Maharashtra News LIVE Updates : देश विदेशातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अमर काळे यांचा राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश
अमर काळे यांनी राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे वर्ध्यातून महाविकास आघाडीकडून अमर काळे यांची लोकसभेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
काही सांगता येत नाही, 18 तारीख लांब आहे - पंकजा मुंडे
प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेले बजरंग सोनवणे हे सध्या तरी विरोधक आहेत मात्र आणखी काही सांगता येत नाही 18 तारीख आणखी लांब आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी दरवेळी भाजपच्या विरोधात निवडणूक लढणारा पुन्हा भाजपमध्ये येतो या प्रश्नाला उत्तर देताना काहीही होऊ शकतं, असा सूचक इशारा दिला आहे.
























