Maharashtra News LIVE Updates : विदर्भात सूर्य आग ओकतोय, नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा वाचा एका क्लिकवर..

ज्योती देवरेLast Updated: 31 May 2024 02:03 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर एकाच वेळी महामेगाब्लॉक ॉघेतला जाणार आहे. ठाणे स्थानकात आज रात्रीपासून पुढील 63 तास मेगाब्लॉक असेल, तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी...More

Nashik : नाशिक विभागीय आयुक्त पदी प्रविण गेडाम यांची नियुक्ती

Nashik : नाशिक विभागीय आयुक्त पदी प्रविण गेडाम यांची नियुक्ती
-
कृषी विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार सोडून नाशिक विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारण्याचे आदेश
-
प्रविण गेडाम यांनी मागील कुंभमेळा काळात नाशिक महापालिकाचे आयुक्त या पदावर केले होते कामकाज
-
आगामी कुंभमेळाकच्या पार्श्वभूमीवर  अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती
-
2002 च्या बॅचचे प्रवीण गेडाम यांनी रेल्वे मंत्र्यांचे सचिव, राज्याचे परिवहन आयुक्त पदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे


विद्यमानआयुक्त राधाकृष्ण गमे आज निवृत्त होत असल्याने प्रवीण गेडाम यांची करण्यात आली नियुक्ती