Maharashtra News Live Updates : विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ कामकाज एक तासासाठी तहकूब
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
गडचिरोली : जिल्ह्यातील घोट - मुलचेरा महामार्गांवर धावत्या बसने पेट घेतला, बसमधील प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस ST बसेसची अशी दुरावस्था समोर येणे सतत सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी आगारात भंगार बसेस असल्याचे चित्र आपण अनेकदा बघतील आहे कधी बसवरुन छप्पर निघालेली बस तर, कधी एका हातात स्टेरिंग आणि एक हातात वायपर पकडून चालक चालविताना आपण बघितलं. आता बसेस ना आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र, त्याच बसा दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशांच्या जीव धोक्यात आले आहे. जिल्ह्यात नवीन 40 बसेस मंजूर झाले आहेत मात्र ते कधी जिल्ह्यात दाखल होतील याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सर्व बसेस लवकरात लवकर बदलून नवीन बसेस आणाव्यात अशी लोकांची मागणी आहे.
भिवंडी : भिवंडी मनपा मुख्यालयासमोर नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. नालेसफाईच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परशुराम पाल असं आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून शहर पोलिसांनी पालिका मुख्यालया समोर त्याला आंदोलन करताना ताब्यात घेतले.
Mahendra Thorve vs Dada Bhuse : विधिमंडळांच्या लॉबीमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले.
Kalyan BJP Protest : महिलांवर लैंगिक अत्याचार तसेच जमीन बळकवल्याबाबत गुन्हे दाखल असलेल्या पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख विरोधात कल्याण मध्ये भाजप महिला आघाडीने निषेध आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान भाजप महिला आघाडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह शाहजहान शेख विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शाहजहान शेख यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन करत निषेध नोंदवला. महिलांवर अत्याचार करणाऱ्या शहाजहान शेख सारख्या आरोपीला पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जी यांचे सरकार पाठीशी घालते, त्याला अटक करत नव्हते, त्याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय यंत्रणांवर देखील शेळके समर्थकांनी हल्ला केला. शाहजहान शेख याचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Beed News : बीडच्या गेवराईमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनासाठी महत्त्वाचा ठराव घेण्यात आला आहे. यामध्ये सरकारने जे 10 टक्के आरक्षण दिले आहे, हे मराठा समाजाला मान्य नसून यापुढे मराठा समाजातील कोणताही व्यक्ती राजकीय सभेला जाणार नाही किंवा राजकीय पुढार्याच्या स्टेजवर जाणार नाही, त्याचबरोबर आरक्षणासाठी जे संविधानिक पद्धतीने आंदोलन सुरू आहे. हे जर आंदोलन चिरडण्याचा सरकारने प्रयत्न केला तर समाज जेलभरो आंदोलन करणार आहे तर जनतेला आणि व्यापाऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचा आंदोलन मराठा समाज बांधव करणार नाहीत असे ठराव एका महत्त्वाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले असून कोणत्याही तरुणावर किंवा मराठा समाजातील व्यक्तीवर दबाव टाकून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याच ठरवत मंजूर करण्यात आलं आहे.
Satyajit Tambe : सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे की, 'भारत सरकारची जी पेन्शनसंदर्भात योजना असेल तीच महाराष्ट्र सरकारने करावी असा करार आहे. जुनी पेन्शन योजनाच हवी यासाठी अनेक आंदोलनं केलेली आहेत आज शेवटचा दिवस आहे, आज काहीतरी निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे. शिक्षकासाठी काही काम असतील तर ठीक आहे, पण उठसुठ कोणीही येतो आणि शिक्षकांना काम सांगतो हे योग्य नाही. इलेक्शन ड्यूटी करणं हे बंधनकारक आहे, असं म्हटलं तरी इलेक्शन हे वारंवार होत नसतं त्यामुळे ते ठीक आहे. पण, अशैक्षणिक काम शिक्षकांना लावता कामा नये. राजस्थान बिहारमध्ये वकिलांना संरक्षण देण्याचा कायदा करण्यात आलेला आहे आपल्याकडे तो ड्राफ्ट तयार आहे पण कायदा लागू नाही झालाय, तो कायदा लवकरात लवकर लागू व्हावा अशी आमची मागणी आहे. पुणे नाशिक महामार्ग हा सरलमार्गाने व्हायचलाच हवा तो संगमनेर जुन्नर या मार्गाने व्हायला हवा इथल्या लोकांच्या विकासाच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. राज्यात ड्रग्जविरोधात कारवाई सुरु आहे पोलिसांच्या कारवाईच मी स्वागत करतो. मी अपक्ष आमदार असल्याने सगळ्या पक्षांसोबत सबंध ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे मी ते करत असतो.'
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याचा क्रिकेटपटू भाऊ कृणाल पांड्या या दोघांनी अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंगला हजेरी लावली
Bhaskarao Khatgaonkar : डॉक्टर मीनल खतगावकर यांनी दोन दिवसापूर्वी भाजपा प्रवेश करून पक्ष निरीक्षकाकडे भाजपाची उमेदवारी मागितल्या या संदर्भात त्यांचे सासरे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना विचारणा केले असता ते म्हणाले की, "सुरुवातीपासून डॉक्टर मीनल खतगावकर यांना अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राहिला प्रश्न उमेदवारिचा प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे, तिने उमेदवारी मागितली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगतच्या उर्जानगर भागात घनदाट वस्तीत फिरणाऱ्या अस्वलींचा व्हिडीओ झाला व्हायरल, ऊर्जानगर भागातील वार्ड क्रमांक सहामधील घटना, या भागात हे अस्वल कुटुंब सातत्याने दिसत असल्याने नागरिकांमध्ये दहशत, तीन अस्वलींच्या एकत्रित दर्शनाने नागरिक भयभीत, वनविभागाकडे अस्वलींच्या बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Lonavala Accident : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा येथे तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना लोणावळ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विचित्र अपघातामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
अजित पवार अधिवेशनात काय म्हणाले?
- हा अंतरीम अर्थसंकल्प आहे
- जुनमध्ये पुर्ण अर्थसंकल्प मांडणार आहे
- त्यावेळी केंद्राचा अर्थसंकल्प सादर होईल
- गरीब युवक आणि करदाता यांना समोर ठेवला आहे.
- शाश्वत आणि पर्यावरण पुरक असा विकास असणार आहे
- 1 ट्रिलीयन अर्थसंकल्प करण्यासाठी समिती गठीत केली आहे
- यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत
- राज्यातील आपला सांस्कृतिक वारसा कसा होईल या संदर्भात आपण अयोध्येत महाराष्ट्र सदन सुरु करण्याचा निर्णय घेतला
- मातंग समाजासाठी बार्टी आणी सारथी सारख आरटी साथापन करण्याचा निर्णय घेतला
- घरेलू कामगार यांच्या संदर्भात ही निर्णय घेतला
Meenal Khatgaonkar in BJP : माजी खासदार भास्करराव खतगावकर यांची सून मीनल खतगावकर यांचा मध्यरात्री भाजप मध्ये पक्ष प्रवेश झाला. तसेच लोकसभेसाठी इच्छुक खासदार म्हणून त्यांचा नावाची शिफारस भाजप पक्ष निरीक्षकांकडे करण्यात आली आहे. आता भाजपवासी झालेलं अशोक चव्हाण यांचा समर्थक गटाकडून मीनल खतगावकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यमान खासदारान सह इच्छुक उमेदवारांची चांगली स्पर्धा लागली आहे.
अभ्युदय नगरच्या रखडलेल्या पुनर्विकासाला हिरवा कंदील
कॅबिनेट बैठकीतील निर्णयाची आज विधानसभेत घोषणा होणार
धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती घोषणा
गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय
सुमारे 5 हजार कुटुंब, तर 25 लोकांना मोठा दिलासा मिळणार
म्हाडामार्फत 33(5) अंतर्गत पुनर्विकास करण्याचा निर्णय
म्हाडा नोडल एजन्सी म्हणून काम करणार
निविदा काढून अभ्युदय नगरचा पुनर्विकास केला जाणार
Sangole Crime News : सांगोला तालुक्यातील महुद येथे पहाटे एका इमारतीला आग लागल्यानंतर झालेल्या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. स्फोटाचे गूढ कायम आहे. सिलेंडरचा स्फोट असल्याचा संशय आहे. मात्र, स्फोटाचा अवका खूप मोठा असल्याने पोलिसांसमोर चौकशीचे आव्हान आहे.
BJP Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा जनतेसमोर मांडत असतो. मात्र यावेळी भाजपने जाहीर नाम्यासाठी वेगळी शक्कल लढवली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांच्या समावेश करावा तसेच विकसित भारत कसा असावा यासाठी भाजपाने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. 15 मार्चपर्यंत नागरिकांनी आपल्या सूचना पक्ष कार्यालयात पाठवाव्यात , असे आवाहन भाजपकडून करण्यात आलंय.
चांगल्या सूचनांचा संकल्पपत्रात समावेश करावा या हेतूने हे अभियान सुरु करण्यात आले आहे. नमो ॲप, ट्वीटर सारख्या अशा विविध मार्गानेही नागरिक भाजपाला सूचना करू शकतात असे भाजपकडून सांगण्यात आलेय. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदी सरकारच्या विकास कामांची माहिती देण्यासाठी ''विकसित भारत - मोदी की गारंटी रथ'' (व्हिडीओ व्हॅन ) सर्व लोकसभा मतदारसंघांत फिरणार असून त्याद्वारेही सामान्य नागरिकांना आपल्या सूचना भारतीय जनता पार्टीकडे कळविता येणार आहेत. या व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून २५० ठिकाणी समाजातील वेगवेगळया घटकांशी संवाद साधला जाणार आहे. या संवादातून आलेल्या सूचनांचाही समावेश संकल्प पत्रामध्ये केला जाणार आहे.
Farmers Protest Fifth Day : माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला पायी लाँग मार्च सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. दरम्यान आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा इशारा आंदोलकांकडून सरकारला देण्यात आला आहे. आतापर्यंत शासनासोबत तीन बैठका आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या झाल्या आहेत मात्र कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक होणार असून या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकीकडे ही परिस्थिती असतांना दुसरीकडे आंदोलनामुळे शहरातील मुख्य रस्ता पाच दिवसांपासून बंद असल्याने शहरवासीय मात्र वेठीस धरले जातायत.
Maharashtra Assembly Session 2024 : विधानपरिषदेचे दहा आमदार निवृत्त होणार आहेत. या आमदारांना आज सभागृहात निरोप दिला जाईल. विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहे. आज निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या 31 वर जाणार आहे.
Unseaonal Rain : ठाण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाचा शहरातील सर्वाच भागात म्हणजे घोडबंदर, वागळे इस्टेट कळवा या ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे.
Amravati News : अमरावती-नागपूर महामार्गावरील मोझरी जवळच्या कृष्णा पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करत लुटमार केली आहे. पेट्रोल पंप वरील 9 हजार लुटले, लूटमारीच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. रात्री अकरा वाजताची घटना उघडकीस आली आहे. मारहाण करणाऱ्या चार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -