Maharashtra News LIVE Updates : वसई विरारच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी काँग्रेसचे आंदोलन, पालिकेच्या कार्यालया समोर बेमुद्दत आमरण उपोषण

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Feb 2024 03:26 PM
Congress Hunger Strike : वसई-विरारमध्ये काँग्रेसचं आंदोलन, पालिकेच्या कार्यालया समोर बेमुद्दत आमरण उपोषण

Vasai-Virar News : वसई विरार महापालिका हद्दीतील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी काँग्रेसने आजपासून पालिकेच्या विरार येथील मुख्य कार्यालया समोर बेमुद्दत आमरण उपोषण सुरू केलं आहे. काँग्रेस च्या पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर वर्तक यांनी हे उपोषण सुरू केले आहे.  काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. वसईतील 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना तात्काळ सुरू करा, वसईच्या दिवणमान येथील सर्व्हे नंबर 176 मधील प्रलंबित सर्वधर्मीय स्मशान भूमीचे काम सुरू करा, भूमाफियांच्या अनधिकृत मातीभराव मुळे बुडणाऱ्या वसईला वाचविण्यासाठी 12 कोटी रुपये खर्च करून, आय.आय.टी.आणि निरी च्या अहवालातील धरण तलावाच्या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

Bhokar BJP Entry : भोकर तालुक्यातील 60 गावच्या सरपंचाचा भाजपात प्रवेश

भोकर तालुक्यातील 60 गावच्या सरपंचाचा भाजपात प्रवेश


अशोक चव्हाण यांच्या उपस्थित सरपंच संघटना भाजपात


नांदेड भाजपात इन्कमिंग, काँग्रेसमध्ये आउटगोइंग सुरूच


खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थिती रोजच पक्षप्रवेश सोहळे

Ahmednagar Crime : तलवारीचा धाक दाखवून दहा लाख रुपये लुटले

Ahmednagar Crime News : शेवगाव येथील तिरुपती कॉटन इंडस्ट्रीचा चेक बडोदा बँकेत देऊन दहा लाख रुपये घेऊन येताना कंपनीतील फिर्यादी कर्मचाऱ्यास तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडून दहा लाख रुपये लंपास करणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे... शेवगाव येथील बडोदा बँकेच्या काही अंतरावर 28 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती... तेव्हापासून आरोपी फरार झाले होते, या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले होते... त्यानुसार आरोपींचा शोध घेत असता आरोपी शेवगाव येथील त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती...त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून आरोपीच्या राहत्या घरातून आरोपी चेतन प्रमोद तुजारे 19 वर्ष आणि समाधान विठ्ठल तुजारे 20 वर्ष या दोघांना अटक केली आहे...दरम्यान यांचा तिसरा साथीदार अर्जुन तुजारे हा अद्यापही फरारच आहे... दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींकडून दहा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून यशवंत सेना आक्रमक, आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन
Mumbai Dhangar Protest : यशवंत सेनांकडून मुंबईत धनगर आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन केलं जातंय. हे सर्व आंदोलक  फ्री मार्गाने मुंबईत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवल्याने मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. मोठ्या संख्येने  रांगेत आंदोलकांची वाहन मुंबईच्या दिशेने आली आहेत. ज्याप्रकारे मराठा समाजाला विशेष अधिवेशन बोलून आरक्षण राज्य सरकारने दिलं. अगदी तशाच प्रकारे या अधिवेशनात धनगरांना आरक्षण द्यावं, ही मुख्य मागणी घेऊन यशवंत सेना हे आंदोलन करत आहे. धनगर आरक्षणासाठी तीन महिन्याचा कालावधी राज्य सरकारने दिला होता आणि तो कालावधी उलटून सुद्धा कुठल्याही प्रकारे हालचाल होत नसल्याने ही आंदोलन करत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं.
Dighi Tempo Accident : दिघी येथे भर समुद्रात टेम्पो उलटला

Dighi Tempo Accident : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे समुद्रात मच्छी ने भरलेला पीक-अप टेम्पो बुडाल्याचा प्रकार समोर आला आहे  दिघी येथील आतिफ आसिफ काद्री यांच्या मालकीची पीक-अप क्रमांक MH 06 BW 6196 ही नेहमी प्रमाणे काल रात्री दहा वाजता च्या सुमारास मासे भरण्याकरिता समुद्राच्या जेट्टीच्या कडेला उभी  होती मात्र मच्छी भरत असताना हा टेम्पो पीक-अप शेवाळीच्या कारणास्तव हँड ब्रेक असूनही पुढे सरकला, गाडी पुढे सरकत असल्याचा लक्षात येताच ड्रायव्हर ने तिला रोकण्याचा प्रयत्न केले पण तो अपयश ठरला. गाडीमध्ये मच्छीचा लोड असल्याने गाडी वेगाने पुढे सरकली आणि थेट समुद्रात गेल्याची ही घटना घडली. स्थानिकांनी   हायड्रा आणि जेसीबीच्या सहाय्याने  हा टेम्पो काढून बचाव केलं असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Supriya Sule in Baramati : बारामती सुप्रिया सुळे यांचा जनता दरबार
Supriya Sule in Baramati : सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामती येथील भिगवन चौकात सुरू केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात सुप्रिया सुळे यांचा जनता दरबार सुरू आहे. या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली आहे या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करीत आहेत.
Lok Sabha Election 2024 : भाजप निवडणूक निरीक्षकांची उद्याच बैठक

