Aditya Thackeray : 'हा 31 वर्षाचा तरुण तुम्हा सगळ्यांना नडणार अन् भिडणार पण... नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंचा इशारा  

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jul 2023 09:18 PM
Irshalwadi: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर; परिसरात प्रवेश करण्यास पर्यटकांना बंदी
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर पोहचली आहे. Read More
Aditya Thackeray : 'हा 31 वर्षाचा तरुण तुम्हा सगळ्यांना नडणार अन् भिडणार पण... नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंचा इशारा  
Aditya Thackeray : नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना आगामी निवडणुकांसंदर्भात इशारा दिला आहे. Read More
Hasan Mushrif on Ajit Pawar: पण भविष्यात नियतीच्या मनात काय आहे हे सांगता येत नाही; हसन मुश्रीफ अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदावर नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादीमधील फुटीर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी आज केलेल्या ट्विटनंतर राजकीय भूवया उंचावल्या आहेत. यावरून बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. Read More
Yavatmal Rain Update :यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात 45 जण अडकले, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Yavatmal Rain Update : यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. Read More
Satej Patil on Hasan Mushrif : कोल्हापुरात महाविकास आघाडी एकसंध, महायुतीसोबत जाण्याचा प्रश्न नाही; सतेज पाटलांनी मुश्रीफांची ऑफर  धुडकावली
मुश्रीफ यांनी दिलेला महायुतीचा प्रस्ताव सतेज पाटील यांनी धुडकावला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची राजकारणातील दोस्ती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. Read More
Irshalgad Landslide: इर्शाळवाडीत तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू; बचावकार्य कुठपर्यंत आलं? वाचा...
Irshalgad Landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalwadi) दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. आज तिसऱ्या दिवशीही त्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. Read More
Sharmila Pawar :  पवार कुटुंबीय म्हणून आम्ही एक आहोत आणि एकच राहणार - शर्मिला पवार 

Sharmila Pawar : पवार कुटुंबीय म्हणून आम्ही एक आहोत आणि एकच राहणार असल्याचे शर्मिला पवारांनी एका जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले. तर जे काही झाले आहे ते प्रेमाने झालं असल्याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे. अजित पवरांच्या बंडानंतर शर्मिला पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.  शर्मिला पवार या अजित पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.