टक्के मतदान झाले असून 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नाशिक विभागाच्या पाचही जिल्ह्यातून मतपेट्या पहाटेपर्यंत नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी स्ट्रॉंग रूमला पोहोचल्या असून कालच साडेसात वाजेच्या सुमारास स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली. दरम्यान आता उद्या महत्वाचा दिवस असून या दिवसात नाशिक पदवीधर मतदारसंघात नवा पदवीधर आमदार मिळणार आहे. त्याचीच उत्सुकता सर्वाना लागली आहे.
दरम्यान नाशिक पदवीधर निवडणूक मतदानावेळी अनेक मतदारांना मतदान कोण करू शकतो किंवा मतदान करण्यासाठी अट काय? असे सगळे प्रश्न पडले होते. त्याचबरोबर या निवडणुकीची मतमोजणी कशी होणार? हा प्रश्न देखील अनेकांना सतावत आहे. तर इतर निवडणूका आणि शिक्षक पदवीधर निवडणुकांची मतमोजणी यात फरक आहे. शिक्षक पदवीधर निवडणुकीची मतमोजणी ही विशिष्ट पद्धतीने करण्यात येते. मतदानासाठी पसंतीची पद्धत विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया होत नाही. इथे राष्ट्रपती सिनेटसारख्या निवडणुकीतील पसंती क्रमाची पद्धत वापरली जाते. संबंधित मतदार आणि उमेदवारांच्या नुसार आयोग एक कोटा निश्चित करतो. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारे उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसली तर दुसऱ्या पसंतीची मते जो उमेदवार पूर्ण करील तो विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजय होऊ शकतो.
अशी होते मतमोजणी
जर समजा नाशिक पदवीधर मतदार संघाचा विचार केला तर आपल्या मतदार संघात एकूण 2 लाख 62 हजार मतदार आहेत. तर यंदाच्या निवडणुकीत जवळपास 16 उमेदवार रिंगणात आहेत. तर 49 टक्के मतदान हे झाले असून मतदारसंघाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतात. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळविणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसर्या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो.
साध्या सरळ सोप्या भाषेत मतमोजणी ?
तर 30 तारखेला निवडणूक मतदान नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात झाले. या जिल्ह्यातील मतपेट्या हा नाशिक येथील मतमोजणी केंद्रावर पोहचल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी सर्व मतपेट्या उघडल्या जातील. त्यातून बाद मते वगळण्यात येतील तसेच उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार देखील मतपत्रिका वेगळ्या करण्यात येतील त्या संबंधित उमेदवारांच्या बॉक्स मध्ये टाकण्यात येतील. आता आयोगाने ज्या उमेदवारास मतदान संख्येनुसार पसंती दिली असेल असा उमेदवार विजयी होतो. अन्यथा दुसर्या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो.