मुंबई: राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये ताजी अपडेट्स येईपर्यंत भाजपने एकूण 2023 ग्रामपंचायतींवर विजयी पताका फडकवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादीने 1215 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. (Gram Panchayat Election Results 2022)
राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं होतं, आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने .2023, राष्ट्रवादीने 1215, शिंदे गट 772, काँग्रेसने 861, ठाकरे गट 639 तर इतर पक्षांनी 1135 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.
राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सरपंचपदी भाजपचे उमेदवार निवडून आल्याचा दावा भाजपने केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 1873 ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले आहेत. तर त्या खालोखाल राष्ट्रवादीचे 1007 ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. शिंदे गटाने 709 ठिकाणी तर ठाकरे गटाने 571 ठिकाणी आपले सरपंच निवडून आणले आहेत. काँग्रेसने 657 ठिकाणी आपले सरपंच निवडून आणले आहेत. इतर पक्षांनी आणि अपक्षांनी 967 ठिकाणी विजय मिळवला आहे.
Gram Panchayat Election Results: भाजप-शिंदे गट मविआला भारी
ग्रामपंचायती निवडणुकीत एकत्रित विचार करता भाजप आणि शिंदे गट हा महाविकास आघाडीला भारी पडल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे 2795 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीने 27150 ठिकाणी विजय मिळवला. तसेच इतर आघाड्यांनी 1135 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. राज्यातील 616 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत.
Gram Panchayat Election Results : राज्यातील ग्रामपंचायतींचं एकूण बलाबल
भाजप 2023
शिंदे गट 772
ठाकरे गट 639
राष्ट्रवादी 1215
काँग्रेस 861
इतर 1135
Gram Panchayat Election Results : भाजपकडे सर्वाधिक सरपंच
भाजप 1873
शिंदे गट 709
ठाकरे गट 571
राष्ट्रवादी 1007
काँग्रेस 657
इतर 967
भाजप शिंदे गटाने एकूण 2795
मविआ 2795
इतर 1135
निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायती - 7,682
एकूण सदस्य संख्या- 65,916 (त्यापैकी बिनविरोध विजयी सदस्य- 14,028).
निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा- 7,619 (बिनविरोध विजयी सरपंच- 699).
एकूण 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही.