Maharashtra Rain Update : आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पावसानं हजेरी लावलेली नाही. काही भागातच पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत. सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यासह मराठवाड्यातही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान आजही कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस, वाहतुकीवर परिणाम
Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक दोन ते पाच मिनिटं उशिराने सुरु आहे. दक्षिण मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दोन्ही बाजूकडील म्हणजे पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत आहे
मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं तर पश्चिम रेल्वेची दोन ते पाच मिनिटं उशिराने
Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक दोन ते पाच मिनिटं उशिराने सुरु आहे. दक्षिण मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दोन्ही बाजूकडील म्हणजे पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत आहे
मुखेड तालुक्यात जोरदार पाऊस
Nanded Rain : मुखेड तालुक्यातील पाळा येथे रात्री अंदाजे 8 च्या सुमारास (दि. 5 ) मुसळधार पाऊस पडल्याने गावालगत असलेल्या नाल्याला पुर आला. शेतात कामाला गेलेल्या नागरीकांना पुर आल्याने गावात येता येत नव्हते. यामुळे जेसीबीच्या सहाय्याने रात्री नाल्यापलीकडील 30 ते 35 नागरीकांना सुखरुप गावाकडे आणण्यात आले. या घटनेकडे तहसिलदार राजेश जाधव हे विशेष लक्ष देऊन नागरीकांच्या संपर्कात होते. तर गावातही काही दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
Mumabi Rain : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर धुक्याची चादर
Mumabi Rain : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल धुक्यात हरवलाय. आज पहाटेपासूनच द्रुतगतीवर धुक्याची दुलई पसरलीये त्यामुळे वाहन चालकांना लाईट लावूनच प्रवास करावा लागत आहे. मात्र या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत वाहन चालक मार्गस्थ होत असल्याचं चित्र सध्या एक्स्प्रेस वेवर दिसून येत आहे..
Maharashtra Rain : उद्या कोकणाला रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा
उद्या कोकणाला रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा.
मुंबई, ठाण्यात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा.
रायगड आणि रत्नागिरीत उद्या काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी.
नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज.
विदर्भातही उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी यलो अलर्ट.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबारमध्ये विजांसह पावसाचा अंदाज.