पालघरमध्ये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचं उद्धाटन

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jul 2023 04:36 PM
Palghar : पालघरमध्ये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचं उद्धाटन

ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वयंरोजगार मिळावा या उद्देशाने अजंता अॅग्रो मल्टीस्टेट आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड भारत सरकार कृषी मंत्रालय यांच्यामार्फत कौशल्य विकास केंद्र आणि रोजगार शेती संवर्धन महिला सक्षमीकरण या केंद्रांच उद्घाटन आज डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला. पालघर मधील जव्हार मोखाडा या अतिदुर्ग ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने दोन शिलाई प्रशिक्षण केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. या दोन केंद्रांमध्ये जवळपास 300 पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे येथील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार असून येथील बेरोजगारी कमी करण्यास या केंद्रांची मोठी मदत होईल असा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तर विक्रमगड मधील म्हसेपाडा येथे रस्ता नसल्याने उपचारांअभावी दोन महिन्यांच्या झालेल्या बालिकेच्या मृत्यू बाबत बोलताना सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची काम सुरू असून यात ग्रामीण भागाला जोडण्याची कामही सरकारकडून केली जात आहेत तसेच म्हसे पाडा येथे त्वरित पूल उभारला जाईल अस आश्वासन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिले. 

Akola Rains: अकोल्यात दोन दिवसांतील जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत, रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरुप
Akola Rain Updates: अकोल्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांची प्रचंड वाताहात झाली आहे. तसेच, नदी नाल्यांना पूर आला आहे. Read More
गोसीखुर्द धरणाच्या वितरिकेनं शेतकरी संकटात; अर्धवट आणि तांत्रिक दोषरहित बांधकामाचा फटका, शेतपिकं पाण्याखाली आल्यानं आर्थिक नुकसान
Gosekhurd News : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये हरितक्रांती व्हावी यासाठी भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यात वैनगंगा नदीवर गोसेखुर्द धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. Read More
Nashik Crime : नाशिकच्या गल्लोगल्लीत कोयता गँग! अंबड पोलिसांची अनोखी शक्कल, आता फक्त शेतकऱ्यांसह.... 
Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील मुख्य भागात गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड केली जात आहे. Read More
Sharad Pawar Letter: शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावणं हे शैक्षणिक परंपरेला गालबोट; शरद पवारांचं राज्य सरकारला पत्र, चिंता व्यक्त
Sharad Pawar Letter to Maharashtra Government: शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावणं हे शैक्षणिक परंपरेला लागलेलं गालबोट असल्याचं म्हणत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली आहे.  Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.