Maharashtra Live Update: सोलापुरच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीसांना खास गिफ्ट

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Apr 2024 11:25 AM
Solapur News: सोलापुरच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीसांना खास गिफ्ट

Solapur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.. या दौऱ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सोलापुरात पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देण्यासाठी सोलापुरातील एका कार्यकर्त्याने खास चादर तयार केलीय. सोलापूरची चादर ही संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. याचं सोलापुरी चादरवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा रेखाटून नेतृत्व महाराष्ट्राचे, भविष्य भारताचे असा उल्लेख करण्यात आलाय. 

Pune News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून खास पगडी

Pune News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुण्यात रेसकोर्स इथे भव्य सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे. दिग्विजय योद्धा पगडी अस या पगडीला नाव देण्यात आले आहे. 

Mumbai Goa HighWay:  मुंबई गोवा हायवेवर वाहतुकीचा खोळंबा

Mumbai Goa HighWay:  मुंबई गोवा हायवेवर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.  नागोठणे मधील सुकेळी खिंडीत एक तासाहून रस्त्यांवर वाहनांच्या रांगा  लागल्या आहेत.  ट्रॅफिक पोलिसांची कमतरता अभावी वाहनाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. नागोठणे ते कोलाड परीसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा  लागल्या आहेत. रस्त्यात वाहने बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.  

Arvind Sawant: ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

Arvind Sawant: दक्षिण मुंबई मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी  अरविंद सावंत यांनी सपत्नीक सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं

Nashik News:  नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Nashik News:  नाशिकमधून शांतीगिरी महाराज आज लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत..  यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून गोदाघाटातून रॅली काढण्यात येणार आहे.,.

Dhule Lok Sabha: धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आज अर्ज भरणार

Dhule Lok Sabha: धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी 11 वाजता शहरातील मनोहर चित्र मंदिरापासून भव्य रॅली काढण्यात येणार आहे ...उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील जिजामाता विद्यालय परिसरात जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आलंय.. या रॅलीसाठी आणि सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार होते मात्र राज्यात होणाऱ्या मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय..  

Rahul Shewale:  महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज भरणार

Rahul Shewale:  महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज भरणार आहे.  अर्ज दाखल करण्याआधी महायुतीचं शक्तिप्रदर्शन करणार आहे.   राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार आहेत.  

Sambhajinagar News: चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

Sambhajinagar News:  13 मे ला होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज माघे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ज्यात मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. ((उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 44 अर्ज वैध ठरले, जालना लोकसभेत 35 आणि बीड लोकसभा मतदारसंघात 55 अर्ज वैध ठरले होते. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे 

PM Modi Sabha:  सोमवारी सोलापूर, कराड आणि पुण्यात मोदींची सभा

PM Modi Sabha:  देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या महाराष्ट्रात अनेक सभांचे आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान मोदींच्या आज आणि उद्या ६ सभा होणार आहेत. मोदींच्या आज सोलापूर, कराड आणि पुण्यात सभा होणार असून मंगळवारी लातूर, माळशिरस, धाराशिवला सभा होतील.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  ठाकरे गटाचे मुंबई आणि ठाण्यातील उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.