Maharashtra News Live Updates : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी युवासेना पदाधिकारी साईनाथ दुर्गेसह अन्य सहाजणांना जामीन मंजूर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Mar 2023 11:40 PM
Mumbai News : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी युवासेना पदाधिकारी साईनाथ दुर्गेसह अन्य सहाजणांना जामीन मंजूर

Mumbai News: शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अटक झालेल्या युवासेनेच्या साईनाथ दुर्गे यांच्यासह अन्य सहा जणांना बोरिवली कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.

Latur News : लातूर: उमरगामध्ये ट्रॅव्हल्स पलटून अपघात; एकाचा मृत्यू 25 जखमी

Latur News :  लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील उमरगा येथे ट्रॅव्हल्स पलटून होऊन झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 25 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे..
मुखेड येथून पुण्याकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स जात होती. साईकृपा ट्रॅव्हल्स मुखेड वरून आज रात्री सात वाजल्याच्या नंतर निघाली होती. जळकोट तालुक्यातील उमरगा या गावाजवळ आल्यानंतर हा अपघात झाला. या रस्त्यावरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे. 

आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना मोठा दिलासा

आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात प्रमाणपत्र न मिळालेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर निवड प्राधिकरणांना शासनाचे आदेश


मुलाखती दरम्यान सन २०१९-२० व सन २०२०-२१ या वर्षाचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची मागणी करू नका


२०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरणार


प्रमाणपत्राअभावी मुलाखतीस मुकलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी मिळणार


शासकीय, निमशासकीय, महामंडळ, खासगी व अनुदानित महाविद्यालयांना आदेश


हजारो उमेदवारांना होणारा लाभ

Sharad Pawar: ईव्हीएम मशिनचा दुरुपयोग होतोय, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं; विरोधी पक्षांची मागणी

निवडणुकीत ईव्हीएमचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. या मशिनच्या वापराबद्दल आमच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि निवडणूक आयोगाने तो दूर करावा अशीही त्यांनी मागणी केली. देशातील विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. त्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. 


 

School Bus Fees :  1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या बसेसचे शुल्क वाढणार, 25 ते 30 टक्क्यांनी होणार दरवाढ

School Bus Fees :  1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या बसेसचे शुल्क वाढणार


25 ते 30 टक्क्यांनी शुल्कात वाढ होणार, स्कूल बस असोसिएशनचा निर्णय  


केंद्राचं नवं स्क्रॅपिंग धोरण, बस गाड्यांच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ आदी कारणांमुळे दर वाढीचा निर्णय

School Bus Fees :  1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या बसेसचे शुल्क वाढणार, 25 ते 30 टक्क्यांनी होणार दरवाढ

School Bus Fees :  1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या बसेसचे शुल्क वाढणार


25 ते 30 टक्क्यांनी शुल्कात वाढ होणार, स्कूल बस असोसिएशनचा निर्णय  


केंद्राचं नवं स्क्रॅपिंग धोरण, बस गाड्यांच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ आदी कारणांमुळे दर वाढीचा निर्णय

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यात दूध भेसळी प्रकरणी सातजण ताब्यात

अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातून कृत्रिम दुध आणि भेसळ प्रकरण समोर आलंय. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. 

Wardha News : माजी उद्योगमंत्री अशोक शिंदे यांचा काँग्रेसला रामराम

Wardha News :  वर्ध्याच्या हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आहे.  दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे आणि शिवसेनेत माजी उद्योग राज्यमंत्री राहिलेले हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे गेल्या दीड वर्षांपूर्वी शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये आले होते. काँग्रेस प्रवेशानंतर अशोक शिंदे यांना काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पद दिले जाणार अशी देखील चर्चा होती. तसे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. पण केवळ आजवर आशेवर ठेवून गटबाजी करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला खिंडार पाडण्याचा घाट घातला आहे. असा आरोप अशोक शिंदे यांनी केला आहे. गटबाजीमुळे काँग्रेसचा विकास खुंटला आहे. काँग्रेसमध्ये आपल्याला सतत डावलण्यात येत आहे त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे अशोक शिंदे यांनी म्हटले.

Sai Resort Case :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना हायकोर्टाचा दिलासा कायम, ईडीच्या प्रकरणात 28 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

Sai Resort Case :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना हायकोर्टाचा दिलासा कायम


ईडीच्या प्रकरणात 28 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश


दापोली रिसॉर्ट प्रकरणी दाखल ईसीआयआर रद्द करत अटकेपासून दिलासा मागत परबांची हायकोर्टात याचिका


नियमित कोर्ट आजही कामकाजासाठी उपलब्ध नसल्यानं सुनावणी पुढे ढकलली

NCP : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर सुरु असलेल्या ईडी कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन

NCP : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर सुरु असलेल्या ईडी कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर अडवले.  निवेदन देण्यासाठी ईडी कार्यालयात जाताना पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अडवलं...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हायकोर्टाचा दिलासा, सांगलीतील इस्लामपूर सत्र न्यायालयाचा आदेश हायकोर्टाकडून रद्द

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हायकोर्टाचा दिलासा


सांगलीतील इस्लामपूर सत्र न्यायालयाचा आदेश हायकोर्टाकडून रद्द


एका गुन्ह्यात राज ठाकरेंनी दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जावर पुन्हा नव्यानं सुनावणी घेण्याचे जिल्हा सत्र न्यायालयाला आदेश


परप्रांतीयांविरोधातील हिंसक आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंना साल 2008 मध्ये मुंबई पोलीसांनी रत्नागिरीतून अटक केल्यानंतरचं प्रकरण


या प्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी राज यांनी साल 2013 मध्ये केला होता अर्ज


न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 27 ऑक्टोबर 2021 रोजी हा अर्ज फेटाळला. त्यानंतर राज यांनी 11 जुलै 2022 रोजी पुन्हा नव्यानं केलेला अर्जही 15 ऑक्टोबर रोजी फेटाळण्यात आला 


त्याविरोधात राज यांनी इस्लामपूर सत्र न्यायालयात केलेली याचिकाही 3 फेब्रुवारी 2023 रोजी फेटाळत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं 


सांगलीमधील आंदोलनाला आपण चिथावणी दिली यात तथ्य नाही, घटनेच्या वेळी आपण अटकेत होतो त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, राज यांचा याचिकेतून दावा

Uddhav Thackeray:  मराठी भाषा भवन संदर्भात थोड्याच वेळात विधानभवनात बैठक

Uddhav Thackeray:  मराठी भाषा भवन संदर्भात थोड्याच वेळात विधानभवनात बैठक होणार आहे. मंत्री केसरकरांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत. 

Bhandara News: भंडाऱ्यात दुर्गा मंदिर पहाडीवर अस्वलाचा मुक्तसंचार

Bhandara News: भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दुर्गा मंदिर पहाडीच्या परिसरात अस्वलाचा मुक्तसंचार पहायला मिळाला. यावेळी नागरिकांनी जीवाची पर्वा न करता अस्वलाचा मुक्तसंचार कैद करण्याचा प्रयत्न करत अस्वलाला हुसकावून लावलं..

 Chandrapur News:  चंद्रपूर शहरातील दोन तरुणांची चंदीगड येथे गळफास घेऊन आत्महत्या .

 Chandrapur News:  चंद्रपूर शहरातील दोन तरुणांनी चंदीगड येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये. आत्महत्या करणाऱ्या तरुणांमध्ये माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या सख्ख्या पुतण्याचा समावेश आहे... महेश अहिर असं हंसराज अहिर यांच्या पुतण्याचं नाव आहे. आत्महत्या करणारे दोन्हीही तरुण 15 मार्च पासून बेपत्ता होते. 

Mumbai News: माहीम समुद्रातील 'त्या' मजारीवर बीएमसीचं पथक

Mumbai News:  माहीमच्या वादग्रस्त मजारीवर मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक सकाळी आठच्या सुमाराला दाखल झालं.. अनेक कामगार आणि जेसीबी देखील माहीमच्या किनाऱ्यावर आणण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षात मजारीच्या भोेवती अनधिकृत बांधकाम करण्यात आलं, केवळ हेच बांधकाम आज पाडण्यात येणार आहे.. मजार खूप जुनी आहे, आणि तिची नोंदही करण्यात आली आहे.. म्हणूनच, मजारीवर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही

Sharad Pawar: शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वाची बैठक

Sharad Pawar:  शरद पवारांच्या दिल्लीतील  निवासस्थानी आज विरोधी  पक्षनेत्यांची महत्त्वाची बैठक आहे. संध्याकाळी 6 वाजता बैठकीला  सुरुवात होणार आहे. काँग्रेसलासुद्धा या बैठकीत  आमंत्रण असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Washim  News:  शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथाच्या मूर्तीला आजपासून लेपन

Washim  News:  वाशिमच्या शिरपूर जैनमधील पार्श्वनाथ मंदिरातील मूर्तीवर आजपासून लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे... काही दिवसांपूर्वी याच लेपन प्रक्रियेवरून श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये राडा झाला होता.. त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांच्या कडक बंदोबस्तात लेपन प्रक्रिया पार पाडणार आहे... लेपन प्रक्रियेदरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार आहे... 

रेल्वे संरक्षण दलाची उत्तम कामगिरी, यात्री सुरक्षा सप्ताह अंतर्गत पहिल्या दोन महिन्यात 120 गुन्ह्यांचा उलगडा 

Mumbai News : पश्चिम रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने ऑपरेशन 'यात्री सुरक्षा' अंतर्गत रेल्वे परिसर आणि हद्दीत रेल्वे प्रवाशांचे सामान चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना चाप बसवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वर्ष 2023 च्या पहिल्या दोन महिन्यातच तब्बल 120 गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना पकडले आहे. रेल्वे हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ही कारवाई केली आहे. नुकतेच बोरिवली पोस्टच्या गुन्हे प्रतिबंध आणि शोध पथक (CPDS) पथकाने कांदिवली स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण करताना एका संशयित व्यक्तीला दिसले आणि त्याला पकडले. चौकशीत संशयित 26 वर्षीय सुरेश घनश्याम प्रजापती याने सात वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे सांगितले. बोरीवली, कांदिवली आणि दहिसर स्थानकात वेगवेगळ्या तारखांना चोरीच्या घटना घडल्या. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला जीआरपी/बोरिवलीच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपींनी 1.38 लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले होते. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 379 अन्वये चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत.

चंद्रपुरात मंदिरात झोपलेल्या दोन ग्रामस्थांचा खून, दानपेटीही गायब; चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा प्राथमिक संशय

Chandrapur News : चंद्रपुरात मंदिरात झोपलेल्या दोन ग्रामस्थांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भद्रावती तालुक्यातील मांगली गावात ही घटना घडली. मांगली गावाशेजारी जगन्नाथ बाबांचे छोटे मंदिर आहे. याच मंदिरात झोपलेल्या मधुकर खुजे (वय ५५ वर्षे) आणि बापूराव खारकर (वय ६५ वर्षे) यांचा खून झाला. या दोन्ही शेतकऱ्यांची मंदिराच्या शेजारी शेती असून जागलीसाठी ते मंदिरात झोपायचे.काल रात्री देखील मंदिरात झोपायला गेलेल्या या दोघांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आज पहाटे आढळले. मृतावर कशाने वार करण्यात आले याबाबत अजून अनिश्चितता आहे. तसंच मंदिरातील दानपेटी गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे. भद्रावती पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

माहिम समुद्रातील अवैध बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून पथकाची स्थापना

Mahim Dargah : माहिम समुद्रात अवैध दर्गा उभारण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर या वादग्रस्त जागेच्या पाहणीसाठी मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी सहा सदस्यांचं पथक तयार केलं आहे. आज सकाळी आठ वाजता माहिम पोलीस स्टेशनमध्ये या सदस्यांच्या बैठकीला सुरुवात होणार आहे.



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत दहा पैकी आठ जागांवर अभाविप आणि शिक्षण मंचाचा विजय

Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणूक अपडेट


पदवीधर मतदारसंघाच्या 10 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यापैकी राखीव प्रवर्गातील सर्व 5 जागांवर अभाविप आणि शिक्षण मंचाचा विजय झाला होता. तर खुल्या प्रवर्गातील 5 जागांपैकी अभाविप 3 जागांवर अभाविप आणि शिक्षण मंचाने बाजी मारली आहे. म्हणजेच दहा पैकी आठ जागांवर अभाविप आणि शिक्षण मंचाने विजय मिळवत महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे.. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाशी संबंधित संघटनही या निवडणुकीत उतरले होते.

पार्श्वभूमी

मुंबई: राज ठाकरे यांचे गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणाचे पडसाद आता उमटत असल्याचं दिसून येतंय. माहीम समुद्रातील दर्ग्यावर एक महिन्याच्या आत कारवाई करा अन्यथा त्याच्या बाजूला गणपती मंदिर बांधणार असा इशारा दिल्यानंतर आता मुंबई पोलिस आयुक्तांनी या दर्ग्याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासह आज घडणाऱ्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,


माहीम समुद्रातील दर्ग्यावरुन वाद


माहिमच्या खाडीत भराव टाकुन दरगा उभा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावर आता मुंबई पोलिस आयुक्तांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांना राज ठाकरेंनी माहीम खाडीतील दिलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती घ्यायला सांगितली. माहिती घेऊन पाहणी करून अहनाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक आमदार सदा सरवणकर माहीम खाडीत वॉर्ड ऑफिसर सोबत पाहणी करणार आहेत. समुद्रातील आतील भागात बांधकाम असल्याने सदर अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.


शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक 


दिल्लीतल्या 6 जनपथ या शरद पवारांच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसलासुद्धा या बैठकीत आमंत्रण असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीला कोणते नेते उपस्थित राहणार याबद्दल उत्सुकता आहे.  तृणमूल, सपाने आपण काँग्रेस, भाजपला समान अंतरावर ठेवणार असल्याचे म्हटले आहे आज होणाऱ्या या बैठकीत ईव्हीएमबद्दल, रिमोट वोटिंगबद्दल निवडणूक आयोगाने जो प्रस्ताव पाठवला आहे त्याबद्दल चर्चेची शक्यता आहे.


विधिमंडळ अधिवेशन


अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे करून शेतकऱ्यांना लगेच मदत मिळावी यासाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सपा आमदारांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. सभागृहात लव्ह जिहादबद्दल चुकीची माहिती लोढा यांनी दिली, असा आरोप करत सपा आमदार आंदोलन करणार आहेत.


आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव येणार आहे. यावेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्था यावरती विधानसभेत चर्चा होईल. राज्याच्या अनेक ठिकाणी झालेल्या हिंसेच्या घटना, बलात्काराच्या घटना, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधक सरकारला धारेवरती धरण्याची शक्यता आहे.


विनायक राऊत यांची पत्रकार परिषद 


शिवसेना खासदार विनायक राऊत यांची सेनाभवन येथे कोकणातील भूखंड घोटाळ्यासंदर्भात पत्रकार परिषद होणार आहे, दुपारी 12 वाजता. रिफायनरी जमीन खरेदी घोटाळा आणि यात काही पत्रकारांची नावे आहेत अशी चर्चा सुरु आहे त्याबाबात काही बोलणार का? याची उत्सुकता आहे. 


राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाचा हजर राहण्याचा आदेश


राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरून केलेल्या टीकेसंदर्भात राहुल गांधींना आज सूरतच्या न्यायालयात हजर राहण्याचा आदेश आहे. या खटल्याचा आज निकाल येणार आहे.


सांगलीत आजपासून महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 


पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आजपासून सांगलीत आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील मल्ल सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे. 
 
अनिल परब यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी


दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. ईडीच्या कारवाईपासून परब यांना दिलेलं संरक्षण आज संपत आहे. परब यांच्यावर तूर्तास अटकेची कारवाई न करण्याचा आदेश आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.