Maharashtra News LIVE : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Mar 2024 11:59 AM
Maharashtra Politics : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Maharashtra Politics : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे करणार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा


आदित्य ठाकरे चार एप्रिल रोजी रत्नागिरीत घेणार जाहीर सभा तर उद्धव ठाकरे यांची 5 एप्रिलला सिंधुदुर्गमध्ये जाहीर सभा

 

ठाकरे गटाकडून रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जोरदार तयारी

 

पुढील दोन दिवसात दौरा होणार निश्चित
Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ, छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट आला आहे. अजित पवारांनी बोलावली नाशिक लोकसभा मतदारसंघातील नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक, उद्या दुपारी 1 वाजता पुण्यात होणार अजित पवार गटाची बैठक, नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी बैठकीला राहणार उपस्थित. 

Raver Lok Sabha Election: रक्षा खडसे, भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, प्रचार करताना डावललं जात असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप

Raver Lok Sabha Election: रावेरच्या भाजप उमेगवार रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये गिरीश महाजनांसमोरच वादावादी, आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करतात खडसे, भाजप कार्यकर्त्यांचा आरोप

एकीकडे लोकसभेची धामधूम, दुसरीकडे दुष्काळाची टांगती तलवार; उजनी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर

Maharashtra Drought: सोलापूरसह नगर, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजानुई धरणात आज केवळ वजा 36 टक्के पाणीसाठा आहे. यंदाची उजनी धरणाची परिस्थिती पाहता उजनी यावेळी इतिहासातील नीचांकी पातळी गाठण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या धरणाच्या जलाशयातील पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाचवण्यासाठी ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून चाऱ्या काढण्यात आल्या आहेत. या चाऱ्यामधून पाईपलाईन टाकून  मोटारी सुरू ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.  सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसऱ्याबाजूनं दुष्काळाच्या नियोजनाचा दुहेरी ताण प्रशासनावर आला आहे. आज उजनी धरणात केवळ वजा 36 टक्के पाणीसाठा असून अजून चार ते पाच दिवसांत पाणीपातळी वजा 40 टक्क्यावर पोचल्यावर जलाशयावरील पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक योजना बंद पडण्यास सुरुवात होणार आहे. सोलापूर शहरासाठी सोडलेलं पाणी सोलापूरसाठी पोचल्यानं किमान 50 दिवस तरी सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तरीही या सर्व शहरांत सध्या एक दिवसाआड पाणी देऊन पाण्याचा काटकसरीनं वापर केला जात आहे. मात्र पुन्हा ऐन उन्हाळ्यात म्हणजेच, 15 मेच्या दरम्यान उजनी धरणातून पाणी सोडावं लागणार आहे. यानंतर उजनी धरणाची अवस्था खूपच बिकट बनणार असून उजनी धरणाच्या इतिहासातील नीचांकी पातळी गाठणार आहे. 

Dharashiv News : धाराशिव शहरातील दोन गटातील तणाव निवळला, कलम 307 अंतर्गत जवळपास 125 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

Dharashiv News : धाराशिव शहरातील तणाव निवळला असून, परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. काल  खाजा नगर आणि गणेश नगर भागात दोन गट आमने सामने आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, पोलिसांनी कलम 307 अंतर्गत जवळपास 125 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज  महाविकास आघाडीसंदर्भात भूमिका जाहीर करणार

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज  महाविकास आघाडीसंदर्भात भूमिका जाहीर करणार होते. शिवाय तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्याचीही शक्यता होती. मात्र, आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका अशी विनंती महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना केली आहे. त्यामुळे मविआ आणि वंचितमध्ये आज नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मविआ आंबेडकरांना नवा प्रस्ताव देणार असल्याची शक्यता आहे. आंबेडकरांनी मविआची विनंती मान्य करत आजऐवजी उद्या भूमिका जाहीर करण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Thane Fire : ठाण्यातील खाजगी गोडाऊनला भीषण आग

Thane Fire : ठाण्यातील साकेत परिसरात असलेल्या एका खाजगी गोडाऊनला रात्री 12.08 वाजताच्या सुमारास आग लागली होती. रात्री ब्रीज दुरुस्तीसाठी काम करणाऱ्या खाजगी कंपनीच्या पत्राच्या गोडाऊनला आग लागली होती. त्यात तयार केलेला स्टोर रूममध्ये असलेल्या साहित्याचे यामध्ये मग प्रमाणात नुकसान झालं असून पॉलिमर केमिकल फायबर साठी वापरण्यात येणार केमिकल थीनर ग्राइंडर ब्रेकर इत्यादी साहित्य जळून खाक झाले. या घटनास्थळी राबोडी पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी 1 पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान 1 फायर वाहनासह, 1 हायराईज फायर वाहनासह, 1 रेस्क्यु वाहनासह, 1 वॉटर टँकर वाहनासह उपस्थित होते. या घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. या घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने 1.15 वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचं 63 टक्के काम पूर्ण, पुढच्या वर्षी 31 मार्च 2025 पर्यंत पहिल्या विमानाचं टेकऑफ होण्याची शक्यता

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचं 63 टक्के काम पूर्ण झालं असून, पुढच्या वर्षी 31 मार्च 2025 पर्यंत पहिल्या विमानाचं टेकऑफ, होईल असा दावा सिडकोनी केला आहे. तर यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचंही सिडकोनी म्हंटलं आहे. 

Navneet Rana News : खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिलला निकाल

Navneet Rana News : खासदार नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. निकाल जर बाजूनं लागला तर 2 एप्रिल रोजी महायुतीकडून त्यांची उमेदवारी घोषित होणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय. त्यानंतर 4 एप्रिलला नवनीत राणा उमेदवारी अर्ज दाखल करणार अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय.  जर निकाल नवनीत राणा यांच्याविरोधात लागला तर भाजपचा प्लॅन बी तयार असून अमरावतीमधील प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्या मूळच्या अकोला जिल्ह्याच्या आहेत. तसेच दिगवंत रा. सु. गवई यांच्या कन्या कीर्ती गवई आणि एक माजी आयएएस अधिकाऱ्याचे नावही विचाराधीन असल्याचं समजतं.

Gadchiroli Lok Sabha Election : गडचिरोली- भाजपचे उमेदवार अशोक नेते आज उमेदवारी अर्ज भरणार

Gadchiroli Lok Sabha Election : गडचिरोलीमध्ये भाजपचे उमेदवार अशोक नेते आज आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहेत. इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत रॅली काढली जाणार आहे. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत.

Nagpur News : नागपूर लोकसभेसाठी विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Nagpur News : नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नागपुरातील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विकास ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. विकास ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, विजय वडेट्टीवार, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत उपस्थित राहणार आहेत. 

Nashik News : दिंडोरी लोकसभामध्ये भिल्ल समाजाला प्रतिनिधित्व द्यावं; भिल्ल समाज बांधवांची मागणी

Nashik News : नाशिकचा दिंडोरी लोकसभा मतदार संघ पारंपारीक आदिवासी मतदार संघ असून, गेल्या काही वर्षात या मतदार संघात आदिवासी भिल्ल समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी भिल्ल समाजाला संधी द्यावी अशी मागणी भिल्ल समाजाच्या  विविध संघटनामधून जोर धरू लागली आहे. कळवणमध्ये समाजातील प्रमुखांची बैठक संपन्न झाली त्यात ही मागणी करण्यात आली. दिंडोरी लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदार संघात भिल्ल समाजाची मोठी संख्या आहे. मात्र भिल्ल समाज अद्यापही विकासापासून वंचित आहे. समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास समाजाचा विकास होण्यास मदत होईल. तरी प्रमुख राजकीय पक्षांनी यंदाच्या निवडणुकीत भिल्ल समाजाचा विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Ratnagiri News: होळी पौर्णिमेला राजापुरात गंगा माईचे आगमन, भक्तांच्या आनंदाला उधाण

Ratnagiri News: गतवर्षीचा कमी पडलेल्या पावसामुळे ऐन मार्च महिन्यात कोकण पाणी टंचाईच्या वणव्यात होरपळत असतानाच फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचे आगमन झाले असून मूळ प्रवाह प्रवाहित झाला आहे. सध्या सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आलेले असताना स्थानिकांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट आहे. अजून अडीच महिने कसे काढायचे हा प्रश्न तमाम कोकणवासीयांसमोर असतानाच राजापूर उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगामाईचे आज 24 मार्च 2024 रोजी सकाळी आगमन झाले आहे. मूळ गंगेचा प्रवाह प्रवाहित झाला असून काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व चौदाही कुंडांमध्ये पाणी आले आहे, यातील काही कुंडे फुल भरले आहेत. पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकनां दिलासा देणारा आहे.आता भाविकांना गंगा स्नानाचा आनंद घेता येणार आहे.

Lok Sabha Election 2024 : सुधीर मुनगंटीवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरलेत. राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहेत. अर्ज दाखल करताना मुनगंटीवारांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भित्तीशिल्पाला सुधीर मुनगंटीवार अभिवादन करतील. त्यानंतर गांधी चौकात छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलंय. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत  मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

Sion Bridge News Updates : सायन पुलाचं पाडकाम उद्या रात्रीपासून सुरु होणार, मुंबईकरांना दीड वर्ष वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार

Sion Bridge News Updates : मध्य रेल्वेच्या जीर्ण झालेल्या सायन पुलाचं पाडकाम उद्या रात्रीपासून सुरु होणार आहे.  त्यामुळे मुंबईकरांना दीड वर्ष वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पूल नसल्याने होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पालिका वाहतुकीचे नियोजन करणे, बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक लावणे या कामासाठी 14 कोटींचा खर्चही करणार आहे.

Mumbai Mahim Accident News : मुंबईतील माहीमच्या समुद्रकिनारी बुडालेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह हाती

Mumbai Mahim Accident News : मुंबईतील माहीमच्या समुद्रकिनारी बुडालेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. काल संध्याकाळी धुळवड साजरी करण्यासाठी गेलेले पाच जण समुद्राला भरती आल्याने पाण्यात बुडाले होते. यावेळी लाईफ गार्डनी 4 तरुणांना वाचवत हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यातील एकाचा उपचारा दरम्यान काल मृत्यू झाला. तर पाचव्या बेपत्ता तरुणाचा काल संध्याकाळपासून शोध सुरु होता. मात्र  रात्री समुद्रात भरती असल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं, त्यानंतर आज सकाळी सर्च ऑपरेश दरम्यान, त्याचा मृतदेह सापडलाय. 

Mahayuti On Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेवरुन महायुतीत तिढा? भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरुच

Mahayuti On Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेवरुन महायुतीत तिढा वाढला असून, भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरु आहे. नाशिकमधील भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी भाजप नेत्या देवयानी फरांदेही उपस्थित होत्या. नाशिकमध्ये भाजपची ताकद जास्त आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा भाजपला मिळावी अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली. तर नाशिक लोकसभेच्या मागणीसाठीच काल शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यात भेट घेत शक्तिप्रदर्शन केलंय. 

Ajit Pawar NCP Meeting : आज अजित पवारांची राज्यातील आमदार, मंत्र्यांची महत्वाची बैठक; लोकसभा जागावाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा

Ajit Pawar NCP Meeting : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज अजित पवारांची राज्यातील आमदार, मंत्र्यांची महत्वाची बैठक होणार आहे,या बैठकीत लोकसभा जागावाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा होणार.पुण्यातील ढोले पाटील रोडवर बैठकीचे आयोजन,शिवतारेंच्या बंडामुळे राष्ट्रवादा काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी आहे.. राज्यातील महायुतीच्या इतर जागांवर त्याचा फटका बसू शकतो. त्या दृष्टीने अजित पवार पदाधिकऱ्यांशी चर्चा करु शकतात.

Ajit Pawar NCP Candidate List : २८ मार्चला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता

Ajit Pawar NCP Candidate List : 28 मार्चला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुहायुतीत राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळतेय. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाहीये. काही जागांवर अजूनही चर्चा सुरूच असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी  दिलीय.

Mahayuti Seat Sharing : शिंदेंच्या शिवसेनेला 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रावादीला 4 जागा : सूत्र

Mahayuti Seat Sharing : महायुतीत लोकसभेच्या दोन जागांवरुन तिढा कायम आहे. ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून अजूनही रस्सीखेच सुरु आहे. ठाण्याच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. तर नाशिकच्या जागेवरुन तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळतेय. ठाणे, नाशिक सोडून महायुतीचं संभाव्य जागावाटप माझाच्या हाती आलंय. महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला 13 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रावादीला 5 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर रत्नागिरीचीही जागा भाजपकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय.

First List Of Shiv Sena UBT Candidates: ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होणार, पहिल्या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असणार, संजय राऊतांची माहिती

First List Of Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Candidates: ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होईल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असेल, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी नेत्यांकडून रणनीती आखण्यात आलीये. शिवाय कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागावाटप संदर्भात देखील 2 तास विस्तृत चर्चा झाली.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Mumbai Mahim Accident News : मुंबई : मुंबईतील (Mumbai News) माहीमच्या समुद्रकिनारी (Mahim Chowpatty) बुडालेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी धुळवड (Holi 2024) साजरी करण्यासाठी गेलेले पाच जण समुद्राला भरती आल्यानं पाण्यात बुडाले होते. यावेळी लाईफ गार्डनी 4 तरुणांना वाचवत हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल केलं होतं. त्यातील एकाचा उपचारा दरम्यान काल मृत्यू झाला. तर पाचव्या बेपत्ता तरुणाचा काल संध्याकाळपासून शोध सुरु होता. मात्र, रात्री समुद्रात भरती असल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं, त्यानंतर आज सकाळी सर्च ऑपरेश दरम्यान, त्याचाही मृतदेह हाती लागला आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. तर तीनजण सुखरुप बचावले आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.