Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Feb 2024 02:53 PM
Ramdas Athawale : मनोहर जोशी हे जरी शिवसैनिक जरी असले, तरी शिवशक्ती भीमशक्ती आम्ही एकत्र केली होती

Ramdas Athawale : मनोहर जोशी हे जरी शिवसैनिक जरी असले तरी शिवशक्ती भीमशक्ती आम्ही एकत्र केली होती


लोकसभा अध्यक्ष असताना त्यांनी माझा पक्षाचा एकटा खासदार असताना मला बोलण्याची संधी द्यायचे


रिपब्लिकन पक्षाचा एक जवळचा मैत्र आज राहिला नाही


गणेशोत्सवामध्ये अनेकदा मी त्यांच्या घरी दर्शनाला जायचो


लोकसभेत असताना आम्ही जोशी सरांसोबत १ आठवडा परदेश दौऱ्यावर गेलो होतो

Ramdas Athawale : मनोहर जोशी हे जरी शिवसैनिक जरी असले, तरी शिवशक्ती भीमशक्ती आम्ही एकत्र केली होती

Ramdas Athawale : मनोहर जोशी हे जरी शिवसैनिक जरी असले तरी शिवशक्ती भीमशक्ती आम्ही एकत्र केली होती


लोकसभा अध्यक्ष असताना त्यांनी माझा पक्षाचा एकटा खासदार असताना मला बोलण्याची संधी द्यायचे


रिपब्लिकन पक्षाचा एक जवळचा मैत्र आज राहिला नाही


गणेशोत्सवामध्ये अनेकदा मी त्यांच्या घरी दर्शनाला जायचो


लोकसभेत असताना आम्ही जोशी सरांसोबत १ आठवडा परदेश दौऱ्यावर गेलो होतो, माझ्या आहे

Mangal Prabhat Lodha  - २४ व २५ फेब्रुवारीला राज्य सरकार बुद्ध महोत्सव साजरा करणार 

Mangal Prabhat Lodha  - २४ व २५ फेब्रुवारीला राज्य सरकार बुद्ध महोत्सव साजरा करणार - मंगलप्रभात लोढा
- ⁠आदिवासी संस्कृती, आदिवासी खाद्य, आदिवासी उत्पादने आणि आदिवासी पेहराव याबाबत हा महोत्सव असणार 
- ⁠भिक्खु संख युनायटेड बुद्धीस्ट मिशन, देव देश प्रतिष्ठान आणि सर्वोदय महाबुद्ध विहार यांच्या सहयोगाने हा बुद्ध महोत्सव केला जातोय
- ⁠असा बुद्ध महोत्सव करणारे हे सरकार पहिलेच आहे
- ⁠हा समाज अजूनही दुर्लक्षीत आहे म्हणून या समाजाने एकत्रित यावे या करता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

Nana Patole : एका वरिष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला, मनोहर जोशींच्या निधनानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबई येथे निधन झालं.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संवेदना व्यक्त करत प्रशासकीय व्यवस्था मजबुतीने सांभाळणारं, मुख्यमंत्री असताना व लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची नेहमी भूमिका राहिली... त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला अशी संवेदना नाना पटोले यांनी व्यक्त केली

Bhandara : वेटरचा ग्राहकावर चाकुनं जीवघेणा हल्ला, भंडारा शहरातील घटना

Bhandara : भंडारा शहरातील जेएम पटले कॉलेज रोडवर असलेल्या द कॅफे (the cafe) या हॉटेलमध्ये वेटरनं ग्राहकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात ग्राहक गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. ग्राहक आणि वेटर यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळत आहे. वाद विकोपाला गेल्यानं वेटरनं हॉटेलच्या किचन मधुन चाकू आणून ग्राहकांच्या गळ्यावर आणि शरीरावर घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात जखमी ग्राहकाला रुग्णालयात दाखल केलं असून भंडारा पोलीस फरार वेटरचा शोध घेत आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनातील सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड..


भ्याड हल्ला करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न काळकुटे यांचा आरोप


गंगाधर काळकुटे हे रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते


त्यांची भेट घेऊन परत येत असताना वडीगोद्री गावाजवळ एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले


दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या ठिकाणाहून पळ काढला


या सर्व प्रकरणानंतर मराठा आरक्षणाच।आंदोलन चिरडण्याचा डाव असल्याचा आरोप गंगाधर काळकुटेंनी केला


पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे

Ajit Pawar : मी जाती पातीचं राजकारण केले नाही आणि करणार नाही

Ajit Pawar : मी जाती पातीचं राजकारण केले नाही आणि करणार नाही .


समाजातील छोट्या घटकालाही न्याय मिळाला पाहिजे.


अजित पवार यांच्याकडून औरंगाबाद असा उल्लेख 


बारामतीमध्ये 1 कोटींची रुग्णालय उभा केले.


त्याचं नाव आहिल्यादेवी होळकर असं नाव ठेवलं आहे 


सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर करण्यात येणार आहे


चौडीला भव्य अस स्मारक उभे केले जाणार आहे

Maratha Reservation : 'आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल', जरांगेंच्या वकिलांची हायकोर्टात हमी

Maratha Reservation : 'आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल', जरांगेंच्या वकिलांची हायकोर्टात हमी


मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत?


आंदोलन हिसंक होणार नाही?, याची जबाबदारी ते घेणार का?


राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का?


या सर्व मुद्यांवर मनोज जरांगेंना सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश


 

Ashish Shelar : बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब

Ashish Shelar : मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ केला.


मुंबई, महाराष्ट्र आणि देशाला अभिमान वाटेल अशा या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामाला आज मंत्री महोदयांनी सुरूवात करुन दिली.


हे काम अडीच वर्षापूर्वीच सुरू व्हायला हवं होतं. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने याला विरोध केला,


कामाला परवानगी दिली नाही आणि जनतेची अडीच वर्षे फुकट गेली.


त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चवाढीचं पापही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारकडे जातं. 

Shambhuraj Desai : सरकार सकारात्मक असतांना रास्ता रोकोची आवाहनं केली जातायेत, जरांगेंच्या आंदोलनावर शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया

Shambhuraj Desai : सरकार सकारात्मक असतांना रास्ता रोकोची आवाहनं केली जातायेत - शंभुराज देसाई


सगेसोयरे बाबत मागणी केली जातेय, मात्र त्यावर ज्या सूचना हरकती आल्या आहेत, त्यावर कार्यवाही झाली पाहिजे...


तसं झालं नाही तर कोर्टात निर्णय चॅलेंज होईल आणि मराठा समाजाचंच नुकसान होईल 


मात्र तरीही रास्ता रोकोची हाक दिली जातेय.


12 वीचे विद्यार्थी आणि रूग्णांचे हाल होतील

जरांगेंना विरोध करण्याचा अधिकार, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही ही देखील तुमची जबाबदारी - HC

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या वतीनं ज्येष्ठ वकील विजय थोरात यांचा युक्तिवाद


राज्य सरकारनं याचिकाकर्त्यांसाठी युक्तिवाद करू नये


आम्हाला प्रशासनानं कुठलीही नोटीस पाठवलेली नाही


जरांगे हे उपोषणाला बसले आहेत, अद्याप कुठेही हिंसाचार झालेला नाही


प्रशासनाला भिती असेल तर त्यांनी रितसर नोटीस पाठवावी


विरोध करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, मात्र त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही ही देखील तुमची जबाबदारी - हायकोर्ट

मनोज जरांगेंनी अश्याप्रकारे आंदोलनातून प्रशासन आणि जनतेला वेठीस धरणं योग्य नाही - महाधिवक्ता

मनोज जरांगेंनी आता राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक दिलीय - महाधिवक्ता


अश्याप्रकारे आंदोलनातून प्रशासन आणि जनतेला वेठीस धरणं योग्य नाही - महाधिवक्ता


मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात डॉ. गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका


कोर्टाच्या निर्देशांनुसार जरांगेंनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत - महाधिवक्ता

KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगररचना विभागातील दोन जणांना अटक

KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगररचना विभागातील दोन जणांना अटक


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात काम करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांकडून अटक


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी आहेत.

Manoj Jarange : उद्यापासून आंदोलन सुरू होतंय, आंदोलन करताना चारही बाजूची व्हिडिओ शूटिंग काढा -जरांगे पाटील

Manoj Jarange : जालन्यात मनोज जरांगे पत्रकार परिषद


उद्यापासून आंदोलन सुरू होत आहे - -जरांगे पाटील


सर्वांनी सावध राहावं. आंदोलन करताना चारही बाजूची व्हिडिओ शूटिंग काढा -जरांगे पाटील


3 मार्च रोजी जिल्ह्यात एकाच ठिकाणी ताकतीने आंदोलन करा -जरांगे पाटील

ACB : वाय बी चव्हाण सेंटरमधील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागात एसीबीची कारवाई, लेखाधिकारीने लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

ACB : वाय बी चव्हाण सेंटरमधील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागात एसीबीची कारवाई


सहकार पणन विभागाच्या सहायक लेखाधिकारीवर लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने केला गुन्हा दाखल.


मिलिंद पाखले यांच्यावर 7 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल.


वाय बी चव्हाण सेंटरच्या पहिल्या माळ्यावर आहे कार्यालय.

Amit Thackeray : अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार

Amit Thackeray : अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरुन या मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चा साठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या जमा झाले आहेत.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात मेट्रोचे काम सुरु असल्याने दररोज वाहतूककोंडी होत असते. मनसेच्या या मोर्चामुळे वाहतूकोंडीत भर पडणार आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar : वाळूज भागातील गरुडझेप अकॅडमीतील एका तरुणीची आत्महत्या, संचालकावर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज भागात असलेल्या गरुडझेप अकॅडमीत एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे यात आता याच अकॅडमीच्या संचालकावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत या अकॅडमीवर छापेमारी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. कारण, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येणाऱ्या मुला-मुलींना या अकॅडमीच्या वसतिगृहात अक्षरशः कोंडवाड्यात जनावरांना कोंबल्यासारखी राहावे लागत असल्याचे समोर येत आहे. अवघ्या दहा बाय सहा फूट आकाराच्या खोलीमध्ये 6 ते 8 मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर वसतिगृहातील एका खोलीत 22 मुले राहतात.

Hingoli : अवैध धंदे, अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करा, भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे आंदोलन 

Hingoli : हिंगोली जिल्ह्यात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक केली जात आहे तरीही मात्र प्रशासन कार्यवाही करत नसल्याचा आरोप करत हिंगोलीचे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू आहे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जमिनीवर बसले आहेत त्यांच्या सोबत आणेक भाजप कार्यकर्ते सुध्धा उपस्थित आहेत

Amit Thackeray : आता शिक्षकांना इलेक्शन ड्युटी नाही! मनसेच्या आग्रहामुळे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आदेश

Amit Thackeray : मुंबईतील शिक्षकांना निवडणुक कामातून वगळण्यात आल्याचे आदेश दिल्यानंतर अमित ठाकरेंनी फेसबूक पोस्ट केलीय, त्यात ते म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आग्रहामुळे काल रात्री उशिरा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी "मुंबईचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीची बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी अधिगृहीत करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा" असा आदेश दिला आहे. इच्छुक सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना BLO ड्यूटी देण्याबाबतचा पर्याय वापरण्यात यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे"

Manohar Joshi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली

Manohar Joshi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली


मनोहर जोशी यांच्या कार्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उजाळा


लोकसभा अध्यक्ष म्हणून जोशी यांनी केलेल्या कामाची पंतप्रधानांनी करून दिली आठवण

Rajendra Patni Death : आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन, भाजपाला आणखी एक मोठा धक्का

Rajendra Patni Death : आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन 


वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


भाजपाला आणखी एक मोठा धक्का


वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झालं.


मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.


आज त्यांची प्राणज्योत मालवली

Nilesh Rane On Manohar Joshi Death : निलेश राणेंनी ट्विट करत मनोहर जोशींना श्रद्धांजली

Nilesh Rane On Manohar Joshi Death : निलेश राणेंनी ट्विट करत मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे.


महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी जी यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखाच्या क्षणातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Election Duty : निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचे आदेश, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश

Election Duty : मुंबईतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटीतून वगळून अन्य कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिली.




Uddhav Thackeray On Manohar Joshi Death : आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून मी मुंबईसाठी रवाना होत आहे - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Manohar Joshi Death : मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, लोकसभा अध्यक्ष होते. केंद्रीय मंत्री होते, पण त्यापेक्षाही ते कट्टर शिवसैनिक होते..


कोणत्याही पक्ष आणि कोणत्याही नेत्यांच्या आयुष्यात चढ उतार येत असतात मात्र कठीण परिस्थितीत सुद्धा मनोहर जोशी हे एकनिष्ठ राहिले..


शिवसेना प्रमुखा सोबत ते राहिले..


जीवाला जीव देणारे शिवसैनिक होते ते आपल्यातुन निघून जातात हे फार दुर्दैव आहे..


मी शिवसेना पक्ष आणि ठाकरे कुटुंबाच्या वतीने मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करतो..


शिवसेना मध्ये पहिल्या फळीतील मनोहर जोशी होते..


शिवसेना संपण्याच्या प्रयत्न केला, मात्र ती संपत नाही पन ती वाढत आहे..


सगळ्या गोष्टी मी बोलू शकत नाही कारण मला हे सगळं बोलणं अवघड होत आहे..


आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून मी मुंबईसाठी रवाना होत आहे..

मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील रोखठोक आणि सुसंस्कृत राजकारणी हरवला,माजी नगर विकास राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिक्रिया

Ratnagiri : मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील रोखठोक आणि सुसंस्कृत राजकारणी हरवला


मनोहर जोशी यांचे मित्र आणि माजी नगर विकास राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिक्रिया


माझ्यासाठी ते गुरु मार्गदर्शक अस व्यक्तिमत्व होते


त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली


त्यांच्यासारखा गुरु हा जन्मोजन्मी मिळावा हीच प्रार्थना

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार लोकसभेच्या 11 ते 12 जागा लढण्यावर ठाम 

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार लोकसभेच्या 11 ते 12 जागा लढण्यावर ठाम 


सध्या मुंबईतील तीन जागांवरून जागा वाटपाचे घोडं आडलं


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून ईशान्य मुंबईची जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू


सध्या ठाकरे गटाचे संजय दिना पाटील ही जागा लढण्यासाठी प्रयत्नशील 


यासोबतच ठाकरे गटाकडून उत्तर मुंबईचा जागेच्या बदल्यात दक्षिण मध्य मुंबईची जागा आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा मिळवण्याचे प्रयत्न सूरू


ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईची जागा अमोल किर्तीकर तर दक्षिण मध्य मुंबईची जागा लढण्यासाठी अनिल देसाई इच्छुक असल्याची माहिती


तर काँग्रेसचे संजय निरुपम उत्तर पश्चिमची जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील

Manohar Joshi Death : मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर दादरच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार

Manohar Joshi Death : मनोहर जोशी यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबामध्ये दीड तास ठेवण्यात येईल, त्यानंतर अकरा वाजता पार्थिव खाली आणण्यात येईल. दोन वाजेपर्यंत पार्थिव खालीच असेल. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दादरच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडतील. उद्धव ठाकरे साडेबारापर्यंत मुंबई येथील. 

Pune Crime : पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट प्रकरणात जप्त केलेलं एम डी ड्रग्सचा गोव्यात पुरवठा

Pune Crime : पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट प्रकरणात जप्त केलेलं एम डी ड्रग्सचा गोव्यात पुरवठा


मोठा प्रमाणात ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती 


सांगलीतून जप्त केलेले ड्रग्स गोव्यात देखील पाठवण्यात आले होते


पुण्यातील ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब अन् हरियाणात गेले असल्याचा पोलिसांना संशय


पुणे, सांगली, दिल्ली नंतर आता ड्रग्स रॅकेटचे लोण पंजाब, हरियाणा मध्ये सुद्धा


ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदीप धूनिया हा मूळचा पंजाबचा आहे


संदीप दिल्लीतून परदेशात अन् इतरत्र ड्रग्जचा पुरवठा करत होता


या पार्श्वभूमीवर काही मुद्देमाल हा पंजाब आणि हरयाणा मध्ये पाठवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे

Ajit Pawar On Manohar Joshi Death : मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला - उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar On Manohar Joshi Death : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

Nagpur Accident : नागपूरातील लक्ष्मीभवन चौकात स्कुल व्हॅनचा अपघात 

Nagpur Accident : नागपूरातील लक्ष्मीभवन चौकात स्कुल व्हॅनचा अपघात 


- अपघाताच्या वेळेस स्कुल व्हॅन रिकामी होती, त्यामध्ये विद्यार्थी नसल्याने टळला मोठा अनर्थ


- अपघातामुळे स्कुल व्हॅन पलटली असून, चालक जखमी 


- स्कुल व्हॅनच्या चालकाला रुग्णालयात नेले


- लक्ष्मीभवन चौकात भरधाव कार आणि स्कुल व्हॅनची घडक झाल्यानं घडला अपघात

Devendra Fadnavis On Manohar Joshi Death : 'अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून मनोहर जोशींची ओळख'

Devendra Fadnavis On Manohar Joshi Death : "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती - देवेंद्र फडणवीस

Farmers Protest : शेतकरी नेत्यांवर NSA अंतर्गत कारवाई सुरू, आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ केल्याचा पोलिसांचा दावा

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक मोठी बातमी समोर


हरियाणा पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA), 1980 च्या तरतुदींनुसार


शेतकरी आंदोलनांत सहभागी असलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई सुरू केली आहे.


अंबाला पोलिसांची माहिती


शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड्स तोडण्यासाठी शेतकरी संघटनांकडून सतत प्रयत्न केले जात आहेत

Sangli : पोलीस असल्याचे सांगून लुटणाऱ्या दोघांना मिरजमध्ये अटक, दोघांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

Sangli : पोलीस असल्याचे सांगून लुटणाऱ्या दोघाना मिरज मध्ये अटक, दोघांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त


खानापूर मधील शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास 100 कोटींचा निधी देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश


महायुतीमधील सर्व घटकपक्षांची इस्लामपूर मध्ये आज शेतकरी कामगार परिषद, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राहणार उपस्थिती


आटपाडी-भिवघाट रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, एकजण जखमी

Manohar Joshi Death : मनोहर जोशी यांचे पार्थिव सकाळी 11 ते 2 दरम्यान अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार

Manohar Joshi Death : मनोहर जोशी यांचे पार्थिव हिंदूजा रुग्णालयातून सकाळी नऊ वाजता माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे सकाळी 11 ते 2 या दरम्यान अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल

Buldhana : उद्धव ठाकरे यांचे आजचे सर्व दौरे रद्द, मुंबईकडे होणार रवाना

Buldhana : उद्धव ठाकरे यांचे आजचे सर्व दौरे रद्द


थोड्याच वेळात संत गजानना महाराज समाधीचं घेणार दर्शन


त्यानंतर विशेष विमानाने अकोला किंवा संभाजीनगर हून मुंबईकडे होणार रवाना

Bachchu Kadu : आमच्यामुळे भाजप सत्तेत, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर...; बच्चू कडू थेटच बोलले

Bachchu Kadu : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या मित्र पक्षांमध्ये मोठी नाराजी


बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.


भाजपकडून मित्र पक्षांचा वापर करून फेकून देण्यात येते असा आरोप महादेव जानकर यांनी केला होता. 


 "काही लोकं म्हणतात आम्ही निधी आणला आणि आमचीच सरकार आहे. 


मात्र, भाजपवाले तर बाहेर बसले होते, आम्ही भाजपवाल्यांना सत्तेत आणलं. 


आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तुमचं काय जमलं असतं, 


आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत.

Weather Update : देशाच्या 'या' भागात पावसासह गारपीट होण्याची शक्यता

Weather Update : दिल्लीसह उत्तर भारतात पुन्हा हवामान बदलणार आहे.


हिवाळा चालू असला तरी, देशातील काही भागात पावसाची आशा आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसासोबत गारपीट होण्याचीही शक्यता


येत्या तीन ते चार दिवसांत हवामानात बदल होईल, असा अंदाज आहे.


जोरदार वारे देखील वाहू शकतात.


त्याचा परिणाम दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. 

Bhiwandi Crime : भिवंडीत तरुण हत्या प्रकरण, उपशहरप्रमुख कैलास धोत्रेसह एकूण 7 जणांना अटक

Bhiwandi Crime : भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून केलेल्या बेदम मारहाणीमुळे हत्या झाली होती.


या प्रकरणी मुख्य आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा शहर पोलिसांच्या पथकाकडून अटक


तर एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या सात वर पोहचली आहे.

Buldhana : उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे यांची एका रूम मध्ये चर्चा

Buldhana : बुलढाणा शेगाव येथील आनंद सागर निवास परिसरात उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे एका रूम मध्ये चर्चा करत आहेत


आजचा बुलढाणा दौरा रद्द किंवा दौऱ्यात बदल करून उद्धव ठाकरे मुंबईकडे जाण्याची शक्यता.


थोड्याच वेळात यातील नेते बाहेर येऊन प्रतिक्रिया देण्याची शक्यता

Manohar Joshi Death : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हिंदुजा रुग्णालयामध्ये निधन

Manohar Joshi Death : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हिंदुजा रुग्णालयामध्ये निधन


वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 


रात्री 3 वाजता  मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान घेतला शेवटचा  श्वास 


1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते 


त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला


तब्येत खालावल्यामुळे त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.