NCP Jayant Patil On Ajit Pawar: जयंत पाटील यांचा अजित पवारांना मिश्किल टोला, दादांनी माझ्या प्रदेशाध्यक्षपदाची...

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 21 Jun 2023 10:17 PM
Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! शहरातील पहिली मेट्रो चालवण्याचा मार्ग मोकळा, CMRS कडून परवानगी
Navi Mumbai Metro:  नवी मुंबईत आता लवकरच मेट्रो धावणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सिडकोला सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. Read More
NCP Jayant Patil On Ajit Pawar: जयंत पाटील यांचा अजित पवारांना मिश्किल टोला, दादांनी माझ्या प्रदेशाध्यक्षपदाची...
NCP Jayant Patil: विरोधी पक्षनेते पद काढून संघटनेत जबाबदारी द्यावी अशी मागणी केल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांनी मिश्किल टोला लगावला आहे. Read More
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस साताऱ्यात

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस साताऱ्यातील दरे गावात असणार आहेत. त्यांच्याच गावी त्यांचा दोन दिवस मुक्काम असणार आहे.

Kisan Sabha Protest : 'कांद्याला हमी भाव द्या, पीक कर्ज तात्काळ मंजूर करा', किसान सभेचा चांदवड प्रांत कार्यालयावर मोर्चा
Kisan Sabha Protest : 'जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा मोर्चा इथून हलणार नाही', असा इशारा देण्यात आला आहे. Read More
Grafting Method : एका रोपात घ्या तीन प्रकारच्या भाज्या, काय आहे ग्राफ्टिंग? कोणकोणत्या प्रकारे ग्राफ्टिंग करता येते?
Grafting For Plants : आता तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी आता एकाच रोपात तीन प्रकारची पिके घेऊ शकतील. या टेक्निकचे नाव आहे 'ग्राफ्टिंग' (कलम कलम करणे/प्रत्यारोपण). या पद्धतीचा वापर करुन तुम्ही कमी जागेत अनेक पिके घेऊ शकता. Read More
Burning Truck : ट्रकमधून ड्रायव्हरने वेळीच उडी मारली म्हणून.... धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार
Nandurbar News : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात चालत्या ट्रकला भीषण आग (Fire) लागली. Read More
Kolhapur News: कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठण गोपाळ अन् शाहू मिल कॉलनीत पाण्याची टाकी फुल्ल होऊन लोकांच्या घरात शिरले पाणी
शाहू मिल काॅलनी परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरून परिसर जलमय झाला, तरी मनपा प्रशासनाचे डोळे उघडले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. हजारो लिटर पाणी महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे वाया गेलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान  


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान होणार आहे पालखी प्रस्थान दु. 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत.  १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.


आज राष्ट्रावादीचा 25 वा वर्धापन दिन 


   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासाठी आज शरद पवार दिल्लीत. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल.  प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार  आहेत. राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई  विभागीय  राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या  वतीने आज सकाळी  09.30 वाजता मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम  आयोजित केलाय. यावेळी खासदार जयंत पाटील , छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार उपस्थित राहणार आङेत. 


  नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा


 नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल सावे, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित राहतील. या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतील. सकाळी 11 वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. त्यानंतर भाजप कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केलीय त्या दृष्टीने नवीन नियुक्त्या केल्यात त्यापासून महाजन याना नाशिकपासून दूर ठेवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यानंतर महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.