Maharashtra LIVE Updates : मुंबईतील सी-लिंक आणि कोस्टल रोडला आज गर्डरनं जोडण्याचं काम पहाटेपासून सुरू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Apr 2024 12:38 PM
माजी आमदार नारायण पाटलांच्या हाती तुतारी, शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

 करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचा शरद पवार यांच्या पक्षात केला प्रवेश केला आहे. 

परभणी लोकसभेसाठी आज मतदान, राजेश टोपे यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

परभणी लोकसभेसाठी आज मतदान  होत असून , राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री राजेश टोपे आणि त्यांच्या पत्नी मनीषा टोपे  यांनी देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या पाथरवाला या त्यांच्या मूळ गावच्या मतदान केंद्रावरती त्यांनी मतदान केलं, राजेश टोपे यांचे विधानसभा क्षेत्र परभणी लोकसभेमध्ये येत असल्याने राजेश टोपे यांनी आज सकाळीच मतदान केले केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान  केलं.

शरद पवार यांच्या करमाळा येथील जाहीर सभेला सुरुवात

शरद पवार यांच्या करमाळा येथील जाहीर सभेला सुरुवात झाली आहे. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, धौर्यशील मोहिते पाटील, रोहित पवार उपस्थित आहेत. 

कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची 28 एप्रिल आणि 1 मे ला सभा, शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची 28 एप्रिल आणि 1 मे ला सभा


28 एप्रिलला आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांची सभा तर 


1 मे ला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित कोल्हापूरमध्ये सभा 


कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून छत्रपती शाहू महाराज रिंगणात तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून खासदार संजय मंडलिक रणांगणात

शरद पवारांना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढाच्या रिंगणात

शरद पवारांना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढाच्या रिंगणात


माढात रविवारी एकाच दिवशी फडणवीसांच्या तीन सभा


माढा, सांगोला, अकलूज येथे घेणार फडणवीस जाहीर सभा


पंतप्रधान नरेंद्र मोदीही ३० एप्रिलला माढ्यात घेणार सभा

सलमान खान गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची NIA च्या अधिकार्यांकडूनही चौकशी

सलमान खान गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची NIA च्या अधिकार्यांकडूनही चौकशी


आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांची एनआयएच्या अधिकाऱ्यांनी  काही तास चौकशी केली.


काही दिवसांपूर्वीच दिल्ली गुन्हे शाखेने या आरोपींची काही तास चौकशी केली होती


इतर राज्यात लाॅरेन्स बिष्णोईशी संबधित असलेले गुन्हे लक्षात घेता त्या त्या राज्यातील पोलिसांनाही या आरोपींची चौकशी करायची आहे



इतर राज्यातील पोलिसांनाही अटक आरोपींची चौकशी करायची असून ते मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत.

पालघर जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस

पालघर जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जव्हार मोखाडासह पालघर मध्येही पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. त्यामुळे बागायतदार आणि उत्पत्ती धारक व्यवसायिक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे दिलासा.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना, मुलबाळ होत नसल्यामुळे महिलेचा छळ

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून,मूलबाळ होत नसल्यामुळे महिलेचा छळ करण्यात आला आहे. तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा आहे. त्यामुळे मुलबाळ होत नसून, तो आत्माबाहेर काढण्याचा बहाणा करून एका विवाहितेला काठीने मारहाण करीत, अंगावर खिळे मारून तिचा अमानुष छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील सी-लिंक आणि कोस्टल रोडला आज गर्डरनं जोडण्याचं काम पहाटेपासून सुरू

मुंबईतील सी-लिंक आणि कोस्टल रोडला आज गर्डरनं जोडण्याचं काम पहाटेपासून सुरू झालं आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.