राज्यातील तसेच देशातील बातम्यांचा वेगवान आढावा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Apr 2024 10:42 AM
Chandrapur Election: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान

Chandrapur Election: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदानासाठी पोलिंग पार्टींना निवडणूक साहित्याचं वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मुख्यालयात हे साहित्य वाटप सुरु झाले आहे. इथे एकूण २११८ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून यातील ४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.

Ratnagiri Amit Shah Sabha:रत्नागिरी सिंधुदुर्गात अमित शाहांची सभा

Ratnagiri Sabha:  रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवर महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाहीय. नारायण राणेंना  भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून किरण सामंत हे इच्छुक आहे.. उमेदवार निश्चित झाला नसताना इथं अमित शाहांच्या सभेची तयारी सुरू झालीय. 

Mumbai Fire:  दक्षिण मुंबईत ब्रिटानिया कंपनीच्या बाजूला प्रचंड मोठी आग 

Mumbai Fire:  दक्षिण मुंबईत ब्रिटानिया कंपनीच्या बाजूला प्रचंड मोठी आग  लागली आहे. गोदामाला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.  आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या चार ते पाच गाड्या रवाना झाल्या आहेत.   मात्र आगीचे कारण आणि व्याप्ती या संदर्भात माहिती नाही. 


 





पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.