Nashik Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) कोसळतो आहे. पण शेतकऱ्यांनो घाबरू नका, अवकाळी पावसामुळे जेवढे नुकसान होईल, तेवढे आम्ही भरून देऊ, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे. सर्वत्र अवकाळी पाऊस कोसळत आहे. पण शेतकरी बांधवानो काळजी करू नका, आम्ही सोबत असल्याचे शिंदे म्हणाले. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात (Sinnar) नांदूरशिंगोटे येथे दोन एकर परिसरात गोपीनाथ गड उभारण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, आज ही गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यावर प्रेम करणारी जनता शुभ कार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेतात. ती श्रद्धा, प्रेम आहे, ज्यांनी चांगले काम केले, आपण राज्यात अनेक नेते पाहिले, ते लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले, गोपीनाथ मुंडे हे लोकनेते बिरुदाचे मुकुटमणी होते. त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी न्याय देण्यासाठी अहोरात्र काम केले. कोणाला आवडो न आवडो, परखड बोलणारे होते, सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. 70 च्या दशकात सायकलवर  शबनमची झोळी घेऊन पायी फिरून भाजप वाढविण्याचे काम केले. भाजप शिवसेना युतीचे शिल्पकार गोपीनाथ मुंडे होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. 


एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ज्या ज्या वेळी अडचणींचा संघर्षाचा काळ होता, त्या त्यावेळी बाळासाहेब ठाकरे त्यांना मार्गदर्शन करत असायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते. बाळासाहेब यांचेही मुंडेवर प्रेम होते. मुंढे यांच्या काळात संघर्ष होता. जेव्हा जेव्हा अडचणीचा काळ आला, तेव्हा बाळासाहेब प्रेमाचा सल्ला देत होते. लोकनेता अकाली जाईल, असे कोणाला वाटले नव्हते. ते गेले तो काळा दिवस होता. त्यांनी जे समाजासाठी काम केलं, त्यामुळे शेवटच्या दिवशी जिकडे तिकडे माणसे वणव्यासारखी धावत होते. त्यांचे वक्तृत्व कर्तृत्व शिकण्यासारखे आहे. ते बोलत असताना सन्नाटा असायचा. माणसं जोडण्यासारखी ताकद मुंडे यांच्याकडून शिकण्यासारखी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर, हे मुंडे साहेबांची देणं... 


एकाच व्यासपीठावर एवढी सगळी माणसं आली, ही माणसं मुंढे यांनी जोडलेली आहेत. म्हणून हा सर्व माणसे एकत्र आली. त्याकाळात मिळेल त्या यंत्रणेला सोबत घेऊन काम केले. या राज्यात मोठे काम केले. महाराष्ट्रातील राजकारणाचा पट बदलून टाकणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंढे होय. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण असे काम केले. हाच मूलमंत्र जपून गोपीनाथ मुंढे यांनी राज्यात केलं. आम्ही एकत्र आलो, ही काळाची देशाची गरज होती. म्हणून सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आले. फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. त्यात महिला शेतकरी सर्वाना सामावून घेतले. राज्याच्या प्रगतीवर विकासावर आलेले मळभ दूर केले. गडकरी यांनी मदत केली, तुम्ही पाठबळ दिले म्हणून आम्ही चांगले काम केले. 


पाऊस आशीर्वाद देऊन गेला.... 


आज कार्यक्रम सुरु असताना पाऊस आला. सर्वत्र अवकाळी पाऊस कोसळत आहे. पण शेतकरी बांधवानो काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. राज्यातील अनेक भागात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सर्व ठिकाणी वसतिगृह तयार होतील. तुम्ही सांगितलं की मुंडे यांच्या नावाने हॉस्पिटल उभे करायला हवे, पण मुंडे यांच्या नावाने स्मारक पण होईल आणि रुग्णालयं सुद्धा होतील.