Kolhapur Crime : नवी मुंबई :  नेरूळ येथील सारसोळे गावातील तीन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी ब्युरो Last Updated: 23 Aug 2023 10:31 PM
नवी मुंबई :  नेरूळ येथील सारसोळे गावातील तीन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू

नवी मुंबई :  नेरूळ येथील सारसोळे गावातील तीन मजली इमारत कोसळली 


मदत आणि बचाव कार्य सुरू, दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती


यामध्ये सहा ते सात जण गंभीर जखमी


जखमींना डी वाय पाटील रूग्णालय दाखल करण्यात आले आहे 

Kolhapur Crime : माझा तिने फक्त वापर केला, मी तिला विसरु शकत नाही, आय एम साॅरी; एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या 
एकतर्फी प्रेमाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मुलीच्या वडिलांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून त्याचे समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.  Read More
देवेंद्र फडणवीसांनी जपानमधून कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळले, नाना पटोलेंची टीका

Nana Patole : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी जपानमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केलं. नाफेडकडून (Nafed) कांदा खरेदी सुरु झाल्याचा दावा खोटा आहे. म्हणूनच आज चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आला असल्याचे नाना पटोले म्हणाले. कांदा निर्यात शुल्क धोरण हे शेतकऱ्यांना फायद्यासाठी नव्हे तोट्यासाठी आणल्याचेही पटोले यावेळी म्हणाले.

बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कांदा निर्यातीवर लावलेला कर रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन,

जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कांदा निर्यातीवर लावलेला कर रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन,


- शेतकरी व कष्टकरी यांच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणविरोधात कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन,


- आंदोलनामध्ये मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, तोलणार संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना, टेम्पो पंचायत संघटना सहभागी

Beed Manjra Dam Water Level: पाणीटंचाईचं संकट! अर्धा पावसाळा संपला तरी, मांजरा धरणात पाण्याची आवक नाहीच; धरणात केवळ 25 टक्केच पाणीसाठा
अर्धा पावसाळा संपला तरी तीन जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्यानं मांजरा धरण मृतसाठ्याकडे जात असून सध्या केवळ 25 टक्के एवढाच पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक राहिला आहे. Read More
Kolhapur Municipal Corporation: राजकीय साठमारीत तब्बल अडीच महिन्यांनी आयुक्त कोल्हापूर मनपाच्या 'दारी'; के. मंजूलक्ष्मी आज पदभार स्वीकारणार
कोल्हापूर मनपाच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या बदलीनंतर तब्बल अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून रिक्त असलेल्या आयुक्त पदावर अखेर के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन


  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.


 राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक


राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 


विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'


छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.


नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी


कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक


लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.