Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सिल्वर ओक निवासस्थानी तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक
बैठकीमध्ये पक्षाचे चिन्ह पक्षाचे नाव काय असावं याबाबत चर्चा
शरद पवार यांनी पक्ष लढवत असलेल्या लोकसभेच्या जागांबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून माहिती घेतली
सध्या पक्ष लढवण्याची शक्यता असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवाराकडून जोरदार कार्यक्रम घेतले जात आहेत. या उमेदवारांच्या निवडून येण्याच्या शक्यतेबाबत देखील शरद पवारांनी माहिती घेतली
आता लवकरच जयंत पाटील यांच्याकडून पक्ष लढवत असलेल्या लोकसभा मतदारसंघाचा पहिला दौरा पार पडल्यानंतर दुसरा दौरा पार पडणार
महाविकास आघाडीच्या 27 तारखेच्या बैठकीमध्ये जागांबाबत शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती
Navneet Rana : नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरू
जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आहे
जात प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया कशी असते ?
न्यायमूर्तींचा सवाल
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर; दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना करणार संबोधित
Latur : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेल्या नेत्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. लातूर येथील कार्यकर्ता मेळाव्याच्या वेळी झालेली घटना
आज लातूर येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,मंत्री संजय बनसोडे, रूपाली चाकणकर या बैठकीसाठी निघाले असताना सकल मराठा समाज बांधवांनी त्याच्या गाडीचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवले आहेत. यावेळी सरकार विरुद्ध मोठी घोषणाबाजी करत तरुणांनी काळे झेंडे दाखवलेत. दरम्यान यावेळी ताफा अडवणून काळे झेंडे दाखवणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.त्यानंतर कार्यकर्ता मेळावा सुरू झाला आहे.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Manoj Jarange : मराठ्यांची काय ताकद आहे ती तीन मार्चला दाखवाृ
24 तारखेला ज्यांची लग्न दुपारी आहेत.त्यांनी संध्याकाळी ढकला,
माझा मराठा समाज एक केलं, मी चूक काय केलं -जरांगे पाटील
बड्या नेत्यांमुळे त्या महिलेवर अन्याय झालं असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे...
याने कोट्यवधीचे घोटाळे केले, अनेक बिश्या उचलल्या...
जरांगेवर आरोप करायचे आणि म्हणायचं तुकाराम महाराजांच्या नावाखाली मारायचं -जरांगे पाटील
Coastal Road : कोस्टल रोड या मुंबईच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन होणार
फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचा उद्घाटन होणार
वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 27 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी किंवा 3 मार्च यापैकी एका तारखेला
हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार केला जाणार असल्याची माहिती
Nana Patole : निवडणूकीच्या तोंडावर या कारवाया सुरु आहेत...
अजित पवारांवर का कारवाई झाली नाही??
आदर्श घोटाळ्याचा आदल्या दिवशी उल्लेख केला दुसऱ्या दिवशी राज्यसभा दिली
165 खासदार हे दुस-या पक्षाचे त्यांपैकी 64 काॅग्रेसचे खासदार
एअर इंडीयाचा एमआरओ नागपूर मध्ये होता, तो कर्नाटक मध्ये पाठवला
केंद्रातील मंत्री असलेल्या गडकरींसमोर नागपूर मधल्या योजना कर्नाकात जात आहेत
Nana Patole : निवडणूकीच्या तोंडावर या कारवाया सुरु आहेत...
अजित पवारांवर का कारवाई झाली नाही??
आदर्श घोटाळ्याचा आदल्या दिवशी उल्लेख केला दुसऱ्या दिवशी राज्यसभा दिली
165 खासदार हे दुस-या पक्षाचे त्यांपैकी 64 काॅग्रेसचे खासदार
एअर इंडीयाचा एमआरओ नागपूर मध्ये होता, तो कर्नाटक मध्ये पाठवला
केंद्रातील मंत्री असलेल्या गडकरींसमोर नागपूर मधल्या योजना कर्नाकात जात आहेत
Kishori Pednekar : कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरण
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना 21 मार्चपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम
पेडणकर यांच्यावर कोविडकाळात हा घोटाळा केल्याचा आरोप आहे
मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन जामीन फेटाळल्यानंतर पेडणेकरांची हायकोर्टात याचिका
Haribhau Rathore : मराठा समजाला आरक्षण मिळालेले चुकीचे असून जरांगे पाटील यांनी आता रस्ता रोकोचे हत्यार उपसले आहे. याला ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी पाठिंबा दर्शविला आहे. सरकार ने जे आरक्षण दिले आहे ते टिकणार नाही, ओबीसी मध्येच जर आरक्षण दिले तर टिकेल, त्यात कॅटेगरायजेशन करावे यात सर्वांना फायदा आहे. फक्त भुजबळ यांना खूश करण्यासाठी सरकारने हे आरक्षण दिले आहे. मात्र ही मराठ्यांची फसवणूक असल्याचे देखील ते म्हणाले.
Beed : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष करुणा शर्मा - मुंडे यांनी आज नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन थेट धनंजय मुंडे यांना आव्हान दिले आहे. महाराष्ट्रातील 48 जागांवर स्वराज्य सेना योग्य उमेदवार ददेऊन निवडणूक लढवेल तसेच परळी विधानसभा नवरा विरुद्ध बायको अशी पाहायला मिळेल. महाराष्ट्रात गाठी भेटी घेऊन करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.
Netflix : मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला दणका
आज प्रदर्शित होणा-या 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चं प्रदर्शन थांबवलं
हायकोर्ट, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी विशेष स्क्रीनिंग करण्याचे नेटफ्लिक्सला निर्देश
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजूष देशपांडे यांच्यापुढे झाली सुनावणी
पुढील गुरूवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी
वेब सीरीजमुळे खटल्यावर परिणाम होईल, सीबीआयचा आक्षेप
रिया आणि शौविक चक्रवर्तीला हायकोर्टाचा मोठा दिलासा
तपासयंत्रणेनं बजावलेली लुक आऊट नोटीस हायकोर्टाकडून रद्द
27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान दिलेल्या मुदतीत परदेशातून परत आल्यानंतर,
रियानं लुक आउट नोटिस रद्द करण्याची केली होती मागणी
सीबीआयकडून कोर्टाच्या अधिकापक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करत केला गेला होता, रियाच्या मागणीला विरोध
गुन्हा पटण्यात दाखल असून, तपास करतय CBI दिल्ली करतंय
त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय आदेश देऊ शकत नसल्याची सीबीआयची भूमिका
सीबीआय या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता
रिया आणि शौविक चक्रवर्तीला हायकोर्टाचा मोठा दिलासा
तपासयंत्रणेनं बजावलेली लुक आऊट नोटीस हायकोर्टाकडून रद्द
27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान दिलेल्या मुदतीत परदेशातून परत आल्यानंतर,
रियानं लुक आउट नोटिस रद्द करण्याची केली होती मागणी
सीबीआयकडून कोर्टाच्या अधिकापक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करत केला गेला होता, रियाच्या मागणीला विरोध
गुन्हा पटण्यात दाखल असून, तपास करतय CBI दिल्ली करतंय
त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय आदेश देऊ शकत नसल्याची सीबीआयची भूमिका
सीबीआय या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता
रिया आणि शौविक चक्रवर्तीला हायकोर्टाचा मोठा दिलासा
तपासयंत्रणेनं बजावलेली लुक आऊट नोटीस हायकोर्टाकडून रद्द
27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान दिलेल्या मुदतीत परदेशातून परत आल्यानंतर,
रियानं लुक आउट नोटिस रद्द करण्याची केली होती मागणी
सीबीआयकडून कोर्टाच्या अधिकापक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करत केला गेला होता, रियाच्या मागणीला विरोध
गुन्हा पटण्यात दाखल असून, तपास करतय CBI दिल्ली करतंय
त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय आदेश देऊ शकत नसल्याची सीबीआयची भूमिका
सीबीआय या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता
Vasai : वसईतील मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
वसई ते खाणीवडे टोल नाक्या पर्यंत दोन्ही लेनवर वाहन ठप्प झाली आहेत.
महामार्गावर सिमेंट काँक्रीटकरणाचे काम सुरू असल्याने मागच्या एक महिन्यापासून वाहतूक कोंडी सुरू आहे.
अनेक लांब पल्याच्या गाडयांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
Political : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर ठाकरे माता-पुत्राचे देवदर्शन ?
आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देवदर्शनासाठी वाराणसी दौऱ्यावर
आज वाराणसीच्या मंदिरात पूजेसाठी राहणार उपस्थित
Nagpur : वनविभागाच्या सामाजिक वनिकरण खात्यासाठी मिहान परिसरात आयोजित शारिरीक चाचणी परिक्षेत गोंधळ झाला आहे.
वनविभागाच्या सामाजिक वनिकरण खात्याच्या 275 जागांसाठी नागपूरच्या मिहान परिसरातील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शारिरीक चाचणी परिक्षेत पाच हजारापेक्षा जास्त उमेदवार सहभागी झाले आहेत.
शारिरीक चाचणी परिक्षेत उमेदवारांना गुणांचा तपशील देण्यात यावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे.
शारिरीक चाचणी परिक्षेतील रनिंगचा तपशील उमेदवारांना देण्यात येणार नाही, असे वनविभागाच्या अधिका-यांची प्रतिक्रिया.
यावरुनच उमेदवारांचा गोंधळ उडाला.
Akola : बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क परीक्षा केद्रांवर बहिणीला कॉपी द्यायला 'तो' तोतया (नकली) पोलीस बनल्याचा हा प्रकार आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल इथं बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परिक्षादरम्यान काल २१ फेब्रुवारीला चक्क पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचं सल्यूट करतानाच बिंग फुटल आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (वय २४, राहणार पांगरा बंदी) असं या तोतया पोलिसांचं नाव आहे.
Pune Crime : पुण्याच्या अंतराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचं कनेक्शन "पंजाब व्हाया इंग्लंड"
ड्रग्स रॅकेट चा "मास्टर माईंड" हा मूळचा पंजाब प्रांतातील आहे
"तो" कुटुंबीयांसह गेल्या अनेक वर्षांपूर्वी इंग्लंड मध्ये स्थाईत
2016 मधील कुरकुंभ येथे मारलेल्या छाप्यात त्याला पकडण्यात आले होते
यावेळी ३५० किलो चे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत होता
त्या ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्स प्रकरणाला सुरुवात झाली
Palghar : वाढवण बंदर विरोधात पालघर मधील स्थानिक संघटना आक्रमक
वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार
केंद्र सरकारच्या महत्वकांशी असलेल्या वाढवन बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कामाला वेग आल्याने बंदर विरोधातील संघटना आक्रमक
बंदर रद्द करण्याची स्थानिक भूमिपुत्रांसह मच्छीमारांची मागणी
डहाणूतील चारोटी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
BJP : राज्यातील भाजपच्या प्रवक्त्यांचं उद्या मुंबईत प्रशिक्षण
- प्रदेश कार्यालयात १० ते २ दरम्यान होणार प्रशिक्षण
- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व ८० प्रवक्त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार
- अखिल भारतीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश घेणार प्रवक्त्यांचं विशेष क्लास
- राज्यभरातील भाजपच्या प्रवक्त्यांनी लोकसभेत कशी भुमिका मांडायची? याबाबत होणार चर्चा
Hingoli : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवस हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार होते. 23 आणि 24 फेब्रुवारीला हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या, परंतु काल मनोज जरांगे यांनी 24 तारखेपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा होणारा हा दौरा रद्द करण्यात आला आहे
Chiplun : चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थक भिडल्यानंतर
त्यानंतरची कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जातोय
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव विनायक राऊत यांनी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची भेट घेऊन निपक्षपणे कारवाई करा...
अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहिल्यास आम्ही हजारोंच्या संख्येने अटक करून घेऊ असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडल्यानंतर त्यातील वादाचा पुढचा अंक आता पहायला मिळतोय
Uddhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर..
बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार..
आज दुपारी 1 वाजता चिखली, दुपारी 3 वाजता मोताळा आणि सायंकाळी 6 वाजता जळगाव जामोद येथे होणार जनसंवाद सभा.. त्यानंतर उद्धव ठाकरे हे शेगावला करतील मुक्काम...
दोन दिवसात उद्धव ठाकरेंच्या 5 जनसंवाद सभा...
शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला बुलढाणा जिल्ह्यात आता एकही उबाठाचा खासदार आणि आमदार नाही..
बुलढाणा जिल्ह्यात लोकसभेसाठी नरेंद्र खेडेकर यांची अधिकृत उमेदवारी घोषित होण्याची शक्यता...
बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रताप जाधव हे सहा वेळा निवडून आले आहे मात्र आता ते शिंदे गटात गेलेत...
पक्षफुटी नंतर दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे येणार बुलढाणा जिल्ह्यात...
Sangli : कुपवाड मधून तीनशे कोटींचे ड्रग्ज जप्त करत तिघांना घेतले ताब्यात
सांगली जिल्ह्यातील चार हजार सहकारी संस्थाचे होणार लेखापरीक्षण
कडेगाव मध्ये बनावट दस्तावेज तयार करून लाखो रुपयांची फसवणूक
Pune Crime : पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्स प्रकरण,
मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी टोळीने तयार केली होती टोपण नावे
ड्रग्स रॅकेट मध्ये "लंबा बाल" आणि "मुंबई का बंदर" या टोपण नावांचा वापर
सराईत वैभव माने याला केसांची शेंडी होती. त्यामुळे त्याला "लंबा बाल" म्हणून ओळखले जात होते
मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला "मुंबई का बंदर" म्हणून बोलावले जात होते
आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात पोलिसांना यश
राज्यासह देशभरात मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचे काेडिंग
Heros Of Mumbai : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते 'हिरोज ऑफ मुंबई'चे उद्घाटन होणार
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 17 थोर व्यक्तींचे पुतळे एकाच उद्यानात बसवले
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचा समावेश
मुंबईसह राज्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासात योगदान दिलेल्या थोर व्यक्तींचे अर्धा कृती पुतळे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री मंगल प्रभाग लोढा राहणार उपस्थित
गिरगावच्या किलाचंद गार्डनमध्ये सकाळी 9.30 वाजता कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अन्य महापुरुषांचे वंशज देखील उपस्थित राहणार
Doctors Strike : राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून पुन्हा राज्यव्यापी संपाची हाक
प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने आज संध्याकाळी संपावर जाणार
7 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित
आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने आजपासून संप
Weather Update : देशभरात हवामानात सातत्याने बदल
राज्यात थंडी जवळपास गायब
जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होऊ लागली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभाव
पुढील 3 दिवस उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता
महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव, अकोला, वर्धा
तापमानाचा पारा 35 डिग्री सेल्सिअसवर
उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यांमध्ये पावसाचीही शक्यता
PM Modi Cabinet Discussion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पाच मोठे निर्णय घेण्यात आलेत.
-FRP मध्ये आठ टक्के वाढ
-अंतराळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक
-राष्ट्रीय पशुधन अभियानात अतिरिक्त उपक्रमांचा समावेश
-अंब्रेला योजना
-पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -