Aurangabad Gram Panchayat Election Result 2022: औरंगाबाद जिल्ह्यातील 216 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे प्राथमिक निकाल स्पष्ट झाले असून, वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळे दावे केले आहेत. ज्यात औरंगाबाद जिल्हयात शिंदे गटाचे वर्चस्व पाहायाला मिळाले. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून, ठाकरे गट तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात सेनेतील बंडखोरीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. तर भाजपची ताकदही दिसून आली आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यातील आकडेवारी...



  • औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाला 65  जागांवर विजय मिळाला आहे.

  • औरंगाबाद जिल्ह्यात भाजपला 55 जागांवर विजय मिळाला आहे.

  • औरंगाबाद जिल्ह्यात ठाकरे गटाला 32  जागांवर विजय मिळाला आहे. 

  • औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला 14 जागांवर विजय मिळाला आहे.

  • औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळाला आहे.     

  • औरंगाबाद जिल्ह्यात अपक्षांना 10 जागांवर विजय मिळाला आहे.

  • 22  जागांवर वेगवेगळ्या पक्षांनी दावे केले आहेत. 


शिंदे गटाची ताकद वाढली... 


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक पाच आमदार शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा भगदाड पडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिंदे गटाची की ठाकरे गटाची ताकद अधिक आहे याबाबत सतत चर्चा होत होती. मात्र आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटाची ठाकरे गटापेक्षा अधिक ताकद पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला यापेक्षा अधिक ताकद लावावी लागणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 


वेगवेगळ्या पक्षांचे दावे... 


औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली होती. मात्र निकाल हाती आल्यावर वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळे दावे केले आहेत. निवडून आलेल्या प्रत्येक सरपंच आणि सदस्य आपल्याच पक्षाचा असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. त्यामुळे एकूण 22 जागांवर वेगवेगळे दावे केले जात आहे. त्यामुळे या 22 ठिकाणी नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता आली हे स्पष्ट होऊ शकले नाही. तर काही ठिकाणी निवडून आलेले सरपंच आणि सदस्य दोन-दोन ठिकाणी हजेरी लावून आम्ही तुमच्याच पक्षाचे असल्याचे सांगत असल्याचे देखील दिसून आले. तर काहींनी दोन्ही ठिकाणी जाऊन सत्कार स्वीकारत आम्ही तुमच्याच विचाराचे असल्याचे दावेही केले. 


Aurangabad: सख्या मावस भावांच्या बायका रिंगणात, मतेही समान; शेवटी ईश्वर चिठ्ठी काढली आणि...