Maharashtra LIVE Updates : राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jan 2024 09:52 PM
Ahmednagar : अहमदनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत

Ahmednagar :  अहमदनगर शहरासह परिसरात अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे...छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ अहमदनगर शहरात अवकाळी पावसाने  हजेरी लावली असून, हवामान विभागाने तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार रात्री अचानक पावसाने हजेरी लावली... पावसामुळे शहरात अनेक भागात बत्ती गुल झाली होती...ऐन थंडीत जवळपास अर्धा तास पावसाने हजेरी लावली आहे...अहमदनगरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले..

Beed News : बीड : शिवनी येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लोखंडी रोड आणि बेल्टने जबर मारहाण

Beed News :  बीड तालुक्यातील शिवनी येथील शिवनी माध्यमिक विद्यालयामध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला चार ते पाच जणांनी लोखंडी रॉडने आणि बेल्टने जबर मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्यांच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार लागला असून त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Thane Crime News : ठाण्याच्या उंच इमारतीत १४ व्या माळ्यावर दोन ज्येष्ठ नागरिक पती-पत्नीची अज्ञात व्यक्तींकडून हत्या

Thane News :  ठाण्यातील चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याचे हद्दीतील मानपाडा परिसरामध्ये असलेल्या उंच इमारतीत दोस्ती रेंटल मध्ये 14 व्या माळ्यावर एकटेच राहणाऱ्या जेष्ठ नागरिक पती-पत्नीची अज्ञाताने अज्ञात कारणावरून हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

Sangli News : जत तालुक्यातील उटगी मध्ये दोन सख्ख्या बहीणीला भरधाव कारने उडवले, एकीचा मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी

जत तालुक्यातील उटगी येथे आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन शाळकरी सख्ख्या बहिणींना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकीचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. या घटनेने उमदी, उटगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  या दोन्ही बहिणी उमदी मधील समता नगर येथील डेफोडीयल इंग्लिश मिडीयम स्कुल या ठिकाणी इयत्ता चौथी व दुसरीच्या वर्गात शिकत होत्या

घरात साठवलेला 4 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त





हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड गावातील पंढरपूर नगर येथे एका इसमाच्या घरी  गांजा विक्रीसाठी साठवलेला असल्याची माहिती हिंगोली च्या स्थानिक गुन्हे शाखेला  मिळाले होते त्यावरून हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्या ठिकाणी छापा मारत एकूण चार लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा जप्त केलेला आहे याप्रकरणी दोन आरोपीला हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्या वर्गामध्ये हिंगोली ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे


 




कुख्यात गुंड शरद मोहोळ वर जीवघेणा हल्ला

पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळवर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्याला तीन गोळ्या लागल्याची माहिती मिळाली.

सोलापुरात तब्बल 29 वर्षानंतर रणजी सामना

सोलापुरात तब्बल 29 वर्षानंतर रणजी सामना होतोय. सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडीयमवर महाराष्ट्र विरुद्ध माणिपूर हा सामना खेळवला जाणार आहे. अनेक वर्षानंतर सोलापूरच्या क्रिडांगणावर सामना होणार असल्याने सोलापूरकरामध्ये उत्साह पाहायला मिळाला. सकाळी 10 वाजता ह्या सामान्याची सुरुवात झालीय. सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम हे अत्याधुनिक करण्यात आले. या मैदानावर मागील वर्षभरात अनेक सामने झाले. मात्र रणजी सामना हा तब्बल 29 वर्षानी होतोय. त्यामुळे सोलापुरातील क्रिकेट प्रेमीसाठी ही पर्वणी मानली जातेय. हा सामना पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत खेळाडूंचा उत्साह वाढवला.

राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा केली
आयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा, अभिषेक केला, या दौऱ्या दरम्यान देवस्थानचे पूजारी महंत सुधीरदास यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तसच देवदेवतावर भाष्य करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी ईशनिंदा कायद्या करण्याची मागणी केली. त्यामुळे आजचा रमेश बैस यांचा राम दर्शनाचा दौरा असला तरीही जितेंद्र आव्हाड यांनी  रामा विषयी केलेल्या भाष्य मूळे आजचा देवदर्शनचा दौरा चर्चेत राहिला, दरम्यान  काळाराम  मन्दिर दर्शना नंतर राज्यपाल संदीप युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभासाठी रवाना झाले
ईडीचं सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन
महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीची सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुण्यातील सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू  आहे. 

२०,००० कोटी रूपयांचा घोटाळा आहे.
मराठा आणि ओबीसी समाज आमनेसामने येणार ?

मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा आंदोलन 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे  तर दुसरीकडे ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाज देखील 20 जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. दोन्ही समाजातील आंदोलक आझाद मैदानात आंदोलन करता यावं यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे दोन्ही समाजातील समन्वयकांनी आझाद मैदान पोलिसांकडे पत्र व्यवहार केलेला आहे.  

पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळावा

उद्या छगन भुजबळ आणि इतर सर्व ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत महाएल्गार मेळावा होणार असून यावेळी भुजबळ किंवा इतर नेत्यांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यास तुडवून काढा असा इशारा स्थानिक ओबीसी नेत्यांनी दिला आहे . उद्या शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या टिळक स्मारक पटांगण येथे दुपारी चार वाजता ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे . यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील गावोगावच्या ओबीसी समाजाला निमंत्रणे पोचली आहेत . पंढरपूरचा ओबीसी मेळावा विक्रमी होणार असा दावा ओबीसी नेते माऊली हळणवर यांनी केला असून कोणी भुजबळ अथवा पडळकर याना अडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तुडवून काढू असा इशारा दिला आहे . 

Mumbai Thane News : ठाण्यात सर्वत्र धुक्याची चादर

ठाणे शहरांमध्ये वातावरण बदलांमुळे कधी पाऊस तर कधी गर्मी असतानाच पहाटेच्या सुमारास कळवा परिसरात थंडी असल्याने सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती ज्यामुळे हवेत थंड गारवा संपूर्ण परिसरात धुके पसरल्याने नयनमय दृश्य कळवा पूल आणि शहरातील इमारती ,रस्ते धुक्यात कळवेकरांना पाहायला मिळाले

पुण्यातील ससून रुग्णालयात राडा, भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला मारलं! 

Pune News Update : पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला  मारहाण केल्याचं समोर आले आहे. जितेंद्र सुरेश सातव या राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाच्या मदत केंद्राच्या प्रमुखाला मारहाण करण्यात करण्यात आली आहे.  पुण्यातील ससून रुग्णालयात एका उद्घाटन कार्यकर्मावेळी अजित पवार विविध उद्घाटन करायला आलेले असताना हा प्रसंग घडला आहे. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात हे घडलं.


ससून रुग्णालयात उद्घाटन कार्यक्रमात पाटीवर नाव नसल्यामुळे आमदार सुनील कांबळे संतपप्त झाले, त्यांना राग अनावर आला. याबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सुनील कांबळे यांच्या कानशीलात लगावल्याचं समजतेय. दरम्यान, याबाबत जितेंद्र सातव यांना विचारण्यात आले, त्यावर ते त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देईल, असे ते म्हणाले.

सांगली जिल्ह्यात जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून सात लाखांचे दागिने जप्त

 सांगलीतील विटा आणि आटपाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करत सोने-चांदीचे ऐवज लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केलेय. आण्णा दौलुशा पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सहा लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.  एलसीबीचे पथक सांगली शहरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना माहिती मिळाली की, संशयित पवार हा दागिने विक्रीच्या तयारीत आहे. त्यानुसार शहरातील शिवाजी क्रीडांगणाच्या प्रवेशव्दाराजवळ सापळा लावून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील चौकशीत आटपाडी आणि विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने घरफोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली.


 

 

 
सेलूच्या बाजार समितीच्या यार्डमध्ये जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ

वर्धा : सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील मार्केटयार्डमध्ये  जनावरांच्या खरेदी विक्रीचा शुभारंभ  करण्यात आला. बाजारात विक्रीकरिता आलेल्या बैलांची पूजा करून बाजार  सुरू करण्यात आलाय. दर आठवड्याला मंगळवारी सेलू येथे बैल बाजार भरत होता, मात्र कोरोनामुळे गत चार वर्षांपासून बैल बाजार बंद होता, बाजार समितीच्या यार्डमध्ये आज प्रारंभ झाला आहे,  यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आपली बैलं व जनावरे विक्रीकरिता आणली होती.

महायुतीच्या नेत्यामध्ये  आतापासूनच विधानसभा  मतदारसंघावर रस्सीखेच




लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप अद्याप बाकी असतांना महायुतीच्या नेत्यामध्ये  आतापासूनच विधानसभा  मतदारसंघावर रस्सीखेच सुरू झालीय.. सलग दोन वेळा नाशिक मध्य मतदारसंघातुन निवडून आलेल्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यां मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचे भावी आमदार या मजकुरासह होर्डिंग्ज लागल्यानं चर्चेला उधाण आलंय. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवरील शरद पवारांचा  फोटो ही लक्ष वेधून घेत आहे. नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे वाटाघाटीत तिन्ही मतदारसंघ पुन्हा भाजपाकडे जाण्याची दाट शक्यता असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या होर्डिंग्जमुळे महायुतीतील चढाओढ अधोरेखित झालीय. रंजन ठाकरे यांच्या होर्डिंग्ज समोरच देवयानी फरांदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे होर्डिंग्ज लावण्यात आल्याने महायुती च्या दोन्ही प्रमुख पक्षात होर्डिंग्ज वॉर बघायला मिळत आहे. आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांन




Lok Sabha Election 2024: भाजपला भावना गवळी लोकसभा उमेदवार म्हणून नापसंत, म्हणूनच आयकर विभागाची नोटीस : सुनील महाराज

Lok Sabha Election 2024: शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींना लोकसभा उमेदवार म्हणून भाजपाची नापसंती, त्यामुळेच भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस. पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांचं वक्तव्य. बंजारा समाज भावना गवळींच्या मागे उभा राहणार नसल्याचंही केलं स्पष्ट.

Lok Sabha Election 2024: भाजपला भावना गवळी लोकसभा उमेदवार म्हणून नापसंत, म्हणूनच आयकर विभागाची नोटीस : सुनील महाराज

Lok Sabha Election 2024: शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींना लोकसभा उमेदवार म्हणून भाजपाची नापसंती, त्यामुळेच भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस. पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांचं वक्तव्य. बंजारा समाज भावना गवळींच्या मागे उभा राहणार नसल्याचंही केलं स्पष्ट.

Asaduddin Owaisi on Malang Gad : तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला अशी भाषा शोभत नाही : असदुद्दीन ओवेसी ओवैसी

Asaduddin Owaisi on Malang Gad : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही, खासदार असदुद्दीन ओवैसी आक्रमक, मलंगगड मुक्तीच्या भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

Sandeep Deshpande on Sewri Nhava Sheva Toll : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी अडीचशे रुपये टोल पाच वर्षासाठी करा, निवडणुकीनंतर टोल वाढवू नका; मनसेची मागणी

Sandeep Deshpande on Sewri Nhava Sheva Toll : शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवरील 250 रु.टोलवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला काही सवाल केलेत. निवडणुका आहेत म्हणून 250  रुपये टोल केला का? आणि जर 250 रु. टोल घेणार असाल तर पुढचे 5 वर्ष हाच टोल ठेवावा अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केलीए. याशिवाय देशपांडे यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये वैचारिक साम्य असल्याचंही म्हंटलंय. 

Natya Sammelan : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात शंभरावं नाट्य संमेलनाचं आयोजन

Natya Sammelan : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात शंभरावं नाट्य संमेलनाचं आयोजन. आज संध्याकाळी गणेश कला क्रीडा रंगमंच कार्यक्रमाचं आयोजन. शुभारंभ सोहळ्याचं शरद पवार, अजित पवारांना निमंत्रण. दोघे एकत्र उपस्थित राहाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष.

Palghar Wether Updates: पालघरमध्ये दाट धुक्याची चादर, पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने

Palghar Wether Updates: पालघरमध्ये दाट धुक्याची चादर, पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने. पश्चिम रेल्वेच्या डहाणूकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने. दाट धुक्यामुळे वाहतूक उशिराने. महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम. पालघरच्या पश्चिम भागांत धुक्यांमुळे वाहतूक उशिराने सुरू असल्याने पहाटे कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांची कार्यालयाची वेळ चुकणार. दाट धुक्यामुळे काही अंतरावरील दृश्य ही दिसेनास.

Mukesh Ambani vs Gautam Adani: अब्जाधीश मुकेश अंबानींना गौतम अदानींनी मागे टाकले 

Mukesh Ambani vs Gautam Adani: अब्जाधीश मुकेश अंबानींना गौतम अदानींनी मागे टाकले 


जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीत अदानी आता 12 व्या स्थानावर 


अदानींचे नेटवर्थ 97.6 अब्ज डाॅलर्सवर तर अंबानींचे नेटवर्थ 97 अब्ज डाॅलर


अदानी समुहाच्या समभागांमध्ये मागील काही दिवसातील उसळीनंतर अदानींची पुन्हा एकदा टाॅप-10 कडे कूच

Breaking News: 'प्रिस्क्रीप्शनशिवाय ऑनलाईन औषध विक्रीवर लवकरच निर्बंध'; मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांची माहिती

Breaking News: डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय ऑनलाईन औषधांच्या विक्रीवर लवकरच निर्बंध आणणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी दिलीय. तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय ऑनलाईन औषधांची सुरू असलेल्या विक्रीविरोधात अनेक तक्रारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे आलेल्या आहेत. या तक्रारींनुसार लवकरच अशा ऑनलाईन विक्री करण्यावर निर्बंध आणण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे, मंत्री आत्राम म्हणालेत.

मुंबई-गोवा हायवेवर आज अवजड वाहनांना बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

Maharashtra News: शासन आपल्या दारी कार्यक्रमाला सुमारे 75 हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दुपारी 12 पासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांची महामार्गावर वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

रायगडच्या माणगावात आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील लोणारे येथे शासन आपला दारी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. यावेळी जिल्हाभरातून सुमारे 75 हजार नागरिक कार्यक्रमाला हजर असतील अशी माहिती आहे. दुपारी साडेबारा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमात दरडग्रस्त तळीयेवासियांना त्यांच्या हक्काची घरं दिली जाणार आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.