Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर....

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Feb 2024 03:11 PM
Parbhani : परभणीच्या सेलु पोलीस ठाण्यात मराठ्यांचा ठिय्या, थेट पोलीस ठाण्यात आंदोलन  

Parbhani : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे आणि मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेलू तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जेलभरो आंदोलन केले आहे. यावेळी मराठा समाज बांधवांनी पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन करत एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी केली. आरक्षणा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Prithviraj Chavan : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमच्या पक्षाची बँक खाते गोठवण्यात आली

Prithviraj Chavan : जुनी केस उकरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमच्या पक्षाची बँक खाते गोठवण्यात आलेले आहे
- याचा स्पष्ट अर्थ आहे की भाजपला काल सुप्रीम कोर्टाने फटकावल्यानंतर आज ही कारवाई होते
- यासंदर्भात आम्ही कायदेशीर लढाई लढू

Mahesh Gaikwad : महेश गायकवाड यांच्या आज डिस्चार्ज होणार नाही, डॉक्टरांची माहिती

Mahesh Gaikwad : महेश गायकवाड यांच्या आज डिस्चार्ज होणार नाही. शरीरावर सूज असल्यामुळे त्यांना चालताना त्रास होत आहे त्यामुळे डिस्चार्ज देण्यात येणार नाही.. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर राहुल पाटील यांना आज सायंकाळी किंवा उद्या मध्ये डिस्चार्ज देण्याची शक्यता वर्तविली जात आहे...

धुळे सोलापूर महामार्गावर मागील रस्ता रोको

Chhatrapati Sambhaji Nagar : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाच्या वतीने धुळे सोलापूर महामार्गावरील चित्ते पिंपळगाव येथे मागील चार तासापासून मराठा बांधव यांनी रास्ता रोखून धरला आहे. महामार्ग रोखून धरल्यामुळे दूर दूर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Prakash shendge : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा, प्रकाश शेंडगेंची टीका

Prakash shendge : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा समाजाची फसवणूक केली जात आहे.  


राज्य मागासवर्ग आयोग हा मराठा आयोग झाला होता. 


त्यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यात आले. 


अवघ्या 8 ते 10 दिवसांमध्ये 1 कोटी 58 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली.


 


 

Ajit Pawar : 'असा' खासदार निवडून गेला तर आपले काम मार्गी लागेल, अजित पवार म्हणतात...

Ajit Pawar : केंद्रात ज्याचे सरकार आहे त्या विचाराचा खासदार निवडून गेला तर आपले काम मार्गी लागेल


नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी ओळख झाली


पूर्वी आम्ही मागे राहायचो वरिष्ठांना पुढे करायचो


मी विकास कामात भेदभाव करीत नाही


आपण पक्ष चोरला नाही


आम्ही काल आज आणि उद्याही राष्ट्रवादीत होतो

दौंडमध्ये मराठा आंदोलकानी अडविला पुणे-सोलापूर महामार्ग, शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Daund : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत चालल्याने आणि राज्य सरकार मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत दौंड तालुक्यातील यवत परिसरातील मराठा समाज आक्रमक झाला असून शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहे. यवत येथे पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गवर यवत हद्दीत मराठा समाज बांधवांनी चार बैलगाड्या आणून रस्ता रोको आंदोलन केलंय. जवळपास 1 तासाहून पुणे सोलापूर महामार्ग अडविल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच-रांग लागल्या आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. सरकार नुसतं आश्वासन दाखवीत असून सरकारने लवकरात लवकर आश्वासन पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केलीय.

Pune : शाळेत खेळताना तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना.

Pune : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिलीये. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होते. 

Shivsena : मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेला वंचित कडून मोठा धक्का, डॉ. बी.डी. चव्हाणांचा पक्षप्रवेश

Political News : मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेला वंचितनं मोठा धक्का बसलाय. पक्षाचे जेष्ठ नेते आणि हिंगोली लोकसभा संघटक डॉ. बी.डी. चव्हाणांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केलाय. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या 'यशवंत भवन' या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झालाय.

Parbhani : मराठा आंदोलकांनी बस पेटवली, चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण, मोठा अनर्थ टळला

Parbhani : हिंगोली मध्ये मराठा आरक्षणाचे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण मिळाला आहे वसमत हून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसला अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिले आहे यामध्ये परिवहन विभागाची बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे 
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यांमध्ये जागोजागी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये हिंसक वळण मिळाले आहे. वसमतहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसला अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिले आहे. या बस मध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते परंतु हे प्रवासी अगोदरच गाडीतून उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे

मराठा आंदोलकांनी बस पेटवली, वसमत परभणी रोडवरील खांडेगाव पाटीवर बस जाळली 

हिंगोली मध्ये मराठा आरक्षणाचे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण मिळाला आहे वसमत हून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसला अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिले आहे. यामध्ये परिवहन विभागाची बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे 


मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यांमध्ये जागोजागी चक्काजाम आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये हिंसक वळण मिळाले आहे वसमत हून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसला अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिले आहे या बस मध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते परंतु हे प्रवासी  अगोदरच  गाडीतून उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे परंतु यामध्ये परिवहन विभागाची बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे अग्निशामक दलाच्या वतीने बसला लागलेली आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे

Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील तीनही आगारातील बससेवा ठप्प 

Hingoli : मराठा आरक्षणाचे अंमलबजावणी करा आणि मनोज रंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा यासाठी हिंगोली जिल्ह्यात जागोजागी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहेत आणि ठिकाणी टायरची जाळपोळ करत तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करण्यात आले आहेत या आंदोलनामध्ये नेहमीच रडारवर असतात ते म्हणजे परिवहन विभागाच्या बस या बसची अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड होत असते आणि जाळपोळ सुद्धा होत असते हे नुकसान टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने बस सेवा बंद केली आहे त्यामुळे हिंगोली कळमनुरी आणि वसमत या तीनही आगारातील बस फेऱ्या रद्द करण्यात आले आहे जिल्ह्यातील जवळपास 500 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटाका बसतोय 

Pune : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समजाचं आंदोलन

Pune : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समजाचं आंदोलन


मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात सकल मराठा समाजाचं आंदोलन


पुणे शहरात ठीक ठिकाणी आज सकाळपासून  मराठा समजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुरू आहेत आंदोलन


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन करत मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Vijaykumar Deshmukh : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर आमदार विजयकुमार देशमुखांचा फडणवीसांना फोन

Vijaykumar Deshmukh : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर आमदार विजयकुमार देशमुखांचा फडणवीसांना फोन


देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांशी फोनवरून साधला संवाद


"जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री संपर्कात आहेत, त्यांच्यासमोर आम्ही खुलासे करत आहोत"


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंदोलकांना आश्वासन


नारायण राणे, छगन भुजबळ, सदावर्ते यांचा निषेध ही आंदोलकानी फोनवरून फडणवीस यांच्यासमोर केला

Congress Accounts Frozen : लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका, खाती गोठवण्यात आली, काँग्रेसच्या सरचिटणीसांची माहिती

Congress Accounts Frozen : काँग्रेसने आयकर विभागावर मोठा आरोप केला आहे. काँग्रेस आणि युवक काँग्रेसची खाती गोठवण्यात आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, खाते गोठवल्यामुळे पगार देण्यासाठी पैसे नाहीत आणि बिलेही दिली जात नाहीत.

Pune Accident : पुण्यात पुन्हा अपघात, दुचाकीने पादचाऱ्याला उडवलं

Pune Accident : पुण्यात पुन्हा अपघात


पुण्यात मगरपट्टा रस्त्यावर दुचाकीने पादचाऱ्याला उडवलं


अपघातात तरुण गंभीर जखमी


ज्ञानोबा ढबळे असं अपघातात  जखमी झालेल्या तरुणाचं नाव


आज पहाटे  मगरपट्टा भागात झाला अपघात


मॉर्निंग वॉक साठी निघाल्यानंतर झाला अपघात 


अपघाताचा सीसीटीव्ही वायरल

Vijay Wadettiwar : लोकसभा निवडणुक काँग्रेसने लढू नये म्हणून साम दाम दंड भेदचा वापर मोदी सरकारकडून सुरू

Vijay Wadettiwar : सुप्रीम कोर्टाचा कालचा निर्णय भाजप आणि मोदी सरकारच्या जिव्हारी लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.


लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आयकर विभागाकडून काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहे. वरून 210 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे. 


काँग्रेस विरुद्ध अनेक षडयंत्र रचून ही काँग्रेस आणि पक्षाचे कार्यकर्ते मजबुतीने लढत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुक काँग्रेस ने लढू नये म्हणून साम दाम दंड भेद चा वापर मोदी सरकारकडून सुरू आहे.

राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड

Harshvardhan Patil : राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड


उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांची बिनविरोध निवड


 पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर संघावर भाजपचे वर्चस्व


राज्यसभा तिकीट नाकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनर्वसन

Parbhani : परभणी शहरासह जिल्ह्यात चक्का जाम, सर्वत्र प्रचंड पोलीस बंदोबस्त

Parbhani : परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आल आहे या आंदोलनामुळे परभणी पाथरी परभणी जिंतूर परभणी नांदेड परभणी गंगाखेड अशा अनेक महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे 

Solapur : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी सोलापुरात सकल मराठा समाज आक्रमक

Solapur : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी सोलापुरात सकल मराठा समाज आक्रमक


 भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर मराठा समाज बांधवांचे आंदोलन 


"सरकारने दिलेला शब्द पाळत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, जरांगे पाटील यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे"


आंदोलकांची आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे मागणी, केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधात ही आंदोलकांचा संताप 


विजयकुमार देशमुख यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर देखील होणार आंदोलन

Chhagan Bhujbal : 15 दिवसात 1 कोटी 58 लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रम आहे. अहवालात नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही

Chhagan Bhujbal : 15 दिवसात 1 कोटी 58 लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रम आहे. अहवालात नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही

Hasan Mushrif : मराठा समाजाला निश्चितच सरकार आरक्षण देईल, विशेष अधिवेशनात प्रश्न मार्गी लागेल

Hasan Mushrif : मराठा समाजाला निश्चितच सरकार आरक्षण देईल


20 तारखेला विशेष अधिवेशन आहे त्यात हा प्रश्न मार्गी लागेल


पालकमंत्री म्हणून अनेक प्रश्न मुख्यमंत्री यांच्या सोबत मांडत आहे


त्यांचा हा दौरा यशस्वी होईल


महालक्ष्मी आणि जोतिबा तीर्थक्षेत्र आराखडा हा प्रश्न मार्गी लागेल

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या अहवालात नेमकं काय? 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या अहवालात नेमकं काय? 


मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण
ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना आधीपासून जे आरक्षण मिळतं तेच मिळणार
ज्यांच्याकडे कोणत्याही नोंदी नाहीत, त्या सर्व मराठा समाजाला सरसकट स्वतंत्र आरक्षण मिळणार

Kishori Pednekar : कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरण, किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा

Kishori Pednekar : कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरण


माजी महापौर किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा तूर्तास कायम

22 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

नियमित कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्यानं दिलेला अंतरिम दिलासा हायकोर्टाकडून कायम

दरम्यान अटक झाल्यास 30 हजारांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे हायकोर्टाकचे निर्दश कायम

Baramati : बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित, नणंद विरुद्ध भावजय सामना होण्याची शक्यता

Baramati : बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित


केवळ अधिकृत घोषणा बाकी


बारामती परिसरात त्यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ लागला फिरू


नणंद विरुद्ध भावजय असा सामना होण्याची शक्यता

Nana Patole : राज्यातील सरकार किती क्रूर आहे - नाना पटोले

Nana Patole  - राज्यातील सरकार किती क्रुर आहे हे मुख्यमंत्री आज बोलताना पाहायला मिळत होतं
- ⁠काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की या आंदोलनाचा निवडणूकीवर काही परिणाम होत नाही अस मम्हणाले 
- ⁠इंग्रजांच्या विरोधात ही महात्मा गांधी यांनी आंदोलन केली
- ⁠मागासवर्ग आयोगाने सकाळी अहवाल दिला
- ⁠सहा दिवसात 27 लाख लोकांचा सर्व्हे केला
- ⁠कशाच्या आधारावर हा सर्व्हे केला
- ⁠मराठा समाजाची फसवणूक करणार आहे का

Solapur : बार्शीत मराठा बांधवांकडून कडकडीत बंद, बंदची हाक

Solapur : बार्शीत मराठा बांधवांकडून कडकडीत बंद


मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आज बार्शी बंदची हाक


बार्शी शहर तालुक्यातील अनेक गावात मराठा बांधव आक्रमक


बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट


बार्शी शहरातील व्यापाऱ्यांकडून बंदला चांगला प्रतिसाद


बार्शी शहरातील अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार

CM Eknath Shinde : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती

CM Eknath Shinde :  राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर 


आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती 


मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित चर्चा करण्यासाठी एक दिवसीय खास अधिवेशन बोलावलं


मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, 


आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

Manoj Jarange : हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंकडून उपचार घेण्यास होकार

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हायकोर्टाच्या आदेशानंतर उपचार घेण्यास होकार


जरांगेनी गुरुवारी त्यांचे सहकारी आणि डॉक्टरांच्या विनंतीवरुन स्वतः वरील उपचारांना होकार दिला.


न्यायालयाच्या आदेशानुसार जालना जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांच्या देखरेखीखाली त्यांना सलाईन लावण्यात आलं. 


मनोज जरांगेंनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. पण गुरुवारी त्यांची तब्येत जास्त बिघडली. 


जरांगे उपचार आणि पाणी घेण्यास मनाई करत होते, त्यामुळे राज्य सरकारने कोर्टात तक्रार दिली. 


यानंतर न्यायालयाने जरांगेंना उपचार घेण्याचे आदेश दिले.

Mumbai : मुंबईत यंदा गणेशोत्सवात मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Mumbai : मुंबईत यंदा गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी


वर्षभरातील 15 दिवस सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येते.


त्यापैकी 13 दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे

Bharat Bandh : संयुक्त किसान मोर्चाकडून आज भारत बंदची हाक

Farmer Protest: शेतमालाला एमएसपीसह  इतर अनेक मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतलाय. 


शेतकऱ्यांच्या विविध आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. 


सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत ग्रामीण भारत बंद पाळण्यात येणार आहे. 


या संपाला 'ग्रामीण भारत बंद' असे नाव देण्यात आलं आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. 


व्यापारी वर्गाने या घोषणेला विरोध करत भारत बंदच्या दिवशी देशभरातील दुकाने उघडण्याचे आदेश जारी केले आहेत. 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पत्रकार परिषद, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मराठा समाजाचे पदाधिकारीही उपस्थित

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा समाजाचे पदाधिकारीही उपस्थित


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पत्रकार परिषद


मराठा समाजाच्या मागणीनुसार कायदेतज्ञ आणि वकील यांच्याशी मुख्यमंत्री यांनी केली आहे चर्चा


मराठा आरक्षणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री करणार महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही थोड्याचवेळात वर्षावर दाखल होणार असल्याची माहिती

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांची पाहणी करणार

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी सुरू केली आज अजित पवार यांचा बारामती बुत कमिटी मेळावा तर बारामती तालुक्यातील पणदरे येथे शेतकरी मेळावा अजित पवार घेणार आहेत आज सकाळी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी अजित पवार करीत आहेत त्यानंतर दुपारी तीन वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. सकाळी बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील फॉरेस्टच्या कामाची पाहणी अजित पवारांनी केली.

Buldhana : जालना खामगाव मार्गावर स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यास लुटलं, 27 लाख रुपये लुटून चोरटे पसार

Buldhana : मध्यरात्री जालना येथील एका स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यास खामगाव जालना महामार्गावर अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लुटून चोरट्यांनी 27 लाख रुपयांची लूट केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांकडून स्टील कंपनीची वसुली करून हा कर्मचारी जालनाकडे जात असताना मध्यरात्री अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या कर्मचाऱ्यांची कार अज्ञात इसमानी थांबवून वाहन चालक व या कर्मचाऱ्यास दोरीच्या साह्याने बांधून त्यांच्याकडे असलेले सत्तावीस लाख रुपये लांबविले आहेत. यामुळे मात्र बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. गेल्या दोन आठवड्यात रस्ता अडवून लुटीची ही पाचवी घटना असल्याची माहिती समोर येत आहे.

Vasai : वसई बाभोला परिसरात रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात

Vasai : वसई पश्चिमेच्या बाभोला परिसरात रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे.  


मोटरसायकल आणि चार चाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाली आणि धडकेमध्ये मोटर सायकल स्वार गंभीर जखमी


त्याच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. 


प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत कुटीनो हा जिम मधून आपल्या घरी दुचाकीवर वसईला जात होता.  


दरम्यान त्याच ठिकाणाहून समोरून चार चाकी गाडी ही वसई स्टेशनच्या दिशेने येत होती.


दोघांची समोरासमोर धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे. 



कारचे  एअरबॅग उघडल्याने कार मधील वाहनचालकाला काही झालं नाही. मात्र यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. 

Ahmednagar : अहमदनगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर रात्री उशिरा अज्ञातांनी जाळले टायर...

Ahmednagar : अहमदनगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर रात्री उशिरा अज्ञातांनी जाळले टायर


मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळल्याची चर्चा...


मराठा आरक्षण मुद्द्यांवरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली जात असल्याने मराठा युवकांनीच टायर पेटवून दिल्याचा संशय...


नगर-पाथर्डी रस्त्यावर देखील चांद बेबी महालाजवळही टायर जाळल्याची माहिती...

Political News : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या मुलाने दिला भाजपला घरचा आहेर

Political News : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या मुलाने दिला भाजपला घरचा आहेर 


माधव भंडारी राज्यातील काही न मिळालेल्या नेत्यांपैकी एक असल्याची व्यक्त केली खंत 


मोदींबरोबरचा फोटो ट्विट करत व्यक्त केली खंत 


चिन्मय भंडारी यांनी ट्विटमध्ये वडिलांच्या निस्वार्थी स्वभावाचा, त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि गेल्या ५० वर्षात संघटना राज्यात पोहचवण्यात केलेल्या मोलाच्या कार्याचा केला आहे उल्लेख 


त्यांनी नेहमी स्वतःपेक्षा पक्ष आणि जनता यांना महत्त्व दिलं त्यामुळे त्यांना राजकीय वर्तुळात मानाच स्थान आहे

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.