Maharashtra News Updates 3rd April 2023: मुंबई उच्च न्यायालयातील एक लिफ्ट अचानक बंद, लिफ्टमधील सातजणांची अग्निशमन दलाकडून सुटका
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
'जवाब दो मोदीजी' म्हणत काँग्रेस लिहीणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
प्रदेश युवक काँग्रेस लिहीणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
राज्यभरातून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोदींना लिहीणार १ लाख पत्र
पुण्यातून होत आहे या मोहिमेची प्राथमिक सुरूवात
देशातील विविध प्रश्नांवर युवक काँग्रेस लिहीत आहे मोदींना पत्र
राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास साधणार संवाद
Thane News : ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाण्यातील रिक्षा चालक झाले आक्रमक
ठाण्यातील कामगार नाका या ठिकाणी शिवसेना पक्ष, रिक्षा चालक-मालक आणि संघटनेच्या वतीने अरविंद सावंत यांचा पुतळा जाळत निषेध करण्यात आला
अरविंद सावंत जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत असाच रोष रिक्षावाल्यांचा राहणार असल्याचे आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयातील एक लिफ्ट अचानक बंद
तिस-या मजल्यावर अडकलेल्या लिफ्टमध्ये होते 7 प्रवासी
यात 6 पुरुष आणी एका महिलेचा समावेश
तातडीनं दाखल मुंबई अग्निशमन विभागानं राबविलं रेस्क्यू ऑपरेशन
लिफ्टमधील सर्व लोकं सुखरूप बाहेर, कोणालाही त्रास कींवा इजा नाही
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे. राहुल गांधी आज गुजरातच्या सूरत कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर
आतापर्यंत 33 साक्षीदार फितूर झाले आहेत
आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात साक्षीदाराने सांगितले की, एटीएसला दिलेल्या जबाबातील गोष्टी आठवत नाहीत
Beed News: तीस वर्षावरील पोलिसांची दरवर्षी बीएमआय तपासणी केली जाते. यावर्षीही याबाबत पोलिसांची तपासणी सुरू असून यामध्ये अनफिट असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा तंदुरुस्ती भत्ता बंद करण्यात येणार आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील 1 हजार 17 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 233 कर्मचारी अनफिट आढळून आले आहेत. तर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली तपासणी अद्यापही केली नाही आणि या तपासणीमध्ये अन फिट असलेल्या कर्मचाऱ्यांचा तंदुरुस्ती भत्ता बंद करण्यात येणार असल्याचं पोलीस कल्याण विभागाकडून सांगण्यात आल आहे.
Beed News: तीस वर्षावरील पोलिसांची दरवर्षी बीएमआय तपासणी केली जाते. यावर्षीही याबाबत पोलिसांची तपासणी सुरू असून यामध्ये अनफिट असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा तंदुरुस्ती भत्ता बंद करण्यात येणार आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील 1 हजार 17 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 233 कर्मचारी अनफिट आढळून आले आहेत. तर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली तपासणी अद्यापही केली नाही आणि या तपासणीमध्ये अन फिट असलेल्या कर्मचाऱ्यांचा तंदुरुस्ती भत्ता बंद करण्यात येणार असल्याचं पोलीस कल्याण विभागाकडून सांगण्यात आल आहे.
घाटकोपर येथून बांग्लादेशी नागरिक ताब्यात
बेकायदेशीर भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
घाटकोपर येथून एका संशयीत बांग्लादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. तो गेल्या सात वर्षांपासून नवी मुंबईतील घनसोली येथे बेकायदेशिररित्या राहत होता.
चौकशी केली असता त्याचे नाव आलामीन ऊर्फ आलम मुजबीर शेख 40, असल्याचं सांगितलं.
त्यांच्या अंगझडतीत मोबाईल संचासह त्याने घनसोली येथे मोहम्मद शेख नावाने जन्माचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्याची पावती पोलिसांना सापडली.
अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai News: बुकी अनिल जयसिंघानीला हायकोर्टानं दिलासा नाकारला
अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत दाखल केलेली याचिका फेटाळली
Sushma Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. सुषमा अंधारे यांच्या वतीने तीन रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहेत.
Maharashtra News: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज संजय शिरसाठ यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
सकाळी साडेअकरा वाजता पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार
सुषमा अंधारे यांच्या वतीने तीन रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या टँकरने विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना घडली. दीक्षा काळे असं या अपघातात मृत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती MGM मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. ही विद्यार्थिनी वडिलांसोबत दुचाकीवरुन कॉलेजला जात असताना बाबा पेट्रोल पंपजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडक लागताच दीक्षा खाली पडली आणि त्या पाण्याच्या टँकरखाली चिरडली. टँकरचा चाक दीक्षाच्या तोंडावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दीक्षाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला.
Maha Vikas Aghadi Rally : 16 एप्रिलला महाविकास आघाडीची दुसरी संयुक्त सभा नागपूर येथे होणार आहे. या सभेचे समन्वयक म्हणून माजी मंत्री सुनील केदार यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आज या सभेच्या नियोजनासंदर्भात पहिली बैठक नागपूरच्या केडीके महाविद्यालयात आज सायंकाळी 5 वाजता होत आहे. या बैठकीला काँग्रेसकडून सुनील केदार, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक, राष्ट्रवादीकडून शहर धुनेश्वर पेठे, बाबा गुजर तर ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख राजू हरणे उपस्थित राहणार आहेत. यात सभा स्थळ, सभेला येणाऱ्यांची व्यवस्था आणि इतर विषयावर चर्चा होणार आहे.
Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरला बांधून एका जेसीबी ऑपरेटरला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव येथील असून अमानुष मारहाण करण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव राहुल जगदाळे (वय 25 वर्षे) आहे. तो बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. बेलगाव येथे पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडे पीडित कामाला आहे. परवा दुपारी गावातील एका महिलेची छेडछाड केल्याचा आरोप करत अवसरे परिवारातील काही सदस्यांनी त्याला अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र पीडित आणि छेडछाडीचा आरोप करणारी महिला या दोघांनीही पोलिसात तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांच्या पुढे पेचप्रसंग उद्भवला आहे.
Buldhana News : नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुरणक्य वेदोक्त प्रकरणानंतर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर चांगलेच संतापले असून त्यांनी राज्यातील सर्व मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवण्याची मागणी केली आहे. शिवाय राज्यातील आणि देशातील मंदिरातील पैसा गरिबांसाठी तसंच त्यांच्या मुला-मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. देशातील सर्व मंदिरे भट मुक्त करा, मंदिरातील पुजारी हटवा अशी मागणी करत आगामी काही दिवसात मराठा सेवा संघाकडून मोठ आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
Jalna Crime : जालना शहरात कुरिअरद्वारे मागवण्यात आलेल्या सहा तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील अंबड चौफुली भागात एका कुरियर कंपनीच्या गोदामातून पोलिसांनी ही शस्त्र जप्त केली आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काल छापा टाकून या तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी तलवारी ऑर्डर करणाऱ्या दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. या तलवारी कशासाठी मागवण्यात आल्या होत्या याचा पोलीस शोध घेत आहेत.
Satara News: साताऱ्यातील फलटणमधून मोठी बातमी आहे.. नीरा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. फलटणच्या होळ गावा पासून ते आसू गावापर्यंत पाणी दूषित झालंय. त्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. काही लोकांनी तर टेम्पो भरभरून हे मासे विकण्य़ासाठी नेले. स्थानिक रहिवासी मात्र या प्रदूषणामुळे संतप्त झालेत. कारखान्यातील दुषीत पाणी नदीपात्रात सोडल्यामुळेच असे प्रकार घडतात अशी त्यांची तक्रार आहे. नीरा नदीपात्र परिसरात चार साखर कारखाने आहेत.
Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : संभाजीनगरमध्ये रविवारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. मात्र विरोधकांची वज्रमूठ काँग्रेसमुळेच कमकुवत ठरते की काय असा प्रश्न पडतोय. कारण कालच्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. त्यांच्या ऐवजी माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाषण केलं. पटोले यांनी जरी तब्येतीचं कारण सांगितलं असलं, तरी काँग्रेस नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात. सर्वात महत्त्वाचं कारण सावरकरांच्या मुद्द्यावरून मविआत झालेला वाद, हे सांगण्यात येतंय. या मुद्द्यावरून राहुल गांधींना माघार घ्यावी लागली, सेनेनं आपली नाराजी इतक्या जाहीरपणे व्यक्त करायला नको होती, असा एक सूर काँग्रेसमध्ये उमटतोय. लोकसभा निवडणुकीला बरोबर एक वर्ष उरलं असताना जर इतकी नाराजी असेल, तर ते मविआला परवडणारं नाही, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायेत.
Mahabaleshwar: महाबळेश्वर हवामानात मोठा बदल
महाबळेश्वर वेण्णालेक पारा घसरला
वेण्णालेक 6 अंशावर तर महाबळेश्वर 9 अंशावर
अचानक घसरलेल्या तापमानामुळे पर्याटकांसह स्थानिकही गारठले
Beed Crime: एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्यानंतर समाजातील दानशूर लोकांनी या कुटुंबाला 70 हजार रुपयांची मदत केली होती मात्र सायबर भामट्यांनी ऑनलाईन फ्रॉड करून ही 70 हजार रुपयांची रक्कम लुटल्याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या केज तालुक्यातील पैठण गावच्या जयराम चौधरी यांच्या कुटुंबातील तीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर समाजातील काही लोकांनी त्यांना आर्थिक मदत केली मात्र सायबर भामट्यांनी ऑनलाईन फॉड करून त्यांच्या खात्यावरची 70 हजार रुपयांची रक्कम लांबवली असून त्याचा तपास सायबर पोलीस करत आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात आज काँग्रेस नेते राहुल गांधी वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत. तर ज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहे. आज संसदेच्या शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस असणार आहे. यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,
सुरत न्यायालयाच्या निकालाविरोधात राहुल गांधी याचिका दाखल करणार
सुरत कोर्टाने राहुल गांधीच्या 2019 च्या वक्तव्यासंदर्भात दिलेल्या निकाला विरोधात राहुल गांधी आज याचिका दाखल करणार आहेत. सुरत न्यायालयाने 23 मार्चला राहुल गांधींना दोषी ठरवलं होतं. आज याचिका करताना राहुल गांधी उपस्थित रहाणार असल्याची माहिती आहे. राहुल गांधींना आयपीसी कलम 499 (मानहानी) आणि कलम 500 (एखाद्या व्यक्तीची मानहानी फौसदारी खटला) नुसार दोषी ठरवलं होतं. त्याच दिवशी राहुल गांधींना जामीन मिळाला होता आणि शिक्षेच्या अमलबजावणीसाठी 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णया विरोधात वरच्या कोर्टात जाता यावं यासाठी हा वेळ दिला जातो.
तहसिलदार आणि नायब तहसिलदार आजपासून संपावर
आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहे. राजपत्रित वर्ग – 2 नायब तहसिलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मूळे पदाच्या अस्तित्वाच्या न्याय मागणीसाठी रुपये 4300 वरुन 4800 रुपये करण्याच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.
संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा
संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होतोय. राहुल गांधी आणि आदानी मुद्यावरून संसदेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाज होऊ शकले नाही. 13 मार्चापासून सुरू झालेला हा टप्प्याचं कामकाज 6 मार्च पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनातून जनतेला काय मिळालं? (सकाळी 9.30 वाजता प्रशांत कदम लाईव्ह)
कोर्टातल्या महत्वाच्या सुनावणी
मंत्रालयातील प्रशासकीय अधिकार्यांवर हल्ला केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना मुंबई विशेष सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील आजच्या सुनावणीत बच्चू यांच्यावर आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पडण्याची शक्याता आहे.
अभिनेता नवाझउद्दीन सिद्दिकी कौटुंबिक कलह प्रकरणी हायकोर्टात विशेष सुनावणी. नवाझउद्दीन सिद्दीकी आणि कुटुंबियांना आज हायकोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश. नवाझ त्याची पत्नी झैनब, दोन्ही मुलं आणि भाऊ शमशुद्दीनला कोर्टात हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या न्यायदालनात दुपारा 4:30 वाजता सुनावणी.
पंतप्रधान मोदी आज CBI च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12 वाजता विज्ञान भवनात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि CBI च्या सर्वोत्कृष्ट तपास अधिकाऱ्यांसाठी सुवर्णपदक प्राप्तकर्त्यांसाठी एक अन्वेषण समारंभ आयोजित केला जाईल. या समारंभात पंतप्रधान पुरस्कार विजेत्यांना पदके प्रदान करतील. शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे सीबीआयच्या नव्याने बांधलेल्या कार्यालयीन संकुलाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. सीबीआयच्या हीरक महोत्सवी वर्षात ते टपाल तिकीट आणि स्मरणार्थी नाणे जारी करतील. ते सीबीआयचे ट्विटर हँडलही लॉन्च करणार आहेत. CBI ची स्थापना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या 1 एप्रिल 1963 च्या ठरावाद्वारे करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -