एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 31th March 2023 : अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाने एकाचा मृत्यू तर 6 जणांना कोरोनाची लागण

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 31th March 2023 :  अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाने एकाचा मृत्यू तर 6 जणांना कोरोनाची लागण

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजपासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. त्याचसोबत आज अनिल जयसिंघानी, जावेद अख्तर, चंदा कोचर, श्रद्धा वालकर यांच्यासंबंधित याचिकांवर सुनावणी होणार आहे. याचसोबत आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे...

अनिल जयसिंघानी यांच्या अटकेच्या याचिकेवर सुनावणी

अमृता फडणवीस प्रकरणात अटक आरोपी अनिल जयसिंघानीनं अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. आपल्या विरोधात दाखल FIR दाखल करण्यापासून अटक करेपर्यंत पोलिसांनी कायदेशीर बाबींच उल्लंघन केल्याचा दावा अजय जयसिंघानी यांनी या अर्जात केला आहे. 

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर सुनावणी 

आरएसएसची तुलना तालीबानशी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावरील वादावर मुलुंड कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जावेद अख्तर यांना याप्रकरणी दिलासा द्यायला नकार दिल्यानं, आज जावेद अख्तर कोर्टात हजर होतात का हे पाहणं महत्वाचं आहे. 

आयपीएलचा हंगाम सुरू 

आजपासून आयपीएलच्या नव्या सीजनला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.  भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

कलिना लायब्ररी लाच प्रकरणी याचिकेवर सुनावणी

पीएमएलए कोर्टात कलिना लायब्ररी कामात लाच घेतल्याचा आरोपांच प्रकरण न्यायालयात असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांवर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. नाशिक फेस्टिवलसाठी  ही लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भुजबळांसह इतरांनी ही केस डिस्चार्ज करण्यासाठी एक याचिका दाखल केली आह.

चंदा कोचर यांच्या विरोधातील सीबीआयच्या रिमांड अॅप्लिकेशनवर सुनावणी 

सीबीआय कोर्टात चंदा कोचर विरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या रिमांड अप्लिकेशनवर आज सुनावणी होणार आहे. कोर्टानं जर सीबीआयची विनंती मान्य केली तर चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी

श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने आफताबला ताकिद दिली होती कि पुन्हा वकिल बदलला तर बाजू मांडायला वेळ दिला जाणार नाही.

22:30 PM (IST)  •  31 Mar 2023

Maharashtra News: संभाजीनगर दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Maharashtra News: रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी फोनवर चर्चा केली. या संदर्भात दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.

21:04 PM (IST)  •  31 Mar 2023

Wardha News: वर्धा येथील सावंगी टी-पॉईंट येथे ट्रकचा अपघात; दोन जण जखमी, दोन दुकानाचे नुकसान

Wardha News: वर्धा येथील सावंगी टी पॉईंट येथील ट्रकचा अपघात झाला असून या अपघातात दोन दुकानाचे नुकसान झाले आहे. दोन जण जखमी झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे. ट्रकचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात असून ट्रक चालक आणि हात गाडीवाला जखमी झाला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

21:00 PM (IST)  •  31 Mar 2023

Nashik News: नाशिक: स्वराज्य संघटना उद्या काळाराम मंदिरासमोर आंदोलन करणार; संयोगिता राजे छत्रपती यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन

Nashik News:  संयोगिता राजे छत्रपती यांना काळाराम मंदिराच्या पुजाऱ्याकडून आलेल्या अवमाना प्रकरणाच्या निषेधार्थ स्वराज्य संघटनेच्यावतीने शनिवारी,  काळाराम मंदिरासमोर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. 

20:46 PM (IST)  •  31 Mar 2023

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhaji Nagar News:  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

पैठण तालुक्यातील जांभळीवाडी येथे अवकाळी पावसाच्या तडाखा

वादळी वाऱ्यामुळे 20 ते 25 घरांवरील पत्रे उडाले

6 घरातील संसार उपयोगी वस्तुंची मोठ्या प्रमाणात नुकसान

19:29 PM (IST)  •  31 Mar 2023

नवी मुंबईत अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्या कारवाई; पोलिसांकडून 10 डंपर जप्त

Navi Mumbai : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील किल्ले गावठाण ते उरण आणि परिसरातील  निर्जन स्थळी बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत पणे डेब्रिज टाकून शहर विद्रूप करणाऱ्यांवर महानगरपालिका आणि सिडको कारवाई करीत नसल्याने सामाजिक संघटनाकडून नाराजी व्यक्त होत होती. अखेर एनआरआय पोलिसांनी कारवाई केली असून 10 डंपर ताब्यात घेण्यात आले आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget