Maharashtra News LIVE Updates : शरद पवार डोलीतून रायगडावर दाखल, तब्बल 40 वर्षांनी पवार गडावर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Feb 2024 03:54 PM
नितेश राणेंविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची केली मागणी

नितेश राणेंविरोधात पोलीस पत्नी आक्रमक 


मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची केली मागणी


कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा 


नितेश राणे यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची लेखी माफी मागावी


"माझे कोणी काहीही करू शकत नाही, पोलिसांना भाषणाचे चित्रीकरण करू द्या. ते काहीही करू शकत नाहीत. भाषणाचे चित्रीकरण केवळ बायकोला दाखवतील. आमच्या राज्यात आमच्यावर काही करू शकणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही?”.


अश्या प्रकारची वक्तव्य करून नितेश राणेंनी पोलीस कुटुंबीय आणि खाकी वर्दीचा अनादर केल्याचा तक्रारीत उल्लेख


अश्या प्रकारच्या वक्तव्यामुळे पोलिसांचे खाच्चिकरण होत असल्याचं केलं स्पष्ट

मी शिर्डीत निवडणुन येईन, भाजपने विचार करायला हवा : रामदास आठवले 

रामदास आठवले


लोकसभा निवडणूक घोषणा मार्च पहिल्या आठवड्यात होईल


भाजप आणि मित्र पक्षासह  400 वर जागा येतील 


370, महिला यांच्यासाठी,शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय व इतर निर्णयामुळे फायदा होईल


विरोधकांनी मोदींना शिव्या देण्याचं ठरवलं आहे


RPI ला राज्यात लोकसभा निवडणुकीत एक जागा तरी द्यावी


यापूर्वी RPI मुळे पालिका आणि विधानसभेत भाजपला फायदा झालाय


त्यामुळे RPI ला विसरून चालणार नाही


त्यामुळे फडणवीस यांच्याकडे अपेक्षा आहे, शिर्डीची जागा आम्हाला द्यावी. मी लढवण्यासाठी  इच्छुक आहे


मी शिर्डीत निवडणुन येईन, त्यामुळे भाजपने विचार करायला हवा 

आत्तासारखं वातावरण कधी पाहिलं नाही, कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही : राज ठाकरे

Raj Thackeray : महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरु असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. विधानभवनात एका कार्यक्रमाला गेलो होतो, कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच कळलं नाही. सध्या जे वातावरण आहे हे आधीच कधी पाहिलं नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर नांदगावात रास्ता रोको, नांदगाव - छ. संभाजीनगर मार्ग रोखला

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशान्वये आज नाशिकच्या नांदगाव येथील हुतात्मा चौकात मराठा बांधवांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले..यावेळी नांदगाव - संभाजीनगर मार्ग रोखत आंदोलकांनी ठिय्या मांडला..एक मराठा - लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे - सोयरे कायद्याला मंजुरी द्यावी आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.. आंदोलनादरम्यान वाहतूक ठप्प झाली होती..

बीडच्या वडवणी शहरामध्ये सकल मराठा समाजच्या वतीने रास्ता रोको, सरकारविरोधात घोषणाबाजी

बीडच्या वडवणी शहरामध्ये सकल मराठा समाजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण प्रश्नी व सगेसोयरे लागु करावे याप्रश्नी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.  सकल मराठा समाजाने प्रशासनाच्या विनंतीला मान देत रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे.

लग्नाआधी नवरी नवरी थेट मराठा आंदोलनात सहभागी

Solapur News : आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे.." असे आपण शिवचरित्रात वाचले आहे. याचेच प्रत्यय आणणारी घटना आज सोलापुरात घडली. राज्यभरात आज मराठा समाज रस्त्यावर उतरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. मोहोळ तालुक्यात याचं आंदोलनात एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. स्वतःचे लग्न असताना अक्षता सोहळ्याच्या आधी नवरा मुलगा आणि नवरी मुलीने आधी आंदोलनात हजेरी लावली. लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचा मुहूर्त असताना त्याच दिवशी आंदोलनाची घोषणा झाली. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील प्रमोद टेकळे आणि प्रियांका मुळे या दोघांनी मंगलकार्यालयात जाण्याआधी मोहोळ पंढरपूर पालखी मार्गावर सुरु असलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हजेरी लावली. डोक्यावर मुंडावळ्या, वर वधूचा पेहराव घालून आंदोलनात सहभागी होत प्रमोद आणि प्रियांका यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले.

मोठी बातमी : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक, मेळाव्यात केली थेट मागणी

Sadabhau Khot : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचं चित्र दिसत आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे देखील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी थेट मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर मेळाव्यातून केली आहे. 

शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 9 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप याच्यासह ९ पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


पुण्यातील डेंगळे पूल शिवाजी नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयाच्या उदघाटन वेळी लावलेली अजित पवार यांच्या नावाची कोनशीला तोडून नुकसान करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी शरद पवार गट कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय


७ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह गेल्यानंतर पुण्यात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं त्या मध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यावेळी अजित पवार याच नाव असलेली कोनशिला तोडून टाकण्यात आली होती.अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती


पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीत दाखल

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे डोंबिवलीत दाखल झाले आहेत. त्यांनी आज प्रथम गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.



सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष, सर्वसामान्य माणूस हतबल : शरद पवार

Sharad Pawar : आपल्या आठवणीत राहिलं असा आजचा दिवस आहे. सर्वसामान्य माणूस सध्या हतबल झाला आहे. सर्व सामान्य माणसाला कुटुंब चालवता येत नाही एवढी महागाई वाढली आहे. राज्यांत अडचणी वाढतील अशी परिस्थिती असल्याचे शरद पवार म्हणाले. सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. शिवजी महाराज यांच्या वेळीच कालखंड अडचणीचा होता. परकियांच्या हातात सत्ता होती.

तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात आम्ही 45 जागा जिंकणार, चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil :  मंत्री चंद्रकांत पाटलांची ठाकरे गट आणि शरद पवार गटावर टीका


तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात आम्ही 45 जागाही म्हणत आम्ही क्रॉस करू



चंद्रकांत पाटील ऑन दिल्ली शेतकरी आंदोलन :


- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहेत.


- मोदी हे आपल्या मंत्र्यांच्या मदतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून नक्कीच मार्ग निघेल.


- कुणी धमकी देण्याचं कारण नाही, मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारत स्ट्रॉंग झाला आहे  त्यामुळे अशा धमक्यांना घाबरायचं कारण नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण

राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे.  तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं.  या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,  अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं.

शरद पवार डोलीतून रायगडावर दाखल, तब्बल 40 वर्षांनी पवार गडावर

Sharad Pawar :  राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार डोलीतून रायगडावर दाखल झाले आहेत. तब्बल 40 वर्षांनी शरद पवार गडावर दाखल झालेत. आज रायगडावर शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हाचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. यासाठी ते डोलीतून रायगडावर दाखल झाले.

नारायण राणे लढवणार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा, सुत्रांची माहिती


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी अखेर भाजपचे ठरले


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित


केंद्रीय नेतृत्वाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राणेंना तयारीला लागण्याचे आदेश


भाजपमधील उच्च पदस्थ सूत्रांची एबीपी माझाला माहिती


दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राणेंमध्येही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत झाली चर्चा


पहिल्या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता

इराणच्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश अल अदलचा कमांडर ठार

इराणच्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश अल अदल चा कमांडर ठार


- इस्माईल शाहबक्ष असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव 


- गेले अनेक दिवस सुरू असलेल्या इराण - पाकिस्तान संघर्षातून महत्वाची बातमी 


- इराण च्या सरकार पुरस्कृत माध्यमांनी ही माहिती दिली आहे

राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Rajesh Tope : शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार राजेश टोपे यांनी घेतली अजित पवार यांची सकाळी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात भेट. राजेश टोपे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून महाविकास आघाडी सरकारमधील राजेश टोपे हे आरोग्य मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा.च्या शरद पवार गटाचे सगळेच नेते सोडून जात असताना आज सकाळीच अजित पवारांची राजेश टोपे यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभेचा मैदानात? अरविंद सावंत यांच्याविरोधात लढवणार निवडणूक, सुत्रांची माहिती


Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उतरणार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.



दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकर यांना निवडणूक लढण्याचे आदेश - सूत्र


उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व झोपडपट्टी अशा तिन्ही प्रकारातील मतदारांचा नार्वेकर यांना अनुभव


कोकणी व मराठी चेहरा असल्याने नार्वेकर यांच्या नावाला पसंती


अरविंद सावंत यांच्याविरोधात नार्वेकर मैदानात उतरणार


नार्वेकर यांकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरु

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.