Maharashtra News Live Updates : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाणे येथील कार्यालयात झाली चोरी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Mar 2023 10:17 PM
Gunaratan Sadavarte: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाणे येथील कार्यालयात झाली चोरी

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाणे येथील कार्यालयात झाली चोरी


ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या कार्यालयात एसी, टीव्ही, वॉशिंग मशीन चोरीला गेलं. 


अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने वागळे इस्टेस्ट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. 

रत्नागिरीमधील खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात सभा

रत्नागिरीमधील खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात सभा सुरू होणार आहे. माजी आमदार रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. 

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पाहणीसाठी कृषी अधिकाऱ्यांनसह स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या बांधावर

बुलढाणा  जिल्ह्यात गेल्या तीन  दिवसापासुन ठिक ठिकाणी वादळी वाऱ्यासह , पाऊस व गारपिट झाली आहे. यात शेतकऱ्यांच  गहू, हरभरा ,कांदा , ज्वारी भाजिपाले सह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकाऱ्यांसह स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल शेत शिवारात जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. 

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणांची हुल्लडबाजी; रस्त्यावरील होर्डिंग फाडले, बसची काचही फोडली

Chhatrapati Sambhaji Nagar News: नामांतराच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले तर, महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आली आहे. नामांतराच्या समर्थनात आज शहरात शहरातील क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. 








 






 











Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात 20 एकरवरील बटाटा झाला खराब, बांधावर कुणीच आलं नाही, शेतकऱ्यास अश्रू अनावर

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात 17 मार्च रोजी एकाच दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) 2 हजार 598 हेक्टर वरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्हा कृषी विभागाच्या (Agriculture Department) प्राथमिक अहवालात आकडेवारी आली समोर आहे. एकीकडे शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असतांना दुसरीकडे सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडले असल्याचे चित्र आहे. 

Shirdi News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावात गारपीट; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नुकसानीची पाहणी

Shirdi News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता आणि संगमनेरसह अनेक गावात काल गारपीट झाली. हातातोंडाशी आलेलं पीक हातातून जाताना पाहण्याशिवाय बळीराजा समोर पर्याय उरलेला नाही. आज जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक गावात थेट बांधावर जात नुकसानीची पाहणी करत आढावा घेतला. राहाता तालुक्यातील राजुरी गावाजवळ असलेल्या शिवाजी दळे यांच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकाचे संपूर्ण नुकसान कालच्या गारपिटीने केले असून पालकमंत्री शेतात येताच शेतकऱ्याने समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी भूमिका विखे यांनी सांगितली असली तरी शेतकऱ्याने मांडलेली व्यथा हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनात 'हिंदू जनगर्जना मोर्चा

Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतराच्या समर्थनात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 'हिंदू जनगर्जना मोर्चा' काढण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मोर्चा काढला जात आहे. दरम्यान साडेअकरा वाजता या हिंदू जनगर्जना मोर्चा सुरु झाला आहे. शहरातील क्रांती चौक येथून निराला बाजार मार्गे महात्मा ज्योतीबा फुले चौकापर्यंत मोर्चा निघणार आहे. मोर्च्यात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातील शिवभक्त शहरात दाखल होताना पाहायला मिळत आहे.


'हिंदू जनगर्जना मोर्च्या'ला सुरुवात; पाहा फोटो

Wipro Layoff : आयटी कंपनी विप्रोकडून 120 कर्मचाऱ्यांना नारळ

IT Firm Wipro Layoffs : जागतिक मंदीच्या (Global Recession) सावटाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आर्थिक मंदीच्या सावटाखाली कंपन्यांमधील कर्मचारी (Sacks Employees) कपातीचं सत्र सुरुच आहे. आता पुन्हा एकदा विप्रोकडून नोकरकपात (Wipro Layoff ) करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर टेक आणि आयटी कंपन्यांकडूनच गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना हटवण्यास सुरुवात केली होती आणि अजूनही नोकरकपात करण्यात आहे. 

Bageshwar News : बागेश्वरधाम सरकारच्या कार्यक्रमातील चोरांच्या बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज

Bageshwar News : बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या काल शनिवारी दिव्य दर्शन सोहळ्यात चोरांनी आपली हातसफाई दाखवली. जवळपास 36 भाविकांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या घटनेची नोंद केली आहे. आज ही बागेश्वरधाम येथे कार्यक्रम आहे. मात्र आजच्या कार्यक्रमासाठी पोलीस यंत्रणा अधिक सज्ज झाली आहे. साध्या वेशात पोलीस गर्दीत असणार आहेत आणि चोरांवर करडी नजर ठेवणार आहेत.

Beed RTO : जीपीएस न बसवल्याने गौन खनिजाची वाहतूक करणारे 475 वाहन ब्लॅक लिस्टमध्ये

बीड जिल्ह्यामध्ये गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या 475 वाहनांवर जीपीएस प्रणाली न बसवल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ही वाहन ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहेत. अवैद्य उत्खनन आणि वाहतुकीच्या घटनांना प्रतिबंध घालावा यासाठी राज्य शासनाने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शासनाचे नियम मोडून आपल्या वाहनांवर जीपीएस प्रणाली न बसवणाऱ्या 475 वाहनांवर आता ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची कारवाई बीडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केली आहे

Beed Chile Marriage : गेवराई पोलिसांनी रोखले दोन बालविवाह

Beed Chile Marriage : गेवराई तालुक्यातील दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींचा विवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन हे दोन्ही बालविवाह रोखले. तालुक्यातील नागझरी आणि जातेगाव रोड या ठिकाणी हे दोन बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईन आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कायद्याचा धाक दाखवून वऱ्हाडी मंडळींची समजूत काढली आहे. या दोन्ही बालविवाहांमध्ये एका मुलीचे वय तेरा वर्षे तर दुसऱ्या मुलीचे वय 17 वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nashik Breaking : अवकाळी पावसामुळे 2 हजार 598 हेक्टर वरील शेतीपिकाचं नुकसान

Nashik Breaking : नाशिक जिल्ह्यात 17 मार्च रोजी एकाच दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे 2 हजार 598 हेक्टर वरील शेतीपिकाचे नुकसान


- कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात आकडेवारी आली समोर


- एकीकडे शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असतांना दुसरीकडे सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडले 


- कुठलेही अधिकारी, तलाठी, कर्मचारी पाहणी करण्यास येत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार

Sanjay Raut : देशात हुकूमशाहीचं सरकार, न्यायाधीशांना धमक्या देण्याचं काम सुरु : संजय राऊत

Sanjay Raut : सध्या न्यायव्यवस्था खिश्यात टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू, देशात अजून असे काही न्यायाधीश आहेत की जे सरकारच्या दबावाखाली येत नाहीत, मात्र त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांची गुलाम राहावी यासाठी धमकी दिली जात आहे. कायदा मंत्री किरण रिजीजूंचा न्यायालयावर दबाव आहे. 

PCMC Crime : पिंपरी गोळीबारानं हादरली; सराईत गुन्हेगाराकडून हार-फुले विक्रेत्यावर गोळीबार

PCMC Crime News : पुण्यात (Pune News) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pcmc News) सातत्याने गुन्हेगारीची प्रकरणं वाढत आहे. त्यात क्षृल्लक कारणामुळे गोळीबार केल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातून समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून एका हार फुले विक्रेत्यावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना दिघी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली. शनिवारी (दि.18) रात्री साडे बाराच्या सुमारास चऱ्होली बु. येथील बाआरटी काटे कॉलनी, चोविसावाडी येथे घडली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur Breaking : शिवराज नाईकवाडे यांना सचिव पदावरून का हटवलं?, कोल्हापूरकरांचा सवाल

Kolhapur Breaking : शिवराज नाईकवाडे यांना सचिव पदावरून का हटवलं?


कोल्हापूरकरांचा पालकमंत्री दीपक केसरकर यांना घेराव घालून सवाल 


कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला एका रात्रीत हटवण्याचे कारण काय?


जिल्हाधिकारी मनमानी करत असल्याचा कोल्हापूरकरांचा आरोप

Chhagan Bhujbal Girish Mahajan Meet : भुजबळ आणि महाजन यांचा नाशिक ते लातूर एकत्र विमान प्रवास

राष्ट्रवादी- भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचा शनिवारी नाशिक ते लातूर एकत्र विमान प्रवास


आज देखील दोन्हीं नेते नांदेड ते मुंबई विमान प्रवास करण्याची शक्यता - सूत्र 


दोन दिवस सलग विमान प्रवास होत असल्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चाना उधाण

CM Ratnagiri Sabha : 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार उद्धव ठाकरेंना उत्तर

Rantaniri News : मुख्यमंत्र्यांच्या खेडमधील सभेतून 'लाव रे तो व्हिडीओ'च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना दिलं जाणार उत्तर


ठाकरेंनी आजपर्यंत 'शरद पवार' यांच्यासह काॅग्रेसवर केलेल्या टिकेचे व्हिडिओ लावून ठाकरेंना केलेल्या विधानांची आठवण शिवसेनेकडून करून दिली जाणार


ठाकरेंनी कोकणाकडे कसे दुर्लक्ष केलं, ठाकरेंना सोडून का ४० आमदार गेले याचं स्पष्टीकरण ही याच सभेच्या मंचावरून कोकणवासियांना दिलं जाणार


एकूण ठाकरेंच्या सभेला गोळीबार मैदानातील सभेतून 'करारा जबाब' दिला जाणार

Kolhapur Breaking : पालकमंत्री आढावा बैठकीसाठी आले पण, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वारच बंद

Kolhapur Breaking : पालकमंत्री आढावा बैठकीसाठी आले खरे...पण जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वारच बंद


प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ


आढाव बैठकीसाठी पालकमंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल पण मुख्य गेट बंद


मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने पालकमंत्री यांचा ताफा दुसऱ्या गेटकडे 


कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री याच्या उपस्थितीतीत आढावा बैठक

Shirdi News : हातातोंडाशी आलेलं पीक गारपिटीमुळे गेलं; बळीराजाचं मोठं नुकसान

Shirdi News : दोन दिवसांनी परदेशात निर्यात होणारे द्राक्ष पीक गारपिटीने अक्षरश: शेतातच पडण्याची वेळ आली आहे. राहाता तालुक्यातील राजुरी गावा जवळील शिवाजी दळे या शेतकऱ्याच्या द्राक्ष पिकाला 85 रुपये भाव मिळाला. दोन दिवसांनी तोडणी सुरू होऊन द्राक्षे निर्यात होणार मात्र काल झालेल्या गारपिटीमुळे दळे यांच्या तीन एकर क्षेत्रातील पिकाचं नुकसान झालं आहे. 

Barshi Rape Case :

बार्शीत झालेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि प्राणघातक हल्याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांच्या नेत्यामध्ये वाद प्रतिवाद सुरु आहेत. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणबद्दल ट्विट करत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रतिउत्तर दिलंय. 5 मार्च रोजी बार्शीतल्या एका गावातील दोघा नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. इतक्यावर हे नराधम थांबले नाहीत तर आमच्या विरोधात तक्रार का दिली असं म्हणत दुसऱ्याचं दिवशी तीच्या घरात घुसून सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की या अल्पवयीन मुलीच्या हाताची बोटं तुटली, मागील 13 दिवसापासून या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ह्याच प्रकरणाबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आणि राजकीय वाद प्रतिवाद सुरु झाले आहेत.

Nashik Unseasonal Rain: नाशिकसह जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा; पाच जनावरे दगावली, पिके कोलमडली

Nashik Unseasonal Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यात शनिवारी सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात कालच्या अवकाळी पावसात जिल्ह्यातील पाच जनावरे दगावली असून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आली आहे. 

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील 3468 हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका; अधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी

Solapur News : अवकाळीचा दणक्यात सोलापूर जिल्ह्यातील 101 गावांना काल गारपिटीचा मोठा फटका बसल्याने जवळपास 4500 शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून संप असूनही महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे कर्मचारी पंचनाम्याची दाखल झाले आहेत. काल दुपारी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरससह काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने आंबा, द्राक्षे, गहू, मका अशा हाताशी आलेल्या पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात पंढरपूर तालुक्यातील 5 गावातील 1800 हेक्टर क्षेत्राला मोठा दणका बसला आहे. आज सकाळी आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रांताधिकारी गजानन गुरव, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांसह बांधावर जाऊन गारपिटीच्या नुकसानीची पाहणी केली. यात द्राक्ष आंबा या बंगना या गारपिटीचा खूप मोठा फटका बसला असून द्राक्षाचे मणी फुटल्याने घड नसायला सुरुवात झाली आहे. तर आंब्यालाही गारांचा मार लागल्याने आंब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. 

Nandurbar Corp Loss : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज अवकाळी पावसाने झालेल्या ठाणेपाडा ,आष्टे , सुतारे, अजेपुर, हरिपूर, घोगळपाडा, अंबापुर या अवकाळी पाऊस अन गारपीटग्रस्त नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ.गावित यांनी आज या भागाचा दौरा केला.जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ.गावित यांनी अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. याभागातील कांदा,केळी,पपई,मका,गहु टोमॅटो व इतर फळ पिकांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही पालकमंत्री  डॉ.गावित यांनी सांगितले.
Mahadev Jankar : महादेव जानकर यांचा 'एक ला चलो रे' चा नारा!
Palghar News : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. भाजपने शिंदे गटासोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर कोण किती जागा लढणार हे सुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे जानकर यांनी आगामी निवडणुकीमध्ये 'एक ला चलो रे' ची ही घोषणा केली आहे. ते पालघर मधील मनोर येथे पत्रकारांची बोलत होते.
Chandrakant Patil : भाजप कायम निवडणुकीची तयारी करत असतं; बावनकुळेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून पडदा

Chandrakant Patil : भाजप आणि शिंदे गटाच्या युतीत (Chandrakant patil) जागा वाटपावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं होतं. पण अशी चर्चा आत्ताच करणं, गरजेचे नाही, असं म्हणत पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटलांनी रंगलेल्या विविध चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी भाजप विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांची नेहमीच तयारी करत असतं, आमची हीच तयारी शिवसेनेला उपयोगी ठरेल, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये ते बोलत होते.

Mumbai News : आदित्य ठाकरेंनी लावली आरोग्य शिबिराला हजेरी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावतीने काळजी आरोग्याची,जबाबदारी शिवसेनेची, उपक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिराच आयोजन वरळी मतदार संघात करण्यात आले होते. कॅन्सर, मानसिक आरोग्य,हृदयरोग,ईसीजी,मधुमेह,रक्तदाब आणि इतर अनेक आजारांची तपासणी आणि नंतर उपचार असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी या शिबिराला हजेरी लावली.मुंबईत सर्वत्र असे आरोग्य कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले.तसेच वरळी मतदार संघात विविध विकासकामाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांनी केला.

Jalgaon News : जळगावात वादळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान; बळीराजा आर्थिक संकटात

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने अनेक भागांत केळीसह काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका आणि ज्वारीच्या पिकांचं नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्हयात कमी अधिक पाऊस सुरू असला तरी पिकांचं मात्र फारसं नुकसान झालं नव्हतं. मात्र, आज मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, ज्वारीसह केळी पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील काळात झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही मिळाली नसताना पुन्हा एकदा नुकसानीचा सामना करावा लागल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पुढे आता यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गात केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, भुसावळ, मुक्ताई नगर आणि पाचोरा तालुक्यात पिकांचं मोठ नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Thane Crime : दोन पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अटक
Thane Crime : ठाणे पूर्वेतील कोपरी येथे रेल्वे स्थानक जवळ 17 मार्च रोजी एक अज्ञात इसम अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी ठाणे मालमत्ता गुन्हे शाखेच्या विभागाला प्राप्त झाली या मिळालेल्या माहितीच्या आधारे मालमत्ता गुन्हे शाखेने रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून उल्हासनगर 5 प्रेमनगर टेकडी येथे राहणाऱ्या 26 वर्षीय आकाश अमृत शिरसाठ या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आणि झडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे दोन अग्निशस्त्र आणि मॅग्झिनसह 6 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांना मिळालेल्या मुद्देमालानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आकाश शिरसाठ याला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता हा आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असल्याचे उघडकीस आले.
Gondia Water Issue : एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण
Gondia Water Issue : संपूर्ण राज्यात जुनी पेंशनला घेऊन सगळे शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. याचा फटका आता सर्वसामान्य लोकांना बसत आहे. असाच फटका गोंदिया जिल्हा आमगाव येथील परिषद अंतर्गत येत असलेल्या आठ गावांना या संपाचा फटका पडत आहे. मागील चार दिवसा पासून या गावात पाणी पुरवठा होत नाही आहे. चार दिवस पासून नगर परिषद द्वारे लावण्यात आलेले नळ योजने अंतर्गत पाणी येत नसल्याने या आठ गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट कारवाई लागत आहे.  पाण्यासाठी नागरिकांना दूर पर्यंत जावे लागत आहे, त्याच प्रमाणे विहिरीचा किंवा बोरवेल चा पाण्याची सोय करावी लागत आहे. 
Old Pension : संपावर गेलेल्या संवेदनाहीन आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
जुन्या पेन्शन साठी संपावर गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बीडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे. दोन दिवसापूर्वी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अपघातग्रस्त ऊसतोड मजुरांना उपचारासाठी दाखल करण्यात आला होत मात्र या रुग्णावर उपचार करण्याऐवजी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका हे घोषणा देताना पाहायला मिळाले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता संपात सहभागी झालेल्या या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्याकडे केली आहे.

 
Chandrakant Patil : भाजप आणि शिंदे गटाच्या युतीत जागा वाटपावर आत्ताच चर्चा करणं, गरजेचे नाही : चंद्रकांत पाटील
भाजप आणि शिंदे गटाच्या युतीत जागा वाटपावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं होतं. पण अशी चर्चा आत्ताच करणं, गरजेचे नाही. असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटलांनी रंगलेल्या विविध चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी भाजप विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांची नेहमीच तयारी करत असतं, आमची हीच तयारी शिवसेने उपयोगी ठरेल. असं ही चंद्रकांत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं. पिंपरी चिंचवड मध्ये विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी ते आले होते. यावेळी जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की, त्यांनी कामावर परत रुजू व्हावं असेही ते म्हणाले. 

 

बाईट - , पालकमंत्री
Rahul Gandhi : दिल्ली पोलीस थेट राहुल गांधींच्या घरी पोहोचले; भारत जोडो यात्रेतील 'त्या' वक्तव्याप्रकरणी धाडलेली नोटीस

Delhi Police at Rahul Gandhi residence : दिल्ली पोलीस थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी (Delhi Police at Rahul Gandhi residence) पोहोचले आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या 'लैंगिक छळ' झालेल्या पीडितांचा उल्लेख केला होता. त्याची माहिती घेण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या नोटीसच्या संदर्भात दिल्ली पोलीस काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Amritpal Singh : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन, 20 मार्चपर्यंत पंजाबमधील इंटरनेट सेवा बंद

Punjab Amritpal Singh Search Operation : पंजाबमध्ये (Punjab) खलिस्तानी समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' (Waris Punjab De) संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या (Amritpal Singh) अटकेसाठी पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंहच्या 78 साथीदारांना अटक केली होती. NIA ने अमृतपालचा फायनॅन्सर दलजित सिंह कलसीसह चार साथीदारांना अटक केली आहे. या आरोपींना डिब्रुगडला नेण्यात येणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Ratnagiri News : ऐतिहासिक मैदानावर ऐतिहासिक सभा होणार : उदय सामंत

Ratnagiri News : रत्नागिरीमधील खेडमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेच्या पाहणीसाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गोळीबार मैदानावर पाहणी केली. यावेळी उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या 5 मार्चला झालेली सभा ही शिवीगाळ सभा होती. मात्र, आमची सभा ही विकासात्मक सभा असेल. ऐतिहासिक मैदानावर ऐतिहासिक सभा होईल अशी प्रतिक्रिया देत या सभेला मोठी गर्दी होईल अशी माहिती दिली. 

Solapur Barshi Farmer Loss : द्राक्ष बाग कोसळून सुमारे 15 लाखांचं नुकसान

Solapur Barshi Farmer Loss : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बार्शी तालुक्यात देखील पाहायला मिळाला. बार्शीतील मालवंडी  येथील येथील शेतकरी जनार्दन थोरात या शेतकर्‍याची द्राक्ष बाग कोसळून सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले आहे. या सह झाडी बोरगाव, तांबेवाडी या गावातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान अवकाळी पावसाने केले आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बाग पूर्णपणे तयार होऊन द्राक्ष लगडलेली होती. काही दिवसात पीक बाजारात गेले असते मात्र वादळी वार आणि अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली

Pune Crime News : अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा; आंबेगावात आठवड्याभरातील दुसरी कारवाई; 2 लाखांचा माल जप्त

Pune Crime News :  पुण्यात शेतात (opium poppies)  गांजाची लागवड (Pune crime) केल्याच्या बातम्या आजपर्यंत आपण पाहिल्या आहेत. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील गंगापूर गावामध्ये अफुची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत शेतकऱ्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  आंबेगाव तालुक्यामधील गंगापूर गावामध्ये घोडेगाव घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कार्यवाही करण्यात आली आहे. 


आंबेगाव तालुक्यात मोजे गंगापूर येथील शेतकरी श्रीसंत  यांच्या शेतात 1 लाख 87 हजार रुपये किमतीचे अफुची शेती केल्याचं समजलं. अफुची शेती करण्यासाठी लागणारे, सर्व साहित्य, बी-बियाणे सुद्धा पोलिसांना यावेळी तपासात सापडले. तब्बल दोन लाख रुपयाचा आफूच्या शेतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासनी केली त्यात पोलिसांना अफुची शेती केल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांनी लगेच कारवाई केली आणि मुद्देमाल जप्त केला. 

Pune Accident News : चांदणी चोकात भरधाव वेगाने बस आली अन् थेट 15 ते 20 फुट खाली कोसळली...

Pune Accident News : पुण्यातील अपघाताचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही आहे.  मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून कोसळली.   हा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. या अपघातात  आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जात होती. यावेळी बावधन परिसरात मुख्य रस्त्यावरुन सर्व्हिस रोडवर जात होती. त्यावेळी बसचालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट 15 ते 20 फुट खाली कोसळली. सुदैवानं या अपघातात एकाचाही मृत्यू झालेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात भीषण होता मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही बस मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे बायपासवरून साधारण 15 फूट खाली कोसळली आणि पलटली. या बसमध्ये 35 प्रवासी होते. यात एकूण 8 प्रवासी जखमी झाले आहेत. या सगळ्या जखमी प्रवाशांना कोथरुडमधील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. 

Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा, गारपिटीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा, गारपिटीने शेतकऱ्यांची चिंता वाढली


सोलापूर जिल्ह्यातील 104 गावांना अवकाळी पावसाचा फटका


सुमारे 3469 हेक्टर वर शेती पिकाचे नुकसान, अनेक शेतात उभे पिक झाले भुई सपाट


सोलापूर जिल्ह्यातील 33 टक्के शेती क्षेत्र बाधित


जिल्ह्यातील 4500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखोंचे नुकसान


सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष, आंबा, पपई, ज्वारी, गहू, हरभरा पिकाचे नुकसान 


सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांची माहिती


जिल्हा कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात

Dilip Walse-Patil : पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यांसाठी प्रयत्न करू - दिलीप वळसे-पाटील

Dilip Walse-Patil on Unseasonal Rain : अवकाळी पावसामूळे नुकसान झालं आहे खर आहे, सरकार बाजूने पंचनामे होत नाहीत, असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यांसाठी प्रयत्न करू, विधानसभेत आवाज उठवू, सर्व सरकारी यंत्रणा ठप्प आहे, शेतकरी नुकसानभरपाई मिळावी. राज्याच्या कृषिमंत्र्यांना अजिबात कशाचा गांभीर्य नाही. केंद्र राज्य सरकारने योजना आणल्या आहेत, मात्र त्याच्या योजना शेवटच्या माणसापर्यत जात नाही, सरकार फक्त राजकारण व्यस्त आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Pune MPSC Student : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट 

Pune MPSC Student : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्ट मंडळाने घेतली राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट 


पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट


राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न २०२५ पासून आयोगाने लागू केल्यानंतर शरद पवार यांचे मानले आभार


एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात देखील झाली चर्चा


३० मार्च रोजी शरद पवार करणार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Palghar News : बंद कंपन्यांमधील हजारो किलो लोखंडी भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पालघरमध्ये सुळसुळाट; पोलिसांकडून तपास सुरु

Palghar News : बंद कंपन्यांमधील हजारो किलो लोखंडी भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पालघरमध्ये सध्या सुळसुळाट पाहायला मिळतोय. वाडा तालुक्यातील कुडूस येथील एका बंद कंपनीतून भंगार चोरी करत असताना स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी हजारो किलो भंगारासह दोन ट्रक आणि एक हायड्रा ताब्यात घेतले आहे. या ट्रकमध्ये बँकेच्या कर्जाची परतफेड न करू शकणाऱ्या सील कंपन्यांमधील चोरलेले हजारो किलो लोखंडी भंगारदेखील जप्त करण्यात आले असून वाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान अशा चोरीच्या घटना पालघर जिल्ह्यात वारंवार समोर येत असून पोलिसांकडून योग्य कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

Hingoli Orange : संत्र्याच्या बागांचे मोठे नुकसान, गारपिटीने बागांना झोडपले; शेतकरी हैराण 

हिंगोली जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील हिंगोली वसमत औंढा नागनाथ सेनगाव कळमनुरी अशा जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे यामुळे शेतातील गहू ज्वारी हरभरा टरबूज खरबूज या पिकांसह फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील संत्र्याच्या बागांना गारपिटीने झोडपले आहे. त्यामुळे झाडाला असलेली सर्व संत्रे तुटून पडले आहेत. बागेमध्ये सर्व संत्र्याचा सडा पडल्याचे चित्र दिसून येते. घोटा देवी येथील शेतकरी गोविंद टेकाळे यांच्या शेतातील एक एकर संत्र्याच्या बागेला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी टेकाळे यांना या बागेतून 80 हजार रुपये मिळणार होते परंतु विक्रीपूर्वीच अशा पद्धतीने पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाचे आलेला घास हिरावला गेलाय.

Sindhudurg News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते क्रीडा संकुलाचा शुभारंभ

सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतच्या वतीने बांधण्यात आलेल्या अद्ययावत क्रीडा संकुलाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे व त्यांचे मोठे बंधू माजी खासदार निलेश राणे यांनी बॅडमिंटनचा आनंद लुटला. नेहमी राजकीय टोलेबाजी करताना चर्चेत असलेल्या नारायण राणेंच्या दोन्ही सुपुत्रांनी बॅडमिंटन मध्ये देखील जोरदार टोलेबाजी यावेळी पहायला मिळाली.

NDBR MSEB Karmchari Song : थकित वीज बिल वसुलीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नामी शक्कल...
मार्च महिना म्हटला की आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यात सर्व शासकीय कर आणि इतर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांवर ताण असतो विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण भागात विज बिल वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केले आहे घरगुती वीज बिल बाकी असलेल्या ग्राहकांकडून वसुली मोहीम व अंतर्गत विज बिल वसूल केले जात आहे किंवा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे मात्र या पलीकडे जात शहादा तालुक्याच्या ग्रामीण भागात थकबाकीदार असलेल्या ग्राहकांना विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी स्थानिक बोली भाषेत गाणं गात ग्राहकांना विज बिल भरण्याचा आग्रह करत आहेत तर विद्युत पुरवठा खंडित झाला तर कोणत्या समस्या येतात हे ते अहिराणी बोली भाषेतील गाण्यातून सांगत असून वीज बिल वसुलीचा या कर्मचाऱ्यांचा फंडा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.
Nashik Rain Effect : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, 60 वर्षीय शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू


 
















Nashik Rain Effect : गेल्या दोन दिवसांपासून नाशिकला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे, अनेक तालुक्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट देखिल झाली असून शनिवारी पावसामुळे जीवितहानी देखील झाल्याचं समोर आलं आहे. सिन्नर तालुक्यात सायंकाळी जनावरांसाठी शेतात चारा आणायला गेलेल्या बाळू गीते या 60 वर्षीय शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला असून यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे तर त्र्यंबकेश्वरला अंगावर वीज पडून एक महिला जखमी देखिल झाली आहे. सुलतानी सोबतच अस्मानी संकटाचा सध्या बळीराजाला सामना करावा लागत असून गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सायंकाळचे नितीन गडकरींसोबतचे आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत निफाड तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचल्या होत्या. कुंभारी गावात गारपीटीमुळे झालेल्या द्राक्षबागांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांची चर्चा करत कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या त्यांनी सूचना केल्यात.













Gondia Loghtning : वीज पडून चिमुकलीसह 2 जण जखमी,देवरी तालुक्यातील मासूलकसा येथील घटना 
Gondia Loghtning : देवरी तालुक्यातील मासुलकसा येथे वीज पडल्याने चिमुकलीसह दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले. ईशा नंदलाल कोकाटे (12) आणि हंसराज गोविंद कोकाटे (24) अशी जखमींची नावे आहेत.  देवरी तालुक्यात सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम आहे. मासुलकसा येथील 12 वर्षांची ईशा नंदलाल कोकाटे ही मुलगी मोहफूल वेचण्याकरता शेतात गेली होती. मोहफूल वेचत असताना तिच्यावर वीज पडली. हे बघताच बाजूलाच मेहफुले वेचत असलेला हंसराज कोकाटे याने धाव ईशाकडे धाव घेतली. ईशाला उचलून नेत असतानाच ज्या झाडाखाली ईशा मोहफूल वेचत होती. त्या झाडाची फांदी हंसराजवर पडली. यात तो देखील जखमी झाला. जखमींना तातडीने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.
Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चोरट्यांचा डल्ला, सुमारे पाच लाख किमतीचे दागिने चोरीला

Mira Road Bageshwar Dham Sarkar : मुंबईजवळील मीरा रोड येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबारावेळी चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला. या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमात सहभागी महिलांचे सुमारे 4 लाख 87 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. शनिवारी (18 मार्च) मीरा रोड परिसरात बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबार सजला होता. बागेश्वर सरकारचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे लाखो अनुयायी या कार्यक्रमाला पोहोचले होते. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम सुरू झालेला आणि रात्री 9.30 वाजता कार्यक्रम संपला. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Nandurbar Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

नंदुरबार तालुक्यात होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार मधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही बसला आहे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली लाल मिरची वाळवण्यासाठी मिरची पथरींवर टाकली जात असते चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामध्ये पंधरा हजार क्विंटल पेक्षा अधिक मिरची खराब होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांच्या नुकसानीचेही पंचनामे करून त्यांनाही भरपाई द्यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा मिरची व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Dombivali Gudipadva Shobha Yatra : डोंबिवली स्वागत यात्रेत यंदा प्रथमच कल्चरल स्ट्रीटचे आयोजन 

गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणारी नववर्ष स्वागत यात्रा म्हणजे डोंबिवलीकरांसाठी एक पर्वणीच असते. त्यातच यंदा स्वागत यात्रेचे 25 वं वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यंदाची स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात निघणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून गणेश मंदिर संस्थानतर्फे सामाजिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदा कल्चरल स्ट्रीट अर्थातच सांस्कृतिक पथ या कार्यक्रमाचा देखील आयोजन  करण्यात आलंय. देशातील संस्कृती, पारंपारिकता आणि नाविन्यता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गणेश मंदिर संस्थान तर्फे राबविण्यात आला. पर्यावरण दिंडीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. तरुण तरुणांनी आज या दिंडीमध्ये पारंपारिक वेशभूशा करत सहभाग घेतला होता.

Buldhana Sanjay Gaikwad : काही माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी, संजय गायकवाड यांचा घुमजाव

बुलढाणा :  आमदार संजय गायकवाड यांनी शनिवारी दुपारी संपकरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. यात त्यांनी 95 टक्के शासकीय कर्मचारी हे भ्रष्टाचारी असल्याच म्हटल होतं. पण आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत घुमजाव केलाय. मात्र स्पष्टीकरण देत असताना त्यांनी अजून एक मोठा गौपस्पोट केला आहे. यावेळी ते म्हणाले की, "काही माध्यमांनी माझ्या विधानाचा विपर्यास करून दाखवलं. पण मी हे बोललो होतो की 75 टक्के कर्मचारी हे भ्रष्टाचारी आहेत. ते आहेतच पण ज्यांचा भ्रष्टाचाराशी काहीही संबंध नाही. मी माझ्या वक्तव्यात अस बोललो की, ''कधी कधी शेतकरी विषाचा डबा सोबत घेऊन कार्यालयात येतो तरी अधिकाऱ्यांचा माज उतरत नाही. माझ्या जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने संजय गांधी निराधार योजनेतील फाईल मंजूर करण्यासाठी 400 फाईल्सचे प्रती फाईल 2000 रू. मागितले. हे इतके हरामखोर झालेत...!  याचा अर्थ हे सर्वच कर्मचाऱ्यांना लागू होत असा नाही...! मी फक्त माझ्या जिल्ह्यातील दोन लोकांबद्दल बोललो होतो. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत.  2032 पर्यंत शासनाची परिस्थिती सुधारेल मग पेन्शनबद्दल विचार करता येईल.

Khed Ratnagiri CM Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेची जोरदार तयारी


 
















Khed Ratnagiri CM Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेची जोरदार तयारी झालेली आहे. शहरातल्या रस्त्यांवरती बॅनर्स आणि झेंडे झडकलेले आहेत. करारा जवाब मिलेगा  या आशियाखाली रामदास कदम यांचा सभास्थळी असलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे रामदास कदम नेमकं काय बोलणार? अगदी काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेला रामदास कदम नेमकं काय प्रत्युत्तर देणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे.














Parbhani Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यात ओढ्याला आला पूर 
Parbhani Unseasonal Rain : मागच्या तीन दिवसांपासुन परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. कुठे गारपीट होतेय, कुठे वादळी वारे अन जोरदार पाऊस, परभणीच्या जिंतुरमध्ये तर जोरदार अवकाळी पावसाने चक्क उन्हाळ्यात ओढ्याला पूर आला आहे. जिंतुर तालुक्यातील आडगाव बाजारवरून चितरनेर वाडी येथे जाणाऱ्या ओढ्याला  पूर आला असून चार ते पाच फूट पाणी वाहत आहे. पूर आला असल्यामुळे चितरनेरवाडी येथील बाजारावरून जाणाऱ्या गावकऱ्यांचा संपर्क काही काळ तुटला होता. केवळ ओढ्याला पूरच आला नाही या परिसरात ज्वारी आणि गव्हाचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..
Bhandara Leopard Death in Accident : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, भंडाऱ्याच्या साकोलीतील येथील दुर्घटना

भंडारा : शिकारीच्या शोधात जंगलातून निघून राष्ट्रीय महामार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या बिबट्याला महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनानं जबर धडक दिली. या भीषण अपघातात बिबट्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास भंडाऱ्यातील साकोली शहराजवळील उड्डाणपुलालगत बोदरा गावाजवळ घडली. मृतक बिबट ही मादी प्रजातीची असून दोन वर्षाची असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

CM Eknath Shinde : खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज जाहीर सभा

CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेडमध्ये (Khed) जाहीर सभा होणार आहे. आज सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खेडमध्ये केलेल्या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


 

Kisan Putra Andolan : किसानपुत्रांच्या वतीनं आज महाराष्ट्रभर उपवास, शेतकरी सहवेदनेसाठी उपोषण

Kisan Putra Andolan : दरवर्षी 19 मार्चला किसानपूत्र आंदोलनाच्या (Kisan Putra Andolan) वतीनं महाराष्ट्रभर (Maharashtra) उपवास केला जातो. शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी हा दिवस केला जातो. 19 मार्च 1986 रोजी शेतकरी साहेबराव करपे कुटुंबीयांनी आत्महत्या केली होती. करपे कुटंब हे चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथील होते. त्यामुळेच या गावात आज (19 मार्च) सुतक पाळले जाणार असून सामूहिक उपोषण देखील केले जाणार असल्याची माहिती अमर हबीब (Amar habib) यांनी दिली.  


वाचा सविस्तर बातमी...

Mega Block: आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक पाहा!

Mumbai Local Mega Block Updates: मुंबईकरांनो, उद्या रविवार (19 मार्च) आठवडी सुट्टीचा दिवस. उद्या जर तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रवासाचं नियोजन तुम्हाला आजच करावं लागेल. उद्या मुंबई लोकलवर मेगाब्लॉक (Mumbai Local News) आहे. मुंबई लोकलच्या मध्य (Central Railway Megablock) मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर मार्गावर (Harbor Railway) मात्र मेगाब्लॉक नसणार आहे. हार्बर मार्गावरील सेवा सुरळीत राहणार आहे. यासंदर्भातील माहिती मध्यरेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करत देण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस


जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे.  याबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला उत्तसरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवसर देण्यासाठी त्याच गोळीबार मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. 


सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सहावा दिवस 
 
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. या संपामुळं सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. परंतु, मागण्या मान्य न झाल्याने कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. 


रत्नागिरीतील खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला उत्तर देण्यासाठी त्याच गोळीबार मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे.  संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला संबोधित करणार आहेत.  


किसान पूत्रांचा उपवास 
 
देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्येची घटना 19 मार्च 1984 रोजी घडली होती. या दिवशी चिलगव्हान ( ता. उमरखेड जि. यवतमाळ ) येथील साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आपली जीवनयात्रा संपवली होती. या घटनेवला 39 वर्ष झाली आहेत. तरी अद्याप देखील शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. उलट यवतमाळ जिल्हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांना आपण साहेबराव करपे यांच्या स्मृती दिनानिमित्त एक दिवस  अन्नत्याग आंदोलन करून थोडा धीर देऊ शकतो का? या एकत्रीकरणाच्या निमित्याने शेतकऱ्यांच्या  प्रश्नावर काही मांडणी, चर्चा होईल. शासन प्रशासनाला थोडी जाग येईल. यासाठी किसानपूत्र आंदोलनतर्फे आज राज्यभर उपवास करून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर 




 



राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर आहेत. रूईछत्तीसी येथे दुपारी 1 वाजता त्यांचा नागरी सत्कार होणार आहे. बहुप्रतिक्षित साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता देऊन सर्वेक्षणास दोन कोटी रूपयाचा निधी देखील मंजूर केल्याबद्दल हा भव्य नागरी सत्कार होणार आहे. 
 
बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा 


बीड जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आहे. या मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत.  


सांगलीत महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन


 सांगलीत आज कृष्णनदी काठी दुपारी तीनच्या पुढे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत विरुद्ध इराण  मधील पैलवानांच्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे. महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री  सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 


 विशाखापट्टणम येथे भारत-ऑ


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.