Marathwada Gram Panchayat Election Result 2022: राज्यात झालेल्या सात हजारपेक्षा अधिकच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. तर मराठवाड्यातील 2 हजार 73 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. ज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून ,मराठवाड्यात भाजपला 721 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीला 452 जागांवर विजयाचा झेंडा फडकवता आला आहे. तर सर्वात कमी 123 जागा शिंदे गटाला मिळाल्या आहेत. 

पाहा कोणाला किती जागा...

औरंगाबाद

जिल्हा  भाजप  शिंदे गट  ठाकरे गट  राष्ट्रवादी  काँग्रेस  इतर 
औरंगाबाद  55  65 32 14 10 18
जालना  124 08 31 69 16 18

बीड  (एक जागेवर निकाल नाही)

257 06 13 246 38 00
परभणी  38 03 06 29 02 39
लातूर (एक जागेवर निकाल नाही) 160 03 16 42 80 44
उस्मानाबाद  55 19 31 13 20 28
नांदेड  23 01 24 32 57 44
हिंगोली  09 18 08 08 06 12
एकूण  721 123 161 452 229 203


औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाचं वर्चस्व....

मराठवाड्यात शिंदे गटाला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या असल्या तरीही मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात मात्र शिंदे गटाचं वर्चस्व पाहायला मिळाले आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 65 जागांवर शिंदे गटाला विजय मिळवता आला आहे. तर त्या पाठोपाठ भाजपची ताकद पाहायला मिळाली असून, भाजपला 32 ठिकाणी विजय मिळवता आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाचे 5 आमदार आणि त्यातील दोन कॅबिनेट मंत्री असल्याने याचा मोठा फायदा शिंदे गटाला होतांना पाहायला मिळत आहे. 

Election Results: राज्यात भाजप-शिंदे गट मविआला भारी, भाजपकडे सर्वाधिक 2023 ग्रामपंचायती तर राष्ट्रवादीचे 1215 ठिकाणी वर्चस्व