BJP Lok Sabha Election 2024 : भाजप निवडणूक निरीक्षकांची उद्याच बैठक


सर्व निवडणूक निरीक्षक उद्याच घेणार बैठक


लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार


स्थानिक खासदाराच्या कामगिरीचा घेणार आढावा


स्थानिक खासदारास दोन पर्याय कोण? याचीही चाचपणी करणार

पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई, 3 कोटी 77 लाख रुपयांची होती थकबाकी

पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई ..


डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने पालिकेने केल सील...


मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली कारवाई...


तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची होती थकबाकी...


पुण्यात अनेकांनी थकवला आहे मालमत्ता कर...


सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे...

जालना जिल्ह्यात गारपीट, 11 हजार 691 हेक्टरवरील पिकांना फटका

जालना जिल्ह्यात गारपीट, दोन तालुक्यात 11 हजार 691 हेक्टरवरील पिकांना फटका


जालना जिल्ह्यात गारपिटीमुळे एकाच दिवसात  11 हजार 691 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून बाधित झालेल्या 66 गावांमध्ये 20 हजार 800 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय, 26 फेब्रुवारी रोजी रात्री जिल्ह्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यात  गारपिटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा सह फळपिकांना मोठा फटका बसला, या पावसात 7 जनावरे दगावले असून 2 जणांचा वीज पडून मृत्यू झालाय.

Jejuri Crime News : जेजुरी पोलिसांचा भोसलेवाडी परिसरात हातभट्टीवर छापा
Jejuri News : जेजुरी पोलिसांनी भोसलेवाडी जवळ बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्टी वर छापा घातला. या छाप्यात 275 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच सुमारे सात हजार लिटर दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले. गेलं पंधरा दिवसात जेजुरी पोलिसांनी अनेक दारू भट्टी, दारू धंदे आणि अवैध धंद्यावर छापे मारले आहेत.
Chandrapur News : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 48 तासांच्या काम बंद आंदोलन

चंद्रपूर : राज्यभर वीज मंडळाच्या आज पासून सुरू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 48 तासांच्या काम बंद आंदोलनात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी ही सामील, कंत्राटी कामगारांना 30 टक्के वेतन वाढ देण्याची आणि शाश्वत रोजगार देण्याची आहे. प्रमुख मागणी, वीज मंडळाच्या तीनही कंपन्यांमधील सुमारे 65000 कर्मचारी गेलेत संपावर, गेली अनेक वर्ष शासनाशी पाठपुरावा करून देखील प्रमुख मागण्यांवर निर्णय होत नसल्याने संतापले कर्मचारी, 5 मार्चपासून राज्यात बेमुदत संप करण्याचा इशारा दिलाय.

Asha Shyamsundar Shinde Wife : श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

Asha Shyamsundar Shinde Wife : लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे यांचा आज दुपारी 3 वाजता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे, आशा शिंदे या खा चिखलीकर यांची सखी बहीण आहे, आता पुढची लोकसभा ही भाव बहिणीत होणार आहे त्यामुळे आता नांदेडच्या लोकसभे मध्ये सगळ्याचे लक्ष लागले आहे

कापसाला 14 हजार भाव मिळाला, आमदार सुनील भुसारा आक्रमक, गळ्यात कापसाची माळ घालून सरकारचा निषेध

कापसाला 14 हजार भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी  शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा आक्रमक झाले आहेत. त्यांनी गळ्यात कापसाची माळ घालून आज सरकारचा निषेध केला. 

Girish Mahajan : शिवसेनेनं राज्यात एक जागा जिंकून दाखवावी, गिरीश महाजनांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

Yavatmal News : शिवसेनेनं राज्यात एक जागा जिंकून दाखवावी असं आव्हान गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. यासोबतच शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं असंही आव्हान त्यांनी शरद पवारांना दिलंय. यावेळी मनोज जरांगे पाटलांवर महाजनांनी जोरदार टीका केलीय. ते यवतमाळ येथे बोलत होते. 

खासदार प्रताप चिखलीकर यांची सख्खी बहीण आशा शिंदे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा पत्नी आशा शिंदे यांचा आज दुपारी 3 वाजता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे, आशा शिंदे या खासदार प्रताप चिखलीकर यांची सख्खी बहीण आहे, आता पुढची लोकसभा ही भाव बहिणीत होणार आहे त्यामुळे आता नांदेडच्या लोकसभे मध्ये सगळ्याचे लक्ष लागले आहे.

गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पण सरकारचं दुर्लक्ष : विजय वडेट्टीवार


गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण सरकार लक्ष देत नसल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.


गारपिटीने सर्व नुकसान झाले यांनी तात्काळ मदत दाखल केली पाहिजे होती


चाय पे चर्चा या चर्चेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्दे कळवावे


पंतप्रधान जरी तिकडे मत मिळवण्यासाठी जात असले तरी लोक त्यांना चाय पे चर्चाची आठवण करून देतील


शेतकरी आता या सरकारला फसणार नाही


 

मुंबईत रिक्षा भाडेवाढीची शक्यता, रिक्षा युनियनने एमएमआरटीएकडे केलीय भाडेवाढीची मागणी

Mumbai Auto Fare Hike : मुंबईत रिक्षा भाडेवाढीची शक्यता आहे. रिक्षा युनियनने एमएमआरटीएकडे भाडेवाढीची मागणी केली आहे. सध्या दीड किलोमीटरसाठी 23 रुपये रिक्षा भाडे आहे, त्यात दोन ते 3 रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. नुकतेच  मुंबई रिक्षामेन्स युनियनने एमएमआरटी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या बैठकीत, खटुआ समितीच्या फॉर्म्युल्यानुसार ग्राहक मूल्य निदेशांक , रिक्षा विकत खर्च , रिक्षा डागडुजी करण्याचा खर्च , विमा आणि विविध कर यामुळे भाड वाढ करण्याची मागणी,स्वच्छतागृह तसेच सीएनजीमध्ये सबसिडी द्यावी अशा विविध मागण्या या बैठकीमध्ये करण्यात आल्या.  यासंदर्भात पुन्हा येत्या दोन दिवसात बैठक होणार आहे आणि त्यावर निर्णय घेतला जाईल असं युनियनच्या वतीने सांगण्यात आलंय.

Jalgaon News : भडगाव शहर प्रशासनाचा विरोध, भडगाव शहर बंदची हाक

Jalgaon Bhadgaon News : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे प्रस्तावित असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय चाळीसगाव येथे मंजूर करण्यात आल्याने भडगांवकर आक्रमक झाले असून प्रशासनाच्या निषेधार्थ आज भडगाव मध्ये बंदची हाक देण्यात आली. या बंद मध्ये व्यापारी, उद्योजक यांच्यासह सर्व स्थरावरून पाठिंबा देण्यात आला असून तात्काळ प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय भडगाव येथे मंजूर करण्यात यावे अशी मागणी भडगाव शहरवासीयांकडून केली जात आहे

Maharashtra Vidhan Bhavan Andolan : विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचं आंदोलन

Maharashtra Vidhan Bhavan Andolan : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस


विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचं आंदोलन


कापसाला भाव देण्याबाबत विरोधकांचं आंदोलन



Akola News : मोदींच्या सभेसाठी राज्यभरातून 1925 एसटी बसेस आरक्षित

Akola News : आजच्या मोदींच्या यवतमाळातील सभेसाठी राज्यभरातून 1925 एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्यात. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून बसद्वारे बचतगटाच्या महिलांना यवतमाळमध्ये मेळाव्यासाठी आणलं जाणार. एका बसचं सरासरी 25 हजार रूपये भाडं. बससाठी 55 रूपये प्रतिकिलोमीटर भाडं आकारलं जातंय. आजच्या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात बस आरक्षित केल्यामुळे राज्यभरात वाहतूक व्यवस्थेचा उडाला बोजवारा. अनेक बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी. बसच्या फेर्या कमी झाल्याने अनेक ठिकाणी प्रवासी ताटकळलेत. बसवर जवळपास 5 कोटींचा खर्च होण्याची शक्यता.

Jalna Crop Loss : गारपीटीने दोन तालुक्यात 11 हजार 691 हेक्टरवरील पिकांना फटका

Jalna Rain Update : जालना जिल्ह्यात गारपिटीमुळे एकाच दिवसात  11 हजार 691 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून बाधित झालेल्या 66 गावांमध्ये 20 हजार 800 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. 26 फेब्रुवारी रोजी रात्री जिल्ह्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यात  गारपिटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा सह फळपिकांना मोठा फटका बसला, या पावसात 7 जनावरे दगावले असून 2 जणांचा वीज पडून मृत्यू झालाय.

Bhavana Gawali Photo Issue : पंतप्रधानांच्या स्वागताच्या जाहिरातीत खासदार भावना गवळींचा फोटो गायब
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतच्या महायुतीच्या आजच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीत खासदार भावना गवळी यांचा फोटो गायब झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात महायुतीच्या जाहिरातीत पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह सर्व आमदार यांचे फोटो आहेत, मात्र खासदार भावना गवळी यांचा फोटो नाही. त्यामुळे खासदार गवळीच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवर संभ्रम निर्माण झाला आहे.
Pune Vehicle Todfod : पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड

Pune Crime News : पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड


पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत 10 ते 12 वाहनांची तोडफोड


परिसरात दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकवत दोन जणाकडून वाहनांची तोडफोड


याप्रकरणी  येरवडा पोकिसंकडून दोन आरोपींना अटक


अजय चित्रगुप्त बागरी,सुमीत भारत सितापराव अस अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे


 मध्यरात्री येरवडा भागातील घटना..

Buldhana News : पंतप्रधानांच्या सभेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील 150 एसटी बसेस यवतमाळसाठी रवाना

Buldhana News : यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होत असून राज्यभरातून या सभेला उपस्थित राहण्यासाठी बसेस द्वारेने आण करण्यासाठी राज्यभरातून हजारो बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचं धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातून 150 एसटी महामंडळाच्या बसेस यवतमाळ विभागीय कार्यल्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत. एवढ्या संख्येने बसेस जिल्ह्यातून बाहेर एका सभेसाठी पाठविण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रवाशी सेवा कोलमोडली आहे. बुलढाणा बस स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. प्रवासी सेवा खोलांबळी असून प्रवाश्यांना अनेक ठिकाणी ताठकळत बसावं लागतं आहे.

Manmad Rain News : गहू हरभरा भुईसपाट ; कांदा पिकालाही फटका..

मनमाड : नाशिकच्या मनमाड शहरासह मोहेगाव, बेजगाव आदी गावात तसेच चांदवड तालुक्यातील पुर्व भागाला अवकाळी पावासाने जोरदार तडाखा दिला आहे. परिसरातील काढणीला आलेला गहू, हरभरा आडवा झाला आहे तर, कांद्यासह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात अचानक आलेल्या अवकाळी पावासाने होत्याचं नव्हतं केल्याने बळीराजा हवालदिल  झाला आहे. 

PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये 
PM Modi Yavatmal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या महामेळाव्याला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे 4.30 वाजता सभास्थानी पोहोचतील. यवतमाळ जिल्हा हा पंतप्रधान मोदी यांना खूप लकी आहे, अशी चर्चा होतेय, कारण 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांनी निवडणुकी पूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी या गावात 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम घेतला आणि ते देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीपूर्वी सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा याठिकाणी सभा घेतली आणि दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले आणि आज परत 2024 च्या निवडणूकीच्या पूर्वी त्यांची आज यवतमाळमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा महिला मेळावा होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यवतमाळ हा लकी आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
Unseasonal Rain : अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेच

Ahmednagar Rain : अहमदनगर शहरासह परिसरात अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. यामुळे गहू, हरभरा, पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

दिलेली आश्वासन न पाडणाऱ्या मोदींना महिला आणि शेतकऱ्यांनीच जाब विचारावा, ठाकरे गटाची भूमिका

Kishore Tiwari On Modi Sabha : 2014 मध्ये दाभडी येथे येऊन शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आणि 2019 मध्ये पांढरकवडा येथील महिला मेळाव्यात बचत गटातील महिलांना दिलेले आश्वासन न पाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज महिलांनीच जाब विचारावा असे मत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ मधील "भारी" गावाजवळ महिला बचत गटांचा महामेळावा होत आहे.लाखोंच्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिक या मेळाव्यात उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. या सभेत कुठलीही अव्यवस्था किंवा गोंधळ होणार नाही, यासाठी पोलिसांनी दक्षता बाळगली असून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

J P Nadda in Maharashtra : जे पी नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर

J P Nadda Nagpur Visit : जे पी नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर


भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनास करणार मार्गदर्शन


जे पी नड्डा एक लाख तरुणांसोबत साधणार संवाद


भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सुर्या सुद्धा करणार मार्गदर्शन


रविनगर येथील नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये होणार संमेलन


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताबाबत तरुणांना देणार माहिती


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित

Ramdas Athawale : भिवंडीतील संकेत भोसले हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Bhiwandi News : भिवंडी शहरातील कामतघर वऱ्हाळदेवी नगर परिसरातील 16 वर्षीय संकेत भोसले या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. मंगळवारी रामदास आठवले यांनी पीडित भोसले परिवाराला भेट दिली यावेळी ते बोलत होते.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.