Maharashtra News Updates 30th March 2023 : मुंबईतील मालवणी भागात राम नवमी शोभायात्रा दरम्यान दोन गटात घोषणाबाजी; तणाव वाढल्याने पोलिसांचा लाठीचार्ज
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज देशभरात राम नवमीचा उत्साह असून त्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. सोबतच आज सलमान खान, अनुष्का शर्मा आणि नवाझुद्दीन सिद्दिकेच्या याचिकेवर सुनावणी आहे. तसेच किशोरी पेडणेकरांच्याही याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
आज देशभरात राम नवमीचा उत्साह
आज देशभरात राम नवमीचा उत्साह असून ही नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे.
सलमान खानच्या याचिकेवर सुनावणी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टाचा आज निर्णय. त्याने तातडीचा दिलासा मागत हायकोर्टात धाव घेतली आहे. एका पादचाऱ्यावर हल्ला करून त्याला धमकावल्या प्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर अंधेरीच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने याच प्रकरणात आज हजेरीसाठी सलमानला समन्स पाठवलं आहे. ते समन्स रद्द करण्याची सलमाननं मागणी केली आहे.
अनुष्का शर्माच्या याचिकेवर सुनावणी
अभिनेत्री अनुष्का शर्मानं विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. साल 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटिसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. या याचिकांवर उत्तर देत प्राप्तीकर विभगानं आपल्या कारवाईचं समर्थन केलं आहे, त्यावर आज सुनावणी होईल.
नवाझुद्दीन सिद्दिकीच्या याचिकेवर सुनावणी
बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीची आपला भाऊ आणि पत्नी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव. या दोघांवर दाखल केला 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा. भाऊ शमशुद्दिन सिद्दीकी आणि पत्नी झैनब सिद्दीकी यांनी नवाझबाबत दिशाभूल करणारी वक्तव्यं केल्याचा याचिकेतून आरोप. त्याच्या विरोधातील पोस्ट आणि आर्टिकल बदनामीकारक असून नवाझुद्दीनची सार्वजनिक जीवनात प्रतिमा मलिन केल्याचा याचिकेतूना दावा.
किशोरी पेडणेकर यांच्या याचिकेवर सुनावणी
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा आज संपणार. कथित एसआरए घोटाळा प्रकरणी तूर्तास आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना दिले होते निर्देश. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी किशोरी पेडणेकरांवी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यावर आज सुनावणी होईल.
Mumbai News : मुंबईतील मालवणी भागात राम नवमी शोभायात्रा दरम्यान दोन गटात घोषणाबाजी; तणाव वाढल्याने पोलिसांचा लाठीचार्ज
Mumbai News : मालवणी भागात राम नवमी शोभायात्रा दरम्यान दोन गटात घोषणाबाजी झाली. या घोषणाबाजीमुळे तणाव वाढल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.
Pune News: इंदापूर पोलिसांची गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; 18 लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक
Pune News: तब्बल 18 लाखांच्या गुटख्यासह 24 लाखांचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला आहे. अकलूज कडून पुण्याच्या दिशेने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीवर कारवाई करून बंदी असलेल्या गुटख्या सहित मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
Gondia News: गोंदियात ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार; घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकला लावली आग
Gondia News: गोंदिया शहरातील बाजपेयी चौक परिसरामध्ये एका ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकला आग लावली वेळीच घटनास्थळी अग्निशमन दल पोचल्याने ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. घटनास्थळावरून चालक फरार झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी गोंदिया शहर पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
Beed News : बारा वर्षानंतर पहिल्यांदाच जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष होणार!
Beed News : परळी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या जव्हार एज्युकेशन सोसायटीमध्ये बारा वर्षानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सहा मे रोजी निवडणूक होणार आहे. या जवाहर एज्युकेशन सोसायटीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही सभासदत्व नव्हते. मात्र आता हे सभासदत्व मिळाल्यामुळे पुन्हा धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. सध्या या महाविद्यालयावर पंकजा मुंडे गटाचे वर्चस्व आहे
Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य अभ्यासक्रमाच्या हॉल तिकीट संदर्भात स्पष्टीकरण; सध्याची ही हॉल तिकिटे ही तात्पुरती, वेळापत्रकासह हॉलतिकीट देणार
Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य अभ्यासक्रमाच्या हॉल तिकीट संदर्भात स्पष्टीकरण; सध्याची ही हॉल तिकिटे ही तात्पुरती, वेळापत्रकासह हॉलतिकीट देणार असल्याची विद्यापीठाची माहिती