मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई! मेगा प्लान तयार, ना सिग्नल ना चौक, आधुनिक रस्त्यांसाठी 12 हजार कोटी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Oct 2023 03:04 PM
जळगावचा यश महाले, NDA मध्ये चमक दाखवली, प्रशिक्षणावेळी गंभीर दुखापत; देशाने भावी लेफ्टनंट कर्नल गमावला
Jalgaon Newsखडतर मेहनत घेऊन ही त्याला देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही  दुर्दैवी घटना घडल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. Read More
मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई! मेगा प्लान तयार, ना सिग्नल ना चौक, आधुनिक रस्त्यांसाठी 12 हजार कोटी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर सिडको रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर करणार असल्याचे सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.  Read More
Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्र घेतलं म्हणजे झालं का? मनोज जरांगेंचा सवाल

Manoj Jarange : मोर्चे काढले पण सर्वांनी आरक्षण समजून नाही घेतलं.. घराघरातील लोकांना आरक्षण माहिती होणं गरजेचं होतं..कुणबी म्हणजे शेती.  तुम्ही आता का आरक्षण सोडत नाही हे पक्क झालं आहे. कुणबी प्रमाणपत्र घेतलं म्हणजे झालं का, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.

Manoj Jarange : मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही : मनोज जरांगे

Manoj Jarange : आपल्यातील एका बांधवाने काल आत्महत्या केली. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. मी हार, तुरे स्विकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गावागावात फिरत आहे.मला मराठा समाजाचे वेदना सहन होत नाही

Manoj Jarange LIVE : हे युद्ध रोखण्याचे ताकद कुणाच्यात नाही : मनोज जरांगे

Manoj Jarange LIVE : हे युद्ध रोखण्याचे ताकद कुणाच्यात नाही : मनोज जरांगेहे युद्ध रोखण्याचे ताकद कुणाच्यात नाही.  मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा शब्द आहे माझा. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे मी कधीच जात नाही. मी माझ्या समाजाला माय बाप म्हणतो. मग माझ्या समाजाची काळजी मी नाही करणार तर कोण करणार?  - मनोज जरांगे



 

Manoj Jarange : मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा माझा शब्द आहे...तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही : मनोज जरांगे

Manoj Jarange : हे युद्ध रोखण्याचे ताकद या राज्यात आदेशात कोणाचा आहे मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा शब्द आहे माझा तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही

Devendra Fadnavis : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : वेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. कंत्राटी भरतीचा जीआर त्यांनी रद्द केला आहे.

Devendra Fadnavis : कंत्राटीभरतीची सुरुवात काँग्रेसने केली, आता त्याविरोधात आंदोलन करतायत : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : कंत्राटीभरतीची सुरुवात काँग्रेसने केली. आता त्याविरोधात आंदोलन करतायत या संदर्भात यांना लाजा का वाटत नाही. याचे पाप त्यांचे आहे. त्यांच्या पापाचे ओझे आपल्या सककारने का उचलावे. 

Devendra Fadnavis : पहिली कंत्राटी भरती काँग्रेसकडून : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : काँग्रेस आणि त्यावेळीच्या शरद पवारांच्या सराकारमध्ये झाली.  2010  साली अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला.  सहा हजार कंत्राटी पदाचा जीआर काढण्यात आला. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काळात कंत्राटी शिक्षण भर्तीचा जीआर काढण्यात आला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : कंत्राटी भरतीतले दोषी कोण? हे समजले पाहिजे : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : कंत्राटी भरतीतले दोषी कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पहिली कंत्राटी भरती शिक्षण विभागाकडून झाली आहे. 2003 साली आघाडी सरकारने पहिली कंत्राटी भरती काढली. कॉंग्रेसच्या काळात पहिली कंत्राटी भरती झाली,असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Lalit Patil Drug Case: 10,20,30,40 लाख नव्हे ललित पाटीलची महिन्याची कमाई बघा; डोकं गरगरेल, डोळे विस्फारतील!
ललित पाटीलच्या महिन्याच्या रकमेचा (Lalit Patil Monthly Income) आकडा ऐकून तुमचे डोक गरगरेल सर्वसामान्य  व्यक्तीला आयुष्यभर नोकरी करून जेवढे कमवता येणार नाही तेवढी कमाई तर ललित पाटीलची महिन्याची आहे. Read More
सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यायची की नाही? विधानसभा अध्यक्षांसमोर आज आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी
शिंदे गटाच्या वकिलांकडून याचिकांवर एकत्रित सुनावणीला विरोध केला आहे. प्रत्येक आमदारांची बाजू ऐकून घ्यावी असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. Read More
धक्कादायक! सावकाराच्या जाचाला कंटाळून महिलेने दिली किडनी विकण्याची जाहिरात, नांदेडमध्ये पोस्टर झळकल्याने एकच खळबळ
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच भिंतीवर हे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यांनी लावलेले पोस्टर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून चर्चेता विषय ठरले आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे. त्यांनी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. मात्र त्यापूर्वीच जरांगे पाटलांनी महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं त्यांच्या दौऱ्यातून दिसून येत आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून मराठ्यांनी पाठिंबा दिला होता शिवाय आंतरवाली सराटीतील सभेतदेखील सर्व महाराष्ट्रातून मराठे कोसोदूर प्रवास करत  आले होते. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातील मराठ्यांचा यात सहभाग होता. आज पुणे जिल्ह्यातही तशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळणार आहे. प्रत्येक सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या सभेची तयारी करण्यात येत आहे. आता या सभेत जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


 


दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 


Manoj Jarange Rajgurunagar Sabha Live


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.