Maharashtra News LIVE : देशभरातील सर्व शहरांतील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 02 Apr 2024 12:44 PM
Rajan Salvi ACB Case Update : जामिनासाठी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हायकोर्टात 

Rajan Salvi ACB Case Update : एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर जामिनासाठी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हायकोर्टात 


यापूर्वी अंतरिम जामीन दिल्यानंतर आज पुन्हा सुनावणी 

 

जामिनावरील सुनावणीसाठी साळवी यांचा 60 वा नंबर 

 

काल मोठ्या मुलाचा लग्न सोहळा उरकल्यानंतर आज साळवी सुनावणीसाठी हायकोर्टात 

 

सुनावणीसाठीचा साठावा नंबर असल्याने आज सुनावणी होईल का नाही? याबाबत शंका 
Amravati News : बच्चू कडू देशाचे मोठे नेते आहेत, रवी राणांची खोचक टीका

अमरावती : बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर जोरदार टिका केल्यावर आता आमदार रवी राणा यांनी देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जो व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी आपल्या पदासाठी राजकारण करतो त्यावर बोलायची मला फारशी गरज नाही. ते देशाचे फार मोठे नेते झालेले आहेत. त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागी नेऊन बसवावे जेणेकरून ते आपल्या भारतावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवू शकतील. ते फार आंतरराष्ट्रीय स्तरावरची व्यक्ती आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. सध्या मी जनतेच्या सेवेत व्यस्त आहे असं प्रतिउत्तर रवी राणा यांनी दिलं. 

Buldana Lok Sabha : बुलढाण्यात रविकांत तुपकर आणि प्रतापराव जाधव उमेदवारी अर्ज भरणार

Buldana Lok Sabha : बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर सलग तीन टर्म खासदार असलेले शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आलीय. महायुतीकडून ते देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याआधीच बंडखोरी करत शिवसेनेचे संजय गायवाड आणि भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ही बंडखोरी कायम राहिल्यास याठिकाणी महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यताय. 

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालीय. तरीही महाराष्ट्रातील ४८ मधील असे काही मतदारसंघ आहेत, जे उमेदवारांच्या प्रतीक्षेत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये घटकपक्षांना जागा सुटल्या असल्या तरी त्यांना पक्षांना उमेदवार मिळत नाहीत किंवा उमेदवार निश्चित होत नाहीत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास उशीर लागत आहे. तर काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी एकाच लोकसभा मतदारसंघात एकापेक्षा अधिक जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे तिथेही पेच निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अजूनही एखादा लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाने लढवावा यावर एकमत होत नाहीये.

Nagpur : नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा आज दक्षिण पश्चिम नागपुरात

Nagpur : नागपुरात नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आज दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून जातेय. दक्षिण पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ. त्यामुळे गडकरींसोबत स्वतः फडणवीस या रॅलेत सहभागी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून गडकरी यांना 65 हजारांची मोठी आघाडी मिळाली होती. या निवडणुकीतही ती आघाडी कायम राहून त्यात भर पडावी, यासाठी भाजपचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. 

MNS, Lok Sabha Election 2024 : मनसेच्या महायुतीत सहाभागी होण्याच्या चर्चा थंडावल्या?

MNS, Lok Sabha Election 2024 : मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी दिल्ली ते मुंबई सुरू असलेल्या चर्चा आता थंडावल्या आहेत. मनसेने भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही प्रस्ताव फेटाळल्याची एक्स्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आहे. मनसेने लोकसभा निवडणूक महायुतीतल्या एखाद्या पक्षाच्या चिन्हावर लढावी हा प्रस्ताव मनसेने अमान्य केलाय. तसंच मनसेने लोकसभा जागा न लढवता त्यांना राज्यसभा आणि विधानपरिषदेत जागा दिल्या जातील हा प्रस्तावही मनसेने फेटाळल्याची माहिती आहे. महायुतीत सहभागाबाबत राज ठाकरेंनी दिल्लीवारीही केली, तिथे त्यांची अमित शाहांशी भेटही झाली. त्यानंतर राज्यात मनसेला भाजप सेनेने सोबत घेण्यासंदर्भात सर्व बाबींची चर्चा झाल्या. यासंदर्भात प्राथमिक पातळीवर भाजप शिवसेना मनसे नेत्यांपासून वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली . मात्र वाटाघाटी संदर्भात सविस्तर चर्चा करत असताना एकमेकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने  युतीची बोलणी थांबल्याचे चित्र सध्या आहे

Bhavana Gawali, Yavatmal News : खासदार भावना गवळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Bhavana Gawali Yavatmal News : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात  महायुतीतला तिढा कायम आहे. खासदार भावना गवळी यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आता फडणवीसांच्या भेटीनंतर यवतमाळ वाशिममधील लोकसभा उमेदवाराबाबत तोडगा निघतो का याची उत्सुकता आहे. फडणवीस आणि गवळी यांच्यात सुमारे 25 मिनिटं चर्चा झाली. भेटीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्या. दरम्यान यवतमाळ वाशिममध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या नावाचीही चर्चा आहे. 

Suresh Navale on Mahayuti Disput : भाजप सर्व्हेच्या नावाखाली शिंदेंना फसवतंय, मात्र...; माजी मंत्री सुरेश नवलेंची टीका

Suresh Navale on Mahayuti Disput : महायुतीत शिवसेना नाराज असून भाजप मित्रपक्षांना संपवतंय अशी टीका माजी मंत्री सुरेश नवले यांनी केलीय. भाजप सर्व्हेच्या नावाखाली शिंदेंना फसवतंय, मात्र शिंदे भाजपसमोर झुकणार नाहीत अशी टीका सुरेश नवले यांनी केलीय. 

Sanjay Shirsat on Lok Sabha Election : महायुतीत जागावाटपावरून अजूनही कुरबुरी? जाहीर झालेल्या जागांवर उमेदवार बदलला जाऊ शकतो, आमदार शिरसाट यांचं वक्तव्य

Sanjay Shirsat : शिवसेनेनं घोषित केलेल्या आठपैकी एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो अशी शक्यता आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलीय. एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात, शक्यता नाकारता येत नाही असं शिरसाट म्हणाले. हिंगोली किंवा हातकणंगले किंवा या दोन्ही जागांवर हे होऊ शकतं असं शिरसाट म्हणाले. सध्या हिंगोली, यवतमाळ वाशिम, हातकणंगले या मतदारसंघात उमेदवार बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

Nashik Lok Sabha: नाशिक लोसकसभेसाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे आज 11 वाजता घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक : शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा मुंबईत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ते भेट घेतील, आणि नाशिकची उमेदवारी आपल्य़ालाच मिळावी, या आग्रहाचा पुनरुच्चार करतील. नाशिक मतदारसंघावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहेत. त्यातच, नाशिकमधून छगन भुजबळांना तिकीट मिळणार, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्यानं गोडसे सोमवारी रात्री तातडीनं मुंबईकडे रवाना झाले. आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री शिंदे आणि गोडसेंमध्ये चर्चा होणार आहे असं कळतंय. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.