Chhatrapati Sambhaji Nagar News : राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी (Government Employees) जुनी पेन्शनच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी संपावर गेले असून, आज या संपाचा पाचवा दिवस आहे. या मागणीसाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी कामबंदची हाक दिली आहे. दरम्यान यावरुन जुनी पेन्शनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे आता व्यापाऱ्यांनीही (Merchant) आपल्याला पेन्शन (Pension) मिळावी, यासाठी आवाज उठवणे सुरु केले आहे. तसेच बीडच्या (Beed) परळीत एप्रिल महिन्यात होणाऱ्या व्यापारी परिषदेत या मुद्द्यावरुन प्रामुख्याने चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात व्यापाऱ्यांचा पेन्शनचा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे व्यापार क्षेत्र असून, प्रत्येक दुकानदार 30 वर्षापेक्षा अधिक काळ ग्राहकांकडून टॅक्स वसूल करतो आणि शासनाच्या तिजोरीत भरते. त्या दृष्टीने पाहिल्यास व्यापारी शासनाला सेवाच देत आहे. त्यामुळे या मोबदल्यात व्यापाऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळावी. तर जीएसटी जमा करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याने जेवढा कर भरला, त्यातील काही हिस्सा पेन्शन स्वरपात द्यावा, अशी मागणी मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या वतीने करण्यात आली आहे.


मराठवाडा विभागातील सुमारे सव्वालाख कर्मचारी संपावर 


जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी संपावर (Strike) गेले असून, याच संपात मराठवाडा विभागातील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे चौथ्या दिवशी देखील संप सुरुच आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या विभागातील 54 हजार 171 कर्मचारी संपावर असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण सव्वालाख कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना पाहायला मिळत आहे. 


संपाचा फटका रुग्णांना बसतोय...


शासकीय कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक परिणाम आरोग्य विभागात जाणवत आहे. कारण या संपात शासकीय रुग्णालयातील कर्मचारी देखील सहभागी झाले असून, रुग्णांचे मोठ्याप्रमाणावर हाल होताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात देखील याचे परिणाम जाणवत असून, नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली आहे. अशीच काही परिस्थिती असून, गेल्या चार दिवसात नियोजित 28 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे संपाचा परिणाम आता सर्वत्र जाणवत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Government Employees Strike : मराठवाडा विभागातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटिसा