मुंबई: मुंबईतील वांद्रे परिसरात रविवारी रात्री एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत (Mumbai Accident) विजय असराणी (वय 40) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वांद्रे पश्चिम (Bandra West) परिसरात एक ट्र्क कोस्टल रोडच्या कामासाठी लोखंडी साहित्य घेऊन चालला होता. या ट्रकमधील लोखंडी साहित्य दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. मात्र, ट्र्क टर्नर रोड (Turner Road) परिसरात आला तेव्हा झाडाच्या एका खाली आलेल्या फांदीला वाहन घासले गेले. त्यामुळे ट्रकवर बांधलेली दोरी अचानक तुटली. 


यावेळी विजय असराणी हे शेजारच्या फुटपाथवरुन चालत होते. ट्रकची दोरी तुटल्यानंतर त्यामधील लोखंडी साहित्य आणि लोखंडाचे भाग सुटे झाले. यापैकी एक लोखंडी भाग रस्त्यावरुन चालत असलेल्या विजय असराणी यांच्या अंगावर पडला. यामध्ये विजय असराणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आजुबाजूच्या लोकांनी विजय असराणी यांना तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी विजय असराणी यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या अपघातप्रकरणात ट्रक चालक आलम अन्सारी याला अटक केली आहे. 


आणखी वाचा


कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद


नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